माजी सरपंच संजय धनगर यांनी जपली सामाजिक बांधिलकी रमजान महिन्याच्या निमित्ताने…. दानवाड मधील सर्व मुस्लिम बांधवांना रोजा सोडण्यासाठी केले खजूर वाटप
नवे दानवाड ( प्रतिनिधी) :- नवे दानवाड ( ता.शिरोळ) येथील माजी सरपंच श्री. संजय आप्पासो धनगर यांनी मुस्लिम समाजाच्या सध्या सुरू असलेल्या प्रवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने…. दानवाड मधील सर्व मुस्लिम बांधवांना रोजा सोडण्यासाठी खजूर वाटप केले.
माजी सरपंच संजय धनगर यांनी गेल्या वर्षीही रमजान महिन्यात साखर व शेवया वाटप केले होते. नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीदिनी अन्नदान स्वरूपात महाप्रसादाचे आयोजन स्वखर्चाने केले होते.
दानवाड परिसरातील सामाजिक सलोखा व सामाजिक बांधिलकी जपण्यात.. संजय धनगर यांचा नेहमी पुढाकार असतो.
आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ , व दानशूर स्वभावाने दानवाड मधील सर्वधर्मीय लोकांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे.
या कार्यक्रमावेळी… जेष्ठ नेते रावसाहेब कुंभोजे, जालंधर भापकर, रफिक देसाई, सज्जनसिंग रजपूत, खुतूबूद्दिन सय्यद, उपसरपंच पांडुरंग धनगर, सचिन अंबुपे, भगतसिंग शिलेदार, युनूस कुरणे, दिलीप कांबळे ( फौजी) , पिंटू माळी, कुणाल पाटील, बंडू लाडखान, शिवाजी सांळुखे, इलाई सय्यद, सागर परीट, मुनीर कुरणे, शिवानंद माळी, वजीर लाडखान, हमीद सनदी, छबन रजपूत, अल्लाउद्दीन सय्यद, अविनाश सुतार, रोहन रजपूत, शब्बीर सय्यद, झाकीर कमते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.