जलस्वराज प्रकल्प कबनूर पाणीपुरवठा सुरू पाण्यासाठीची अखेर नागरिकांची धावपळ थांबली

जलस्वराज प्रकल्प कबनूर पाणीपुरवठा सुरू पाण्यासाठीची अखेर नागरिकांची धावपळ थांबली

जलस्वराज प्रकल्प कबनूर पाणीपुरवठा सुरू पाण्यासाठीची अखेर नागरिकांची धावपळ थांबली
कबनूर-( प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर येथील जलस्वराज्य प्रकल्प वरील वीज वितरण कंपनीने वीज बिल थकबाकी न भरल्यामुळे आठ दिवसापूर्वी वीज पुरवठा खंडित केला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने १६ लाख २४ हजार रुपये भरल्यानंतर महावितरण कंपनीकडून जलस्वराज योजनेवरील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती कबनूर ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा पोवार,उपसरपंच सुधीर पाटील यांनी दिली.
     कबनूर जलस्वराज प्रकल्प योजनेमधून कबनूर गावाला पाणी पुरवठा केला जातो. जलस्वराज प्रकल्प कडील नळधारकाकडून येणारी पाणीपट्टी पूर्णपणे वसूल होत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार, मेन्टेनन्स, विजबिल दरमहा भागवताना नियोजनाचा अभावामुळे ग्रामपंचायतीला नाकीनऊ येते वेळेत वीज बिल थकबाकी न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केला जातो दरवेळी तडजोड करून विज बिल भरले जाते यावेळीही आठ दिवसापूर्वी सदर योजनेवर वीजपुरवठा तोडला होता दरम्यान काळात ग्रामपंचायतीने सुमारे साडेबारा लाख रुपये भरले किमान वीस लाख भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू होणार नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते सलग सरकारी सुट्टी असल्यामुळे ग्रामपंचायत वीजबिल भरू शकली नव्हती मंगळवारी ग्रामपंचायतीने एकूण १६ लाख  २४ हजार रुपये भरल्यानंतर महावितरण कंपनीने जलस्वराज्य प्रकल्प योजनेचा वीज पुरवठा पुन्हा जोडला त्यानंतर आठ दिवसांनी मंगळवारी रात्री पाणीपुरवठा रीतसर सुरू झाला.त्यामुळे कबनूर ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी धावपळ एकदाची थांबली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *