प्राचीन ही संस्कृती असते प्राचीन तर हे ज्ञानाचे भांडार असते कला साहित्य संस्कृती स्थापत्य नुत्य नाट्य आणि प्रज्ञा यांच्या समृद्ध वारसा ने प्राचीनता संपन्न झालेली असते प्राचीनता ही प्रत्येक समाजाची भूतकाळातील गौरवाची ती चिन्हे असतात तसेच त्यामध्ये संस्कृतीच्या संघर्षाची कारणे ही असतात प्राचीन ते कडे वर्तमानाच्या या समृद्ध कला वारसा च्या विकासासाठी काही संदर्भ काही ज्ञानाचे विषय काही अविष्काराचे नव दर्शने प्राप्त होत असतात अशा बहुविध सांस्कृतिक ते सातारा जिल्ह्यातील वाई हे शहर अशा समृद्धीची एक जन भूमी आहे
प्राचीन तेच आकर्षण हे कलावंतांचे वर्तन असते प्राचीन तेची आसक्ती ही त्या त्या सरंजामी मालकी हक्काचे भविष्यातील संवर्धन असते जतन असते प्राचीन ताने आधुनिकता ही सोबत समाजाने पुढे नेणे आवश्यक असते प्राचीनतेची भौतिकता ही समृद्धी असते हे धन असते हे वैभव शाली वारस यांचे गौरवाचे समाधानाचे क्षण असतात अशा या प्राचीन ताने आधुनिकतेचा सतत विचार व्हायला हवा कलावंत मात्र या दोन्ही पातळ्यांवर विचार करतात या दोन्ही संदर्भांना सतत अभ्यास असतात प्राप्त होणारे संदर्भ ते नव्या दृष्टिकोनातून आविष्कृत करतात यामध्ये चित्रकार हा पुढे असतो चित्रकार हा रचना रंग आकार संमिश्र रचना यांचा अभ्यास करतो त्यातून त्याचे नवे आविष्कार फुलवत असतं या आविष्कारात मध्ये चित्रकाराची प्रतिमा नवा कला आनंद देते
असाच एक कलानंद देणारा वहीच्या समृद्ध कला वर्षाची हळहळ व्यक्त करणारा एक चित्रकार म्हणजे श्रीमंत होनराव होय वाई करांना हा चित्र काढा म्हणजे गोलाकार हॅट घालून नित्यनियमाने दिसणारा गंगापूरच्या घाटावरील हा प्रतिभावंत चित्रकार अनेक वेळा पहावयास मिळतो क्वचितच त्यांची कला साधना हा चर्चेचा विषय होतो प्रस्तुत आस्वादक हा सहज 12 मे 22 रोजी श्रीमंत होन राव यांना भेटला आणि त्यांच्या कला साधनेच्या कक्षात रमून गेला तेव्हा प्राप्त झालेल्या रंग संवेदनांचा हा खजाना पुढील प्रमाणे होय श्रीमंत होनराव हे वाई तालुका ग्राहक मंचाचे उपाध्यक्ष सार्वजनिक जीवनात थोडे संघटनात्मक काम करावे त्याचबरोबर आपल्या कला साधनेत दीर्घ काळ रमून राहावे व एकांतात नित्य कलासाधना करावी हा त्यांचा दिनक्रम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या जवळपास 100 हून जास्त पाठ्यपुस्तकातील रेखाचित्रे आशय चित्रे मुखपृष्ठ बोध कथांना पूरक चित्रे व मुखपृष्ठ तयार करणारे श्रीमंत होनराव हे पाठ्यपुस्तक मंडळाच्या कला दर्शनाचा एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित असतिल पण त्यांच्या लुब्ध कला वारशाचे अस्वस्थ पण त्यांच्या तोंडून ऐकताना खूप रुखरुख वाटते वाई नगर परिषदेने वाई शहरातील समृद्ध पुरातन वारसे यांची रेखाटने करावीत ती नगर परिषदेच्या कलादालनात जतन करून ठेवावीत यासाठी धडपडणारे श्रीमंत होनराव हे आंतरिक हळहळ व्यक्त करणारे एकमेव चित्रकार असल्याचे नोंदवावे लागते
संस्कृतीच्या टप्प्यांवर समाजाच्या धर्म आणि सत्ता संघर्षात अनेक मानवी निर्माणाचे अद्भुत अविष्कार नष्ट झाल्याचे आढळून येतात पण जे काही टिकून राहतात त्यात वाईच्या कृष्णा नदीच्या काठावरील अनेक मंदिरे घाट आणि घाटांच्या दिशेने ये जा करण्यासाठी तत्कालीन धर्ममार्तंड यांनी संस्कृतीचे जतन करण्यासाठी बांधून घेतलेले भव्य दिंडी दरवाजे अर्थातच प्रवेश द्वारे होय गंगापुरी च्या पश्चिमेला प्रवेश द्वार क्रमांक 2 लगत ऊ मामाहेश्वरी मंदिराच्या एका खोलीत व्रतस्थ तीन दशके कलासाधना करणारे श्रीमंत होनराव यांच्या चित्रकृती वाळवी आणि पाणी यांच्यापासून कशाबशा जतन करत कला वारसा जपत आहे हा अवलिया चित्रकार केवळ आणि केवळ चित्रकलेत रममाण असलेला कित्येक वर्षे जेव्हा दिसतो तेव्हा चित्रकारांच्या कला प्रेमाचे गुड समजावून घेणे कुणाला च महत्त्वाचे वाटत नाही का? समाज हा चित्रकला निरक्षर असतो का?समाज हा सौंदर्य प्राचीनता यांची उपेक्षा का करतो ? प्राचीनता त्यातूनच उध्वस्त होत राहते तेव्हा चित्रकारांची निराशा पाहण्यासारखे असते श्रीमंत होनराव यांनी अनेक चित्र रेखाटली आहेत पण त्यांच्या दहा बाय दहाच्या खोलीत फक्त दोनच दोन चित्रे खूप मन वेडावुन घेतात म्हणून त्या चित्राविषयी
वाई लोकवस्ती घाटावरील येणे जाणे मार्गावरील हा कमानी दरवाजा भव्य तर आहेच अर्धगोलाकार आहे लाकडी आहे जड आहे मजबूत आहे त्याची भव्यता ही थक्क करते त्याचे दोन्ही बाजूचे तळातील दगडी मोठ्या घडीव तोडीचे बांधकाम आणि त्यावर लाल चपट्या भाजलेल्या आकर्षक रंगीत विटांचे एकरेषीय बांधकाम त्यातून साधलेल्या लाल-पांढऱ्या रंगांचा एक संघात आगळेवेगळे सौंदर्य प्रतीत करतो होनराव यांनी हा दरवाजा नुसता दाखवला नाही तर त्याच्या डाव्या आणि डाव्या आणि उजव्या बाजूच् भव्य बांधकाम अतिशय कलात्मक पद्धतीने रेखाटून साध्या दरवाज्याच्या वास्तु रचनेला सौंदर्याचा अनुभूतीचा अविष्कार घडवल्याचे या चित्रातून प्रतीत होते नदीकडे येणाऱ्या-जाणाऱ्या दोन स्त्रिया दरवाज्याच्या अंतर्भागात दाखवून होनराव यांनी स्त्रिया आणि बंद दरवाजा यांचे इतिहास नाते स्पष्ट केले आहे संस्कृती ही नेहमी बंद असते संस्कृतीला तटबंदी असते संस्कृतीचे मार्तंड हे नेहमी बंदिस्त व्यवस्था ठेवण्यात माहीर असतात त्यासाठीच तर शहरांच्या आणि घाटांच्या सुविधा आणि रचना आशा वर्गीय आणि वर्णीय केल्याचे लोकसंस्कृतीच्या शहरांच्या इतिहास विश्लेषण म्हणता येते होनराव यांना वास्तु रचनेची अद्भुतता भव्यता रचनेचे सौंदर्य या चित्रातून दाखविताना त्यांनी दरवाज्याला जिवंतपणा जो प्राप्त करून दिला आहे तो पाहताना मन थक्क होते हाच तो दरवाजा हेच ते चित्र हेच ते रंग हेच ते दगड याच्या विटा असे सारे भाव हे चित्र पाहताना मनामध्ये उमटतात
[ ] श्रीमंत होनराव यांच्या चित्र खोलीत अजून अप्रतिम दगडी बांधकामाच्या भिंती आणि त्यांचा काळा रंग रंग रेखाटलेले दुसरे एक चित्र खूपच छाया प्रकाश यांचा लपंडाव दाखवून देणारे मन खेचून घेणारे चित्र पहावयास मिळाले श्रीमंत होनराव यांनी उमा माहेश्वरी मंदिर परिसरातील एका भिंतीला असलेल्या लाकडी प्राचीन दरवाजा तून आज एक दिसणारा दुसरा लाकडी दरवाजा व त्याच्या दगडी उंबऱ्या जवळ लाल पोषाखात कमरेवर हात ठेवून उभी राहिलेली पाठमोरी दिसणारी एक बालिका तिसऱ्या मंदीराच्या गोलाकार मेघ डबरी च्या खाली घडीवर बसलेल्या नंदी कडे पहात उभी असलेली ही बालिका राव यांनी रेखाटली आहे होनराव यांच्या या चित्रामध्ये भिंतीचा दगडांचा घडीव पणा आणि त्याला प्राप्त झालेला सावलीच्या रंगाचा परिणाम चित्रकाराने पकडला आहे एका भिंतीच्या अंतर्भागात खोल दोन चित्ररचना दरवाजाच्या दाखवून चित्रकार उत्कृष्ट नमुन्याच्या स्थापत्य नंदी शिल्पाकडे प्रेक्षकांना घेऊन जातात हे नेत असताना मंदिरातील त्या लाकडी दरवाजे यांचे सुवर्ण रंग ज्या पद्धतीने दाखवतात हे मन वेडावून जाते रंग सामर्थ्य हे दृष्टीत असतेच पण त्याहून चित्रकाराच्या रंग संयोजनात ही असते रंगच जादूगार असतात रंगच चित्रांना जिवंत करतात चित्रकार आणि रंग यांचे विचार नाते हे चित्राचे सामर्थ्य असते श्रीमंत मोहनराव यांनी पिवळा सोनेरी आणि दगडी रंग यांचा इथे साधलेला मिलाफ हा सूर्यप्रकाश झोपेत दाखवण्यासाठी ज्या पद्धतीने वापरला आहे हे सगळे उत्तम उत्कृष्ट अशा रंगसंगतीचे हे उदाहरण आहे हा छाया व प्रकाश यांचा साधलेला अप्रतिम असा कलाविष्कार आहे याबद्दल होनराव यांच्या प्रतिमेला आस्वादक चित्र समीक्षक हे सलाम निश्चितच करतील साधे विषय उच्च सौंदर्य अनुभूती ची गुणवैशिष्ट्ये श्रीमंत होऊन राव यांच्या चित्रपट अशी आहेत हा चित्रकार वास्तुशिल्प रेखाटणारा या गटातील चित्रकार आहे लोकसंस्कृतीचे सौंदर्य हे आधुनिकतेत टिकणार का ही त्यांची खंत आहे हे कोण जपून ठेवणार याचे संवर्धन आधुनिक साधनांच्या साह्याने करून ठेवायला हवे पुरातन वारसे म्हणजे मालकी हक्काच्या निव्वळ इमारती नसतात तर ते त्या काळातील सामूहिक कला निर्माणाचे ते आविष्कार असतात अशीच सतत अस्वस्थ कला वेदना व्यक्त करणारे श्रीमंत होनराव हे एक अवलिया चित्रकार निश्चितच आहेत आयुष्यभर एका कला विषयात व्रतस्थ जगणारे कालच्या पिढीतील हे थोर वास्तु चित्रकार मुखपृष्ठकार चित्र रेखाटन कार अशा बहुविध क्षमतेचा हा वाईतील प्रतिभावंत मुक अज्ञातवासी जीवन जगणारा हा थोर चित्रकार हे वाई शहराचे चित्रकला ज्ञान संचित आहे आहे असे म्हटले शिवाय राहवत नाही
चित्रकार हाकला मग्न असतो तोकला साधनेत अज्ञात वासात राहतो असाच हा एक कला अज्ञात वासात राहणारा चित्रकार आहे
समाज जेव्हा चित्रकला निरक्षर होऊ लागतो तेव्हा चित्रकलेची उपेक्षा ही सतत पहावयास मिळते राजाश्रय यातील कला ही इतिहासातील गोष्ट आहे पण वर्तमानातील कलांचे असे प्रतिभा आविष्कार समाजाने पुढे येऊन जतन करणे त्यांना सन्मानित करणे त्यातून कला साक्षरता वाढवणे त्यातून कलेच्या समृद्ध वारशाचा सौंदर्य अनुभव नव्या पिढ्यांना प्राप्त करून देणे यासाठी व्यापक पणे प्रयत्न करण्याची गरज आहे उदासीन शासन उदासीन लोक उदासीन संस्था उदासीन समीक्षक यांच्यामुळे कलाही आनंदाचा आस्वादाचा सौंदर्य अनुभूतीचा उच्च बौद्धिक वर्तन प्रकार आहे हे समाजात रुजवण्यासाठी प्रसिद्धीपासून सतत दूर राहणाऱ्या लोक चर्चेत राहू नये याची काळजी घेणाऱ्या आप अनुसुची पासून दूर असणाऱ्या श्रीमंत होनराव सारख्या अनेक प्रतिभावंत चित्रकारांना समाजाने गौरव करून सलाम करायला हवा तरच अशा साधनेचे अनुकरण पुढच्या पिढ्या करतील आणि कला ही श्रीमंती आहे कला ही प्रतिभा आहे कला हा उच्च आनंद आहे हेच जीवनाचे एक प्राप्त उच्च अनुभव क्षण आहेत असा जीवनाचा अर्थ पुढच्या पिढ्यांना कळेल म्हणून श्रीमंत होनराव यांच्या चित्रकला साधनेला समाजमनाची साद ऐकण्याची गरज आहे असे मनोमन वाटते या चित्रकाराच्या साधनेला आणि प्रतिभेला निरपेक्ष आरोग्य आणि सृजनाचे नो नवीन अविष्कार प्राप्त होवो असा आशावाद व्यक्त करणे उचित ठरते
शिवाजी राऊत 9423032256
चित्र समीक्षक वाई
सातारा 15 मे 22 वेळ 9.48