नांदगाव ता.शाहुवाडी येथे नांदगाव सेवा संस्था नांदगाव यांच्या वतीने गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ..
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
अखंड विश्वाला दया,क्षमा,शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय,महाकारूणी,तथागत,भगवान गौतम बुद्ध यांची आज सुमारे 2566 वी जयंती आज नांदगाव तालुका शाहूवाडी येथे विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ,शैक्षणिक उपक्रम राबवून या जयंतीनिमित्त बंधुभावाचे ऐक्य जपण्याचे काम केले, असून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे, गौतम बुद्धाच्या धम्म व त्यांची शिकवण समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक उपक्रमाच्या द्वारे गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने साजरी करण्यात आली….
यावेळी मा. चेअरमन.प्रवीण खराडे,यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून अभिवादन करण्यात आले…💫 व तसेच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(गवई)चे जिल्हा उपाध्यक्ष रंगराव कांबळे,आयु.दिनकर कांबळे,आयु.शहाजी कांबळे,RPI शाहुवाडी तालुकाध्यक्ष भिकाजी कांबळे,अक्षय कांबळे(युवा आघाडी),शारदा पाटील(व्हा.चेअरमन), सुरेश पाटील(मा.चेअरमन),मा.डे.सरपंच लक्ष्मण पाटील,सागर मुरूगडे,मोहन खराडे,विठ्ठल पाटील(संचालक),आनंदा खराडे(संचालक),आनंदा पाटील(संचालक),धुळाप्पा कांबळे(संचालक),तानाजी पाटील (संचालक),बापुसो कांबळे आदी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते…