सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

कोल्हापूर २७ मे २०२२ : सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत. ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य असून यानिमित्ताने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळेस सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी , क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके, ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि अष्टपैलू कलाकार अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते .

कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि सचिन खेडेकर येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.

सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ,खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे.

कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ६ लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणी करता आले. या वेळी प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. या पर्वात निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्ती देखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर , पोलीस उपनिरीक्षक ,महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन , एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर , फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील अशी विविध क्षेत्रांमधील स्पर्धक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून यंदाच्या करोडपतीच्या पर्वात सहभागी होणार आहेत

कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाच्या प्रारंभाविषयी बोलताना सोनी मराठी वाहिनीचे बिसनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले की, कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये कोण होणार करोडपती या रिअ‍ॅलिटी शोची लोकप्रियता आजही टिकून आहे. हु वॉन्ट्स टु बी अ मिलिओनेअर या अमेरिकेत गाजलेल्या शोच्या अनेक आवृत्त्या विविध देशात आपल्याला पहायला मिळतात. मात्र, भारतात हिंदी शोच्या यशवीतेनंतर सर्वप्रथम मराठी भाषेने हा शो सादर करुन त्यामध्ये वैविध्य आणले आहे.

सोनी मराठी वाहिनीचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके म्हणाले की आता कोण होणार करोडपतीमध्ये नवी लाईफलाईन आम्ही सादर करत आहोत. त्यामध्ये ऑडियन्स पोल, व्हिडीओ कॉल आणि नव्याने फ्लिम द क्वश्चन असे पर्याय असतील. पारितोषिकाची रक्कम तीच असली तरी प्रश्नांमधल्या विविधतेने शो अधिक रंगतदार होईल. शिवाय आठवड्यात सहा दिवस प्रेक्षकांना घरबसल्या ह्या शोच्या माध्यमातून दर्जेदार करमणूक मिळणार आहे.

कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालक आणि अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले की,हिंदीमध्ये अमिताभ बच्चनसारख्या कालातीत श्रेष्ठ कलाकाराने अजरामर केलेला शो मराठीमध्ये सातत्याने मला करायला मिळत आहे, हा मी माझा सन्मान समजतो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असलेल्या विविध स्पर्धकांची सुखदु:खे जाणून घेताना मी अभिनेता म्हणूनही अधिक समृद्ध होत आहे. आता प्रेक्षकांच्या उपस्थितीत समोरासमोर हा अद्भुत खेळ खेळताना येणारा थरार प्रेक्षकांनाही अनुभवता येणार आहे.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम टीव्हीवर पाहता-पाहता सोनी लिव्ह ॲपवर प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’ आणि जिंकू शकतात भरपूर बक्षिसं आणि हॉटसीटवर येण्याची संधी. पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’. ६ जूनपासून सोम.-शनि., रात्री ९ वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *