भाषेचा तुच्छता वाद आणि भाषेचा तर्क वाद
(बोजड भाषा राजकारण)

भाषेचा तुच्छता वाद आणि भाषेचा तर्क वाद<br>(बोजड भाषा राजकारण)

भाषेचा तुच्छता वाद आणि भाषेचा तर्क वाद
(बोजड भाषा राजकारण)

भाषा समजत नाही भाषा कळत नाही अर्थ प्राप्त होत नाही भाषा बोजड आहे भाषेतील क्लिष्ट शब्दांचा वापर जास्त आहे आम्ही मराठी भाषा कमी वाचतो मला इंग्रजी येते मराठीशी माझा संबंध नाही अशी विधाने अनेक वेळा मातृभाषा मराठी असलेल्या भाषिकांच्या कडून जेव्हा ऐकावयास मिळतात तेव्हा भाषाव्यवहार हा सुगम नाही तर तो अनाकलनीय आहे अर्थहीन आहे म्हणून तो दूर सारला जातो सादर झालेला विचार समजून घेण्याची मानसिकता नसते किंबहुना विचार प्रकटीकरण करणारा व्यक्ती कोण आहे त्याच्यावर अवलंबून ठेवून अशा प्रकारची वरील प्रतिक्रिया अनेक वेळा भाषा व्यवहारामध्ये ऐकावयास मिळते येथे प्रामाणिकता आणि राजकारण किती आहे हे खूप महत्वाचे असते बहुतांश वेळा भाषा कळते भाषेचा अन्वयार्थ केल्यानंतर समजू शकतो तरीही भाषेच्या आकलनाची अधीर वृत्ती न ठेवता सादर झालेला विचार नाकारण्यासाठी बोजड भाषा या नावाने तो विचार नाकारण्याची मानसिकता सभोवताली आढळणारी येते अशा वेळेला अर्थपूर्ण आशयगर्भ तर्क अधिष्ठित बहु आशय प्रकट करणारी भाषा आपले प्रयोजन साध्य करण्यात कमी पडते यातून मार्ग कसा काढावा याचा हा ही एक प्रश्न असतो वि टिंग स्टाई न हा भाषाशास्त्रज्ञ भाषेचा खूप सूक्ष्म विचार मांडतो त्याच्या भाषा आकलन वस्तू आणि वस्तुस्थिती तसेच प्रत्येक वस्तूच्या अनुवादि विचाराची प्राथमिकता आपण प्राप्त करून घ्यायला हवी असा त्याचा आग्रह आहे त्याच्या मते भाषेने विश्लेषण करावयाचे असते हे विश्लेषण करत असताना तार्किक प्रत्यक्षता वाद हे हत्यार भाषिक आणि वापरायला हवे म्हणजे काय तर शब्दरूपाने साकारलेली वस्तू आणि वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे त्यांचे विश्लेषण केले पाहिजे त्यासाठी तर्क वापरला पाहिजे हे करीत गेल्यास तयार होणारी विधाने आपणाला स्पष्टीकरण देतात त्याचे स्पष्टीकरण याचा विस्तृत अर्थ हे त्या वस्तूचे वस्तुस्थितीचे आकलन असते त्यासाठी सर्व वस्तूच्या अंगी असलेला सदैव वस्तू शास्त्रीय असाच विचार असतो तो विधानाच्या नंतर प्राप्त होतो अन्यथा प्रत्येक विधान हे अर्थहीन असते हे पाणी आहे या प्राथमिक विधानांमध्ये पाणी ही वस्तू आहे ती द्रव्य आहे ती पारदर्शक आहे ती प्रवाही आहे ती भांड्यांना रूप आकारबद्ध होत असते हे सर्व विश्लेषण हीच पाणी या वस्तूची वस्तुस्थिती असते यावरून मूळ अनु वादी पाणी या विधानाचे प्राप्त झालेले स्पष्टीकरण अर्थातच विश्लेषण म्हणजे त्या विधानातून प्राप्त झालेले ज्ञान होय भाषेचे विश्लेषण कार्य करीत रहाणे म्हणजेच तत्वज्ञान मांडणे होय या मांडणीतून विचार संरचना व रचनेचे आकलन होते भाषा ही नेहमी विचाराने रचना यांचा दोन्ही पातळीवर विश्लेषण स्वरूपामध्ये अर्थ स्पष्ट करते आणि म्हणूनच भाषा ही जगताचे ज्ञान करून देते भाषे मध्ये असलेली त्या वस्तूच्या तथ्यांची पूर्ण किंवा अंशरूपाने सामग्री भाषिक विचार करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असते मुळात समग्रता जेव्हा जेव्हा स्पष्ट होते तेव्हा भाषा वस्तू आणि वस्तुस्थितीचे व्यापक प्रदेश भाषिक च्या समोर स्पष्ट होत राहतात म्हटले जाते की भाषा हे जगताचे ज्ञान आहे या भाषेच्या कार्यामध्ये वाक्य खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात ती कथन करतात
जे भाषा वाचतात ते विधानांच्या वर लक्ष केंद्रित करीत नाहीत विधाने कोणती विधानं चा हेतू काय विधाने सुसंगत आहेत का सर्व विधानांच्या मधून एकूण अर्थ काय प्राप्त होतो विधानांच्या मध्ये वापरलेली पदे ही सुसंगत आहेत का या प्रकारचे चिंतन वाचक हा त्याच वेळी करीत नाही त्यामुळे बोजड भाषा अशी प्रतिक्रिया देऊन तो वाचन टाळतो तो आशय समजून घ्यायला नकार देतो आणि अर्थपूर्ण आकलनाच्या दिशेने तू पुढे जात नाही केवळ भाषा संप्रेषण करणाऱ्या व्यक्तीच्या विधानातील शब्दांना नकार देऊन अर्थ नाकारणे हेच भाषा निरक्षरतेचे वर्तन आहे मुळात भाषेत तरी काय असते ?वाक्य आणि विधाने यांची रचना असते यामध्ये एक स्थळ विधान असते आणि त्याला जोडून अनु विधाने असतात विधानांच्या मध्ये सरल विधाने जटील विधाने असे दोन प्रकार असतात ज्या विधानांमध्ये नामाचा वापर केलेला असतो ते सरळ विधान असते ते वस्तू दर्शक असते ते मूळ अर्थ गृहीत धरून पुढे जात राहते त्यामुळे सरळ विधानांचा अर्थ प्रथम समजावून घेणे हे अत्यंत आवश्यक असते वाक्यांच्या मध्ये असलेल्या नाम पदाचा वापर हा का केला आहे तो योग्य आहे का त्यातूनच पुढे वापरण्यात आलेली सर्वनामे सुसंगत आहेत का हे तपासून वाचक पहात नाहीत आणि त्यामुळेच सुसंगत भारताच्या दिशेने वाचक पुढे जात नाही हे पुढे जाण्यासाठी तर्काचा वापर करता आला पाहिजे याचा वापर कमी पडतो आणि अर्थप्राप्ती होत नाही ती विधाने ती सरळ वाक्य कळत नाहीत आणि बोजड भाषा हा रोप भाषेवर करुन भाषिक हा ज्ञानाच्या प्राप्ती पासून स्वतःहून वंचित राहण्याचा आळस करतो ही खरी वस्तुस्थिती असते भाषेमध्ये वाक्यांची शृंखला असते ही शृंखला भावात्मक असते तर काही बाबतीत का भावात्मक असते इथेच भाषेची अर्थ व अर्थ हीनता फसगत होते अशा प्रकारचे निरीक्षण तत्त्वज्ञ रसेल यांनी मांडले आहे भाषाशास्त्रज्ञ वितोंगो स्टाईन यांनी भाषेत वापरलेल्या विधानांचा खूप सूक्ष्मपणे विचार केला आहे त्यांच्या मते कोणत्याही भाषेत वापरलेली प्राथमिक विधाने यथार्थ आहेत का ची विषयांशी संलग्न आहेत का ती वास्तवाचे चित्रण योग्य प्रकारे करतात का हे प्रश्न वाचकाने विधानांचा अर्थ लावताना स्वतःला विचारले पाहिजेत तरच विधानांचे जितके भाग असतात इतकी वस्तुस्थिती विस्तृतपणे स्पष्ट होत जाते हे करण्यासाठी प्रत्येक वाचकाने प्रत्येक विधानाची समग्रता समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच वस्तुस्थितीच्या अंतरंगात आशयाच्या स्पष्ट तेत वाचक पोहोचू शकतो मराठी भाषेमध्ये वाचक हा हे ज्ञान वर्तन न करता भाषा बोजड आहे असे शिक्के मारतो आणि स्वतः तर्क करावया चे विसरून जातो

भाषेची मूळ कार्य अर्थाला प्रस्तुत करणे वास्तवाच्या जवळ वाचकाला नेहने तसेच रचनेची अंतरंगाची कारणे सांगणे तसेच विधानातील समस्या गांभीर्य स्पष्ट करते थोडक्यात भाषाही अर्थ आणि वस्तुस्थिती चे स्वरूप त्या दोहोंमधील संबंध आणि त्यातून बोध होत असलेला अर्थ व समस्येचे स्वरूप हे सर्व विधानांच्या विच्छेदन आतून प्राप्त होते हेच कार्य भाषा करीत असते भाषा ही केवळ विधाने नसते तर ती अर्थाची सत्यता फलित स्वरूपाची सुगम अर्थ वाहक असते भाषा स्वतःच्या सोबत नेहमी सत्य विधाने घेऊन पुढे जात नाही सत्य विधानाची प्राथमिकता व निवड करणे हे काम भाशा अभिव्यक्ती करणाऱ्या व्यक्तीचे असते म्हणून भाषा आहे वैयक्तिक इंद्रिय प्राप्त असे महत्वाचे साध्य झालेले खाजगी ज्ञान संचित असते हे त्या भाषिक व्यक्तीने सरल विधानांच्या अर्थप्राप्ती च्या क्षमतेने प्राप्त केलेले असते अशी सरळ विधाने सत्य विधाने हेच भाषेचे सामर्थ्य असते म्हणून भाषा ही शब्दांच्या परिवाराचे व्यापक स्वरूप असते भाषेला स्वतःचा शब्द संसार असतो ज्याप्रमाणे सत्य आणि असत्य विधाने असतात तसेच विश्वास व अविश्वास अशी ही विधाने असतात जाणणे व जाणू शकत नाही माहित आहे परंतु माहित नाही या सर्व शब्द परिवारातील सदस्य शब्दांच्या आधारे भाषेचा व्यवहार पुढे जात असतो हे आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे विधानांच्या रचनेचे अनेक दोष असतात खंडित विधाने असतात विरोधी विधाने असतात असत्य विधाने असतात अनुभवाला सिद्ध न होणारी अशीही विधाने त्या भाषेचे अडचणीत पेरलेली असतात त्यामुळे अर्थाचा तुटकपणा प्राप्त होतो अर्थाची शृंखला खूप लांब होते त्यामुळे मूळ अर्थ व एकूण अर्थ याच्या मध्ये खंड पडतो आणि भाषा दुर्बोध होते ही दुर्बोध भाषा टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे भाषा विचाराची चिकित्सा ही सवय वाचकांनी स्वतःला लावली पाहिजे तरच वाक्यांची अर्थ चिकित्सा करण्याची सतत सवय अंगी रूजू लागते यातूनच करीत असलेली चिकित्सा हि सत्य आहे का ती प्रमाणित ठरते का याची खातरजमा स्वतःला करता येते भाषा शास्त्रज्ञ असे म्हणतात कोणत्याही भाषेतील अर्थ हा त्या भाषेची वास्तविकता व त्याने केलेले प्रयोगशीलता असते त्यातूनच व्यापक अर्थ प्रदर्शित होतो आणि भाषा कार्य साध्य होते हे सर्व विश्लेषण बोजड भाषा या एका कारणामुळे विधानाची सत्यता व विचारांची मौलिकता यांच्यापासून वाचक हा वंचित राहू नये म्हणून हे सर्व विश्लेषण भाषा आणि सुगमता या अंगाने केलेले आहे असा भाषेचा अंतरंगात जाऊन विचार करण्याची सवय ही प्रत्येक भाषिकांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनली पाहिजे हे वर्तन प्रत्येकाने सतत करायला हवे तरच समोरची व्यक्ती कोण आहे याबद्दलची तुच्छता न बाळगता भाषा म्हणजे अर्थ प्रतीत होणे भाषा म्हणजे सत्य विधानांच्या प्रत्यक्ष स्वरूपाच्या जवळ जाणे होय आणि आम्ही मराठी भाषा वाचत नाही मराठी चांगले येत नाही आम्ही इंग्रजी वाचतो हा अहंकार स्वतःहून टाळला तरच सुगम भाषेच्या जवळ जाता येते

शिवाजी राऊत
प्रेस सातारा 26मे 22 वेळ9.10

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *