राज ठाकरेंच्या अटकेसाठी उपराकार लक्ष्मण माने यांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
कोल्हापूर प्रतिनिधी : मशिदीवरील भोंगे काढून टाका असे म्हणून भारतीय राज्यघटनेच्या विरोधक काम करणाऱ्या व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांना अटक करावी या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा जन्म ठाकरे घराण्यात झाला असला तरी त्यांचे देशाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान आहे सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे खरं तर राज ठाकरेंनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीचा आदर्श घेतला पाहिजे परंतु ते सुपारी घेऊन काम करत आहेत त्यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे सर्वजण जाणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय संवेदनशील परिस्थितीवर एक शब्द देखील बोलत नाहीत खरं तर त्यांनीही राजीनामा द्यायला हवा भोंगे काढले नाही तर आम्ही तलवारी काढू असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे वर पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण भावाची समजूत काढावी अन्यथा घटनात्मक विधिमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनात द्वारे केली आहे या आंदोलनात संतोष आठवले अध्यक्ष जनसंघर्ष क्रांती मोर्चा, समीर विजापूरे जनरल सेक्रेटरी जनसंघर्ष क्रांती मोर्चा प्रकाश इंगळे संस्थापक भष्ट्राचार निवारण महासंघ , सुशील कोल्हटकर, सज्जनसिंह चुतोडिया, विलास . तमाईतकर, अरविंद तमाईतकर रुपेश कांबळे , समशेरसिंह कल्लाणी सहभाग घेतला
Posted inकोल्हापूर महाराष्ट्र
राज ठाकरेंच्या अटकेसाठी उपराकार लक्ष्मण माने यांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

I truly appreciate this post. I have been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You’ve made my day! Thanks again!