कोल्हापूर : एक्साइजचे उपायुक्त यशवंत पवार यांचा सत्कार करताना अॅडव्होकेट धनंजय पठाडे सोबत अमोल कुरणे,संतोष आठवले,शिवराज ससे आदी.
कोल्हापूर दि.३१ (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग एक्साइजचे कोल्हापूरसह पाच जिल्ह्याचे विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जनसंघर्ष क्रांती मोर्चा तर्फे अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या यशवंत पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कर्तव्यदक्ष अधिकारी, उपायुक्त पदापर्यंत यश संपादन केले असे मनोगत अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी अमोल कुरणे,जनसंघर्ष क्रांती मोर्चाचे संस्थापक संतोष आठवले,शिवराज ससे,कोच दिलीप कदम,फिरोज सतारमेकर आदी उपस्थित होते.