राज ठाकरे यांचा
अयोध्या दौरा स्थगित!
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जुन 2022 रोजी नियोजित अयोध्या दौरा स्थगित केला आहे. याची माहिती खुद्द राजसाहेब ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 22 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे येथील जाहीर सभेत राज ठाकरे यावर अधिक भाष्य करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “त्यांना सहकार्य हवे असते तर दिले असते” अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी सुरुवातीपासून तीव्र विरोध केला होता . उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे. मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. याबाबत २२ ला पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे भाष्य करतील भूमिका मांडतील असे संकेत राज यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता? महाराष्ट्रातून हजारो सैनिक अयोध्या नगरीत जाण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आले होते. जर कदाचित अयोध्या नगरीत त्यांना विरोध झाला असता तर त्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यात उमटले असते. तूर्तास तरी अयोध्या दौऱ्याला विराम लागला असला तरी पुण्यात राज ठाकरे साहेब काय आदेश देतात या कडे मन सैनिकांचे लक्ष लागले आहे.
Posted inमुंबई
राज ठाकरे यांचा
अयोध्या दौरा स्थगित!
