नवे दानवाड ता.शिरोळ येथील ग्रामपंचायत वतीने ग्रामपंचायत कार्यलायाच्या प्रांगणात लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ लोकनियुक्त सरपंच श्रीमती वंदना हरिश्चंद्र कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
राजश्री शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व आयोजित कार्यक्रमनुसार ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात गावचे उपसरपंच, ग्रा. प.सदस्य सदस्या, आजी माझी पदाधिकारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका, विदयार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका, अनेक संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळे इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.
Posted inकोल्हापूर
नवे दानवाड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन !
