दत्तवाड येथील प.पु.श्रीअदु्श्यशिवयोगी महाराज यांची भक्तिमय वातावरणात अंत्यसंस्कार
कोल्हापूर/ रमेशकुमार मिठारे
महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानात, शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामात, श्रोत्रीय ब्रम्हनिंष्ठ श्री सद्गुरु बाबा महाराज मठाचे ब्रम्हश्री बसगोंडा पाटील महाराज यांचे चतुर्थ सुपुत्र अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री सद्गुरू बाबा महाराज यांचे उत्तराधिकारी जीवन शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट दत्तवाड संचलित,अभिनव बालविकास मंदिर व परिवर्तन प्राथमिक शाळा दत्तवाड संस्थापक अध्यक्ष प.पु.श्री.अदृश्य शिवयोगी बाबामहाराज यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी देहावसान झाले.त्यांच्या पाश्चात पत्नी, तिन मुली,एक मुलगा,दोन भाऊ व बहीणी असा मोठा परिवार आहे.
प.पु.अदुश्य शिवयोगी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने दत्तवाड ग्रामात व परिसराच्या महाराष्ट्र व कर्नाटक भक्तजनांना त्यांच्या देहावसानाचे वार्ता समजताच प्रचंड भाविक भक्त जनांच्या समुदयात महाराजांचे अंत्ययात्रा संपूर्ण दत्तवाड गावांतून काढण्यात आली.यावेळी प.पु.श्री.काडसिद्धेश्वर महास्वामीजी कणेरी मठ,प.पु.श्री. निजगुनानंद महास्वामीजी,प.पु.श्री.भालाक्क्षदेव स्वामी, वर्तमानसिमी मठाधिश,काद्रोळी, व शिरोळ दत्तकारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि अंत्ययात्रा काढण्यात आली.या अंत्ययात्रे प्रसंगी “श्रीगुरुबाबा”, “सद्गुरू बाबा” अशा नामघोषाचे गजर करत ही अंत्ययात्रा मठापासून ते गावातील जुने मुख्य निवासस्थानच्या मार्गाने बाबामहाराज मठापर्यत हि मिरवणूक काढण्यात आली. ही अंत्ययात्रा मिरवणूक मठास्थळी पोहोचल्यानंतर प्रचंड भावीक भक्त जनांच्या उपस्थितीत कर्नाटकातील व महाराष्ट्रातील संतमंडळानी सुश्राव्य भजनाच्या व टाळमुर्दंगाच्या गजरात प.प.अदु्श्य शिवयोगी महाराजांना भक्तीमय वातावरणात,धुप व चंदनाच्या आणि पुष्पवृष्टीच्या उधळणीत या महाराजांना समाधीस्त करण्यात आली.यावेळी समस्त दत्तवाड ग्रामस्थ व पाटील (गळतगे) परिवार आणि भक्तजण बहुसंख्येने उपस्थित होते.