नवे दानवाड ता. शिरोळ येथील ग्रामपंचायतीने 31/05/2022 रोजी गावसभा आयोजित करून विधवा प्रथा बंदीचा व जात पंचायत प्रथा बंदी बाबतीत ठराव घेण्यात आला.
गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती वंदना हरिश्चंद्र कांबळे यांचे पती समाजभूषण स्मृ. हरिश्चंद्र कांबळे यांचे 8 मे 2021 रोजी निधन झाले पण पतीच्या निधनानंतर सरपंच वंदना कांबळे यांनी कधीच मंगळसूत्र कपाळावरील कुंकू, बागड्या काढले नव्हते. गावामध्ये डिजिटल फलक वर ही सरपंच यांचे फोटो हे मंगळसूत्र व कुंकू सह असायचा. सरपंच यांनी गावामध्ये कितेक विकास कामांचे शुभारंभ हे विधवा महिलेच्या शुभ हस्ते करतात. सरपंच कुटुंब शाहू,फुले, आंबेडकर विचाराचा असल्याने व पती समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे पुरोगामी विचाराचे असल्याने सरपंच कुटुंबामध्ये विधवा प्रथेला पूर्वीपासून थारा नाही.
गावामधील विधवा महिला जर पुनर्विवाह करीत असेल तर ग्रामपंचायत आपल्या ग्रामनिधी मधून 20 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून पुनर्विवाह करणाऱ्याला देण्यात येईल तसेच विधवा महिला जर मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या न काढता समाजामध्ये वावरत असेल तर त्या विधवा महीलेचा घरफाळा व पाणीपट्टी तीन वर्षे माफ करणे असे ठराव ही घेण्यात आला.
गावामध्ये विधवा, परितक्ता, वृध्द महिला यांना शासन मार्फत योजना हे ग्रामपंचायत स्तरावरून मोफत पाठपुरावा करण्यात येईल.
गावामध्ये जात प्रथा बंदी बाबत महत्वाचे ठराव घेण्यात आला. एखादा कुटुंबावर जर एखादे समाज बहिष्कृत टाकीत असेल तर संबंधितावर कारवाई करण्यात येईल. बहिष्कृत कुटुंबाच्या बाजूने संपूर्ण गाव उभे राहील असे प्रकारचे ठराव सर्वानुमते घेण्यात आले.
यावेळी माजी सरपंच संजय धनगर, प्रकाश परीट, सामाजिक कार्यकर्ते राहुलराज कांबळे, सदस्य शहणुर गवंडी, कमल कांबळे, संगीता कांबळे, शोभाताई परीट, अंगणवाडी सेविका मदतनीस , महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.