मागील वर्षी महापुराने बाधित झालेल्या ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे बाधित झाली असतील त्यांना कल्याणकारी मंडळाकडून त्वरीत दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य द्या यासाठी आंदोलन करणार!
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा दु १२ वाजता 23 मे रोजी घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस मृत्यु झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या विधवा महिलांना नियमानुसार आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया सांगली सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पूर्ण होत आहे.
तसेच ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी अनुदान मिळण्याबाबत ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांचे २९ अर्ज सांगली श्री अनिल गुरव सहायक कामगार आयुक्तांनी मंजूर केलेले आहेत. उर्वरित अर्ज तपासणी केली जात आहे. म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आले.
२३ मे रोजी मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना कॉ शंकर पुजारी यांनी आवाहन केले की, चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महापुरा मध्ये अगदी नोंदीत बांधकाम कामगारांची इतर नागरिकांच्या बरोबरच हजारो घरे पडलेली आहेत. त्यांना अजूनही शासनाकडून मदत मिळाली नाही. दरम्यान सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळआकडे 13 हजार कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे. त्यासाठी कल्याणकारी मंडळाची अशी एक योजना आहे की, बांधकाम कामगारांना घरकुलासाठी दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल. म्हणूनच असे आर्थिक सहाय्य प्राधान्याने नोंदीत बांधकाम कामगारांना देण्यात यावे यासाठी राज्यव्यापी मेळावा घेऊन आंदोलन छेडण्यात येईल. असे सांगितले .
या मेळाव्याच्या वेळेस कॉ विशाल बडवे ,शितल मगदूम ,अमोल माने, अश्विनी कांबळे , रोहिणी कांबळे इत्यादींनी भूमिका मांडल्या.
Posted inसांगली
मागील वर्षी महापुराने बाधित झालेल्या ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे बाधित झाली असतील त्यांना कल्याणकारी मंडळाकडून त्वरीत दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य द्या – कॉम्रेड शंकर पुजारी
