कबनूर ग्रामपंचायतीस जलस्वराज पाणीपुरवठा वरील वीज बिलापोटी महिन्याला वीसलाख भरावे लागणार नळधारक नागरिकांना पाणीपट्टी भरण्या संबंधि उपसरपंच सुधीर पाटील यांनी केले आवाहन कबनूर- (प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर जलस्वराज्य प्रकल्पाकडील मागील चार वर्षातील येणे देण्याचा हिशोब उपसरपंच सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मीटिंग हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला कबनूर ग्रामपंचायत जलस्वराज्य योजनेवरील विजबिलासाठी दरमहा वीस लाख रुपये भरावेच लागणार आहेत अन्यथा वीजबिल कनेक्शन बंद करू असे वीजवितरण कंपनीने स्पष्ट सांगितलेले आहे. उपसरपंच यांनी नळधारकांना पूर्ण पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे जमा करून सहकार्य करणे बाबतचे आवाहन केले आहे यास नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा वीज पुरवठा खंडित होऊन पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे.
जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेचे 2018 ते 21 मधील जॅकवेल व जलशुध्दीकरणकेंद्र वरील वीज बिल 2 कोटी 57 लाखाचेवर आहे आणि 2022 सालातील 85 लाखाचेवर आहे असे एकूण चार वर्षातील वीज बिल थकबाकी 3 कोटी 42 लाखाचेवर होते त्यापैकी सन 2021 अखेर 1 कोटी 11 लाख रुपये सन 2022 मध्ये 73 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 84 लाख रुपये आतापर्यंत ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीकडे भरणा केलेला आहे .2018 ते 21 मधील थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख व सन 2022 मधील बारा लाख आणि व्याज व दंड 67 लाख असे एकूण 2 कोटी 25 लाख इतकी वीज बिल थकबाकी रक्कम भरणेची आहे .
जलस्वराज योजना कालबाह्य झालेली असल्याने शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत कबनूर गावाकरता नवीन सुधारित योजना मंजूर केली आहे सदर योजना वारणा नदीवरून आणण्याची असून शुद्ध पाणी चोवीस तासांसाठी मीटरद्वारे देण्याची ग्रामपंचायतीने योजना अखली असून सदर योजना होण्याकरता ग्रामपंचायतीने एमएसईबीचे 2 कोटी 25 लाख रुपयांची विजबिल थकबाकी पूर्णपणे भरल्याशिवाय नवीन योजनेसाठी ना हरकत दाखला वीज वितरण कंपनीकडून मिळणार नाही त्यामुळे नाहरकत दाखला शिवाय नवीन योजना राबवता येणार नाही यासाठी नळधारक ग्रामस्थांनी पूर्णपणे पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासना तर्फे उपसरपंच सुधीर पाटील यांनी केले आहे दरमहा गोळा होणाऱ्या पाणीपट्टी मधून कामगार पगार, गळती दुरुस्ती, टीसेल,तुरटी खरेदी व इतर अनुषंगिक खर्चाचा विचार करता पाणीपट्टी वाढवण्या शिवाय पर्याय नसल्याचेही उपसरपंच यांनी सांगितले त्यामुळे एप्रिल 2022 पासून नागरिकांना वाढीव पाणीपट्टीचा भार सोसावा लागणार आहे . या महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद असतानासुद्धा ग्रामपंचायतीचे सदस्य फक्त मधुकर मणेरे,सुधीर लिगाडे, समीर जमादार, ग्रामसेवक गणपत आदलिंग उपस्थित होते.