साखरी येथे परिवर्तनवादी कार्य; विधवा महिलांचा सन्मान करून विधवा महिलांच्या हस्ते ग्रहप्रवेश.
गगनबावडा प्रतिनिधी :
साखरी ता. गगनबावडा येथे विधवा महिलांच्या हस्ते ‘तक्षशिला’ या वास्तूचा गृहप्रवेश करण्यात आला.
आज समाजामध्ये विधवा महिलेला अपमानजनक वागणूक मिळत आहे, परंतु साखरी ता. गगनबावडा येथे विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्याच हस्ते नवीन ‘तक्षशिला’ या वास्तूचा गृहप्रवेश करण्यात आला.
पती मयत झाल्यानंतर विधवा महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे असे प्रकार केले जातात, यामुळे विधवा महिलांना वेळोवेळी अपमान सहन करावा लागला आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये विधवा महिलांना पुढे केले जात नाही. पण याच विधवा महिलांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते साखरी येथील बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष सतीश कुमार कदम यांनी आपल्या ‘तक्षशिला’ या वास्तूचा गृहप्रवेश करण्याचे परिवर्तनवादी काम केले आहे.
यावेळी बोलताना सतीशकुमार कदम म्हणाले, की
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून मला ही प्रेरणा मिळाली. यावेळी उत्तम पाटील पोलीस पाटील शेणवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊ कांबळे, प्रभाकर वर्धन, ज्ञानदेव कांबळे, दीपक देवाळकर, महेश बावडेकर यांच्या सह पंचक्रोशीतील विधवा महिला उपस्थित होत्या.