Maharashtra12th Results 2022: राज्यातील बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडं राज्याचं लक्ष होतं. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.२१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा ९०.९१ टक्के लागला आहे.
⭕कोकण विभागाचा सर्वाधिक टक्के निकाल
कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२१ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९०.९१ टक्के निकाल आहे.
⭕नागपूर विभाग राज्यात दुसरा, निकाल ९६.५२ टक्के
कोकण विभागानंतर नागपूर विभागाचा निकाल हा ९६.५२ टक्के लागला आहे. नागपूर विभागातून एक लाख ६० हजार २८ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील एक लाख ५९ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यातील १ लाख ५३ हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९६.५२ टक्के इतकी आहे.
⭕विभागनिहाय आकडेवारी
कोकण विभाग: ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५