कबनूर -ऑल इंडिया ह्यूमन राइट्स दिल्ली पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर युनिटचे अध्यक्ष डी.ए.बाणदार बाबा यांचा आज ५९ वा वाढदिवस कबनूर येथील मराठी शाळेजवळील ऑफिसमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी त्यांच्याकरता उत्तम आरोग्य व भरपूर आयुष्य मिळूदे याकरता सर्वांच्या कडून प्रार्थना करण्यात आली. वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी बाणदारबाबा यांनी परमेश्वराने मला दिलेले संपूर्ण आयुष्य सूफी संतांच्या विचाराने अध्यात्म मार्गातून हजरत शहानुरबाबा व हजरत जंदिसो-ब्रांनसो यांच्या आशीर्वादाने सामाजिक कामे करत राहणार असून समाजासाठी आपण मानवी आयुष्यामध्ये काहीतरी देणे लागतो याची जाण आणि भान ठेवून इथून पुढील आयुष्यातही माझ्या परीने जितके मला करता येईल तितके सामाजिक कार्य व गोरगरिबांना मदत करत राहणार असून त्याकरता मला तुम्हा सर्वांची साथ असणे आवश्यक आहे आपण सर्वजण मिळून सामाजिक कामे नेटाने पुढे नेऊ असे अभिवचन दिले.
सदर प्रसंगी ऑल इंडिया ह्यूमन राइट्स दिल्ली पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर युनिटचे पदाधिकारी साजिद शेख, चंदुलाल फकीर,दीपक पेटकर, श्रीकांत कांबळे,डोणेमामा इत्यादी हजर होते.
Posted inकोल्हापूर
ऑल इंडिया ह्यूमन राइट्स दिल्ली अहिरा पश्चिम महाराष्ट्रा कोल्हापूर युनिटचे अध्यक्ष डी.ए.बाणदार बाबा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
