केळापूर येथे संत श्री भिमा भोई जयंती साजरी ; प्रदीप भनारकर यांनी व्यक्त केल्या समाजाच्या व्यथा

केळापूर येथे संत श्री भिमा भोई जयंती साजरी ; प्रदीप भनारकर यांनी व्यक्त केल्या समाजाच्या व्यथा

केळापूर येथे संत श्री भिमा भोई जयंती साजरी

प्रदीप भनारकर यांनी व्यक्त केल्या समाजाच्या व्यथा

सुनील शिरपुरे/झरीजामणी

केळापूर येथील धनलक्ष्मी मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनवर भोई समाजाचे आदर्श, गुरु व दैवत श्री संत भिमा भोई जयंती साजरी करण्यात आली. या काक्रमाचे अध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा सचिव मोहनजी कनाके यांच्या हस्ते संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे नेते नारायणजी भनारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भोई समाजाचे सदस्य सुनीलजी पारशिवे, ऋतिक लांडगे, विनय उस्केवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भोई समाज युवा मंच जिल्हा अध्यक्ष प्रदीपजी भनारकर यांनी भोई समाजाच्या युवकांना मार्गदर्शन केले. भोई समाज हा गावात, तालुक्यात, जिल्हात, राज्यात व देशात खूप मोठ्या संख्येने आहेत. परंतु आपल्या समाजाची आज दुर्दशा होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यात एकता नाही, आपण कधी मतभेद सोडून एकत्र आलो नाहीत. पण आपला इतिहास हा काही दिवसांचा नाही. आपणही जल, जंगल, पाणी याच्यावर अवलंबून आहोत. आपण हजारो वर्षांच्या इतिहासाशी जुळलेलो आहोत. रामायणात आपला उल्लेख कोळी समाज म्हणून केला आहेत. जेव्हा प्रभू श्री राम अयोध्यातून वनवासात जात होते, तेव्हा एक मोठी नदी आळ आली असता आपल्या कोळी बांधवांनीच प्रभू श्री राम, शिता माता व लक्ष्मणाला नौकेत बसवून ती नदी पार करण्यास सहाय्य केले. एवढेच नव्हे तर राज माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही पालखीचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी भोई समाजाला दिला आहेत. इतकं असूनही आमच्या समाजाला मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही. देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, पण आम्ही आमच्याच देशात आजही पारतंत्र्यात असल्याचा भास होतो. कारण आम्ही शूद्र नाही, ब्राह्मण नाही तरी आम्हाला शासकीय सवलती व योजनांपासून वंचित ठेवण्यात येत आहे, असे मत व्यक्त केले. या सर्व गोष्टींचा विचार करता आम्हाला न्याय कधी मिळणार? आमचा समाज मुख्य प्रवाहात कधी येणार? असा प्रश्न भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपजी भानारकर यांनी राजकीय नेत्यांसमोर उपस्थित केला व या संबधीत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना न्याय मागण्यासाठी पत्र व्यवहार करणार अशी सुचना देण्यात आली व जय भोई राज जागा हो, एकतेचा धागा हो असा जयघोष करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *