हुपरी दि.६ मे लोकराजा छ. शाहू महाराजांच्या स्मृति शताब्दीनिमित्त जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिवाराकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सुरूवातीस छ. शाहूराजांच्या प्रतिमेचे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब गोटखिंडे यांच्या हस्ते आणि कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र येवून छ. शाहूराजांना बरोबर १० वाजता १०० सेकंद आदरांजली वाहण्यात आली.
१०० वर्षापूर्वी छ. शाहूराजांनी समता, बंधूता याची सुरूवात व प्रत्यक्ष अंमलबजावणी करून समानतेच्या माध्यमातून जातीय सलोखा निर्माण केला. अत्याधुनिक सोई सुविधा नसतानाही त्यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे शेतीसाठी व पिण्यासाठी कायमस्वरूपी सोय करून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचा संपूर्ण कायापालट केला. त्यांनी कोल्हापूरसाठी रेल्वे आणल्यामुळे दळणवळणाची चांगली सोय झाली. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी शाहू मिलची उभारणी केली. यातून छ. शाहूराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राजा कसा असावा याची प्रचिती येते.
उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्तम न्यायव्यवस्था तसेच मल्लविद्या, गायन, नृत्य अशा अनेक कला गुणांनाही वाव देवून चालना दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र निवासी वसतीगृहाची उभारणी केली. एक ना अनेक विधायक कामांमुळे छ. शाहूराजांची ख्याती सर्वात लोकप्रिय आदर्श राजा म्हणून झाली. या लोकराजांना आजच्या १०० व्या स्मृतीदिनानिमित्त जवाहर परिवाराकडून विनम्र अभिवादन.
Posted inकोल्हापूर
लोकराजा छ. शाहू महाराजांच्या स्मृति शताब्दीनिमित्त जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिवाराकडून अभिवादन !
