सांगली आयटक कामगार संघटनेच्या वतीने निवारा भवनमध्ये थोर समाज सुधारक राजश्री शाहू महाराज यांना भावपूर्ण आदरांजली!

सांगली आयटक कामगार संघटनेच्या वतीने निवारा भवनमध्ये थोर समाज सुधारक राजश्री शाहू महाराज यांना भावपूर्ण आदरांजली!

सांगली आयटक कामगार संघटनेच्या वतीने निवारा भवनमध्ये थोर समाज सुधारक राजश्री शाहू महाराज यांना भावपूर्ण आदरांजली!
सुरुवातीस शंभर सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार Aituc फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, भारतात मध्ये सर्वप्रथम राजश्री शाहू महाराज यांनी शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राखीव जागेची तरतूद केली. या तरतुदींचा हजारो मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांच्या साठी कोल्हापूर मध्ये बोर्डिंग सुरू करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे शेक्षणिक सहकार्य केले. राधानगरी येथे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये धरण बांधून मजबूत धरण आणि त्यापासून मिळणारे पाणी त्यावरून होणारी शेतीला पानी पुरवण्याचे त्याकाळी जागतिक आगळे वेगळे उदाहरण राजश्री शाहू महाराजांनी निर्माण केलेले आहे. राजश्री शाहू महाराज यांनी हिंदुत्ववादी धर्मांध व अंधश्रद्धा फसवणारे प्रंवृत्ती विरुद्ध सातत्याने संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भविष्यकालीन कर्तृत्व लक्षात घेऊन शंभर वर्षांपूर्वी त्यांनी माणगाव येथे परिषद घेतली. या ऐतिहासिक परिषदेनंतर सर्व जगासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व फुलून आले. म्हणूनच या देशातील आजचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा राजश्री शाहू महाराजांच्या विधायक कार्याचा आपण अभ्यास करून धर्मनिरपेक्ष जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आदरांजली कार्यक्रमांमध्ये कॉ सुमन पुजारी, अफसाना शिकलगार, फर्जाना मुल्ला, स्वप्नाली देशपांडे, मनिषा पाटील, कॉ अमोल माने, श्री कदम, अश्विनी जाधव, अश्विनी कांबळे, विजया कोळी, कॉ करण काळे, रोहिणी खोत, व सारिका नाईकवाडी इत्यादींनी सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *