महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल (HSC EXAM Results) कधी लागणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ८ जून म्हणजेच उद्या, बुधवारी हा निकाल लागणार आहे. उद्या दुपारी १ वाजता हा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्याआधी कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने परीक्षा झाल्या नव्हत्या. यावर्षी कोरोना आटोक्यात आल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यानंतर कोरोना आटोक्यात आल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. आता यातल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे.
‘या’ अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून निकाल पाहू शकतात.
1) maharesult.nic.in
2) hscresult.mkcl.org
3) hsc.maharesults.org.in
4) lokmat.news18.com
5) mh12.abpmajha.com
6) indiatoday.in/education-today/results
‘असा’ तपासा निकाल
👉🏻महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या वरील अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.
👉🏻होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
👉🏻तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
👉🏻तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.
महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदाही बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.