कबनूर ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये विधवा भगिनींच्या हस्ते उभारली स्वराज्याचे गुढी पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला आर्थिक मदत शिवराज्याभिषेक दिनी ग्रामपंचायतीची घोषणा
कबनूर-( प्रतिनिधी चंदुलाल फकीर) हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीने विधवांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या हस्ते स्वराज्याची गुढी उभारली. हा उपक्रम राबवून विधवांना सन्मान देणाऱ्या कबनूर ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.गावातील विवाहइच्छुक विधवा महिला विवाह करणार असतील तर त्यांना कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने ११,००१ रुपयांची आर्थिक मदत देण्याचे या कार्यक्रम प्रसंगी कबनूर ग्रामपंचायत सरपंच शोभा पोवार यांनी याबाबतची घोषणा केली.येथील ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात शिवस्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातील विधवा महिलांना या कार्यक्रमाचा मान देऊन कबनूर ग्रामपंचायतीने नवीन चांगला उपक्रम राबवला. विधवा महिलांच्या हस्ते शिवशक राजदंड व शिवध्वज गुढीचे पूजन करण्यात आले जयश्री गोपाळ परीट, श्रीमंती चौगुले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले कबनूर ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवून विधवा महिलांना सन्मान दिला आहे. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग, प्रमोद पाटील,अशोक पाटील, माजी सरपंच मधुकर मणेरे, मिलिंद कोले,समीर जमादार, सुधीर लिगाडे, वैशाली कदम, सुनिता आडके, अर्चना पाटील, रोहिणी स्वामी, रजनी गुरव,सुलोचना कट्टी आदि ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
कबनूर ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये विधवा भगिनींच्या हस्ते उभारली स्वराज्याचे गुढी पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला आर्थिक मदत शिवराज्याभिषेक दिनी ग्रामपंचायतीची घोषणा
