रघुनाथ कर्णिक यांचा सपत्नीक सत्कार …
गुडाळ/ वार्ताहर संभाजी कांबळे
कोल्हापूर जिल्हा केंद्रप्रमुख पदवीधर
शिक्षक पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ कर्णिक यांचा सपत्निक सत्कार तरसंबळे ता. राधानगरी येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक एम. डी. चांगले होते.
स्वागत व प्रास्ताविक माजी चेअरमन संजय पाटील यांनी केले. यावेळी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ कर्णिक व ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल निर्मला कर्णिक
यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे, पुरोगामीचे एस. के. पाटील, केंद्रप्रमुख ब.पू. कांबळे, राजेंद्रकुमार पाटील, समाज कल्याणचे माजी सभापती साताप्पा कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जीवबा कांबळे, सुरेश सोनगेकर संगीता कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी संचालक बंडोपंत किरूळकर, बापू पाटील, भिकाजी डवरी, पत्रकार पी. जी. कांबळे, सुकुमार कांबळे, बाळासाहेब बेलेकर, भीमराव कांबळे, दादासो पाटील, हिंदुराव कांबळे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम संघवी यांनी केले व आभार एकनाथ कांबळे यांनी मानले.
……
तरसंबळे :रघुनाथ कर्णिक यांचा सत्कार करतांना संस्थापक एम. डी. चौगले, साताप्पा कांबळे व पतसंस्थेचे संचालक. फोटो कॅप्शन संभाजी कांबळे गुडाळ
Posted inकोल्हापूर
रघुनाथ कर्णिक यांचा सपत्नीक सत्कार …
