नुकताच इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपन्न झाला. गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सामना जिंकून इतिहास रचला. हा सीझन संपल्यानंतर सोशल मीडियावर एक संदेश वेगाने प्रसारित झाला. ज्यामध्ये टाटा तीन महिन्यांसाठी 599 रुपयांचे विनामूल्य रिचार्ज ऑफर करत आहे.
व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे कि, टाटा आयपीएल (Tata IPL) ऑफर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) फायनल मध्ये जिंकल्याच्या आनंदात टाटा सर्व भारतीय वापरकर्त्यांना 599 चा तीन महिन्यांचा रिचार्ज फ्रि मध्ये (Free recharge offer) देत आहे. या सोबतच https://mahacashback.online हि लिंक देऊन आपल्या नंबरवर रिचार्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्हायरल दावा खरा की खोटा?
टाटा आयपीएल फ्रि रिचार्जचा व्हायरल दावा खोटा आहे, कारण IPL किंवा TATA ने फ्रि रिचार्ज देणार अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. IPL किंवा TATA च्या अधिकृत वेबसाइटवर देखील अशी कोणतीही घोषणा किंवा ऑफर सापडणार नाही. तसेच mahacashback या नावाने कोणतीही वेबसाइट IPL किंवा TATA ने लॉन्च केलेली नाही. त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
टाटा आयपीएल नावाने व्हायरल झालेला फ्रि रिचार्जचा दावा खोटा असुन ही वेबसाईट तुमचा वैयक्तिक डेटा किंवा इतर आवश्यक तपशील कॅप्चर करू शकते. यातून तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते. त्यामुळे मेसेजला जोडलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच हा मेसेज इतरांना फॉरवर्ड करण्यापासून रोखा.