अकोला : अकोला पॅटर्नने दिला सेना – राष्ट्रवादी- प्रहार, भाजप आणि काँग्रेसला हरवून हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या लिना सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत.
अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या मार्गदर्शना अंतर्गत हा विजय सुनिश्चित केला आहे.
याबाबत प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील हातरुण सर्कलच्या पोट निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार लीना शेगोकार या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. हा विजय खेचून आणणार्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि लिना शेगोकार यांचे हार्दिक अभिनंदन.
वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार. मुस्लिम, ओबीसी, दलित, भटके सर्व समुहातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचा पर्याय स्वीकारल्याचे हे द्योतक असून महाराष्ट्रात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाची ही नांदी आहे.
या निवडणूकीत लिना शेगोकार यांना ४३०१ मते पडली. हा विभाग माहिलांकारिता राखिव झाल्याने इतर पक्षातील महिला उमेदवार रिंगणात होत्या.