रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी
चिपळूण येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप करून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस ‘स्वाभिमानी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन समाजात आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी ४५ वर्ष प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे, देशातील प्रत्येक प्रश्नांवर उकल शोधनारे विद्वान व्यक्तिमत्व , केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचेच नाही तर विचारांचे वारसदार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा १० मे रोजी जन्मदिन असतो. हा दिवस देशभर स्वाभिमान दिन म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी हिंतचिंतक साजरा करत असतात. दरवर्षप्रमाणे याहीवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ॲड प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो.
चिपळूण तालुक्याील वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकऱ्यांकडून चिपळूणच्या रुग्णालयात रुग्णांना फळ, बिस्कीट वाटप करून ॲड प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक स्मिता गवाळे, शारदा चंदनशिवे, वंदना पांडे, सविता मोहिते, रिया सावंत,दीपिका सावंत, DBJ कॉलेजचे प्राचार्य गवाळे सर, प्राचार्य पांडे सर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव , सुमेध जाधव, विलास मोहिते आदी उपस्थित होते.