आनंदाची बधिरता आणि सौंदर्य बोध

आनंदाची बधिरता आणि सौंदर्य बोध

आनंदाची बधिरता आणि सौंदर्य बोध

सौंदर्य आणि आनंद हा मानवी जीवनाचा ध्यास असतो सौंदर्य व आनंदासाठी धावणारा आधुनिक उत्तर काळात जनप्रवास वेगवान पने वाढतो आहे हि खूपच चांगली बाब आहे. पण या जन प्रवासाचे सौंदर्य आकलन काय आहे ?या प्राप्तीच्या प्रवासाला आनंद म्हणजे कायआहे? हे समजून घेण्याची गरज वाटत का? आणि त्याच्या बेदरकार भाषेत सांगावयाचे झाल्यास त्यांनी ती समजून तरी का घ्यावी ? सौंदर्य आणि आनंद ही सापेक्ष गोष्ट असेल तर सौंदर्याने आनंदा चे आकलन करून घेण्याची गरज असत नाही .
सौंदर्य ही रचना असते सौंदर्य ही मांडणी असते सौंदर्य ही संगत घटकांची निर्मिती असते सौंदर्य हा साधलेला परिणाम असतो सौंदर्य ही संकल्पना नसते सौंदर्य ही सार्वत्रिकता ही नसते सौंदर्याची निर्मिती ही आकलनाची अविष्कृत कृती असते सौंदर्याला अभिरूची पूर्वअट असते अभिरुची शून्य सौंदर्य मौलिक ठरत नाही. सौंदर्याच्या अभिरुचीचे व आकलनाचे राजकारण समाजात सततचालू असते बाजार पेठा कला क्षेत्र व उच्च जन जाती हे कुटील राजकारण करीत असतात. ते रंग रचना साध्य परिणाम दृश्य संवेदनेचे आस्वादक घटक यांच्या समीक्षा उदात्तीकरनातून सौंदर्याला परिमाण आणि निकष प्राप्त करून देतात .ते च ठरवीत असतात मुक आर्ध साक्षर समाज ते .स्वीकारण्यात धन्यता मानतो .आणि त्यातूनच रुजलेल्या सौंदर्याच्या व्याख्या करण्याचा अधिकार प्रभुत्व वादी स्वतःकडे घेत असतात सौंदर्याची व्याख्या हे प्रभुत्व वादी यांच्या शोषणाचे आणि निरंतर मालकी हक्काचे अदृश्य हत्यार असते ते एक स्वायत व श्रेष्ठ असे आबाधित क्षेत्र स्वयं म श्रेष्ठत्व इतरांनी मान्य करावे म्हणून तयार केलेले असते . त्यातूनआनंदाची बधिरता व सौंदर्य बोध हा दुर्बल पने पुढे जात असतो त्या बाबत बदलाचे सजग प्रयत्न होत नाहीत म्हणुन आनंद आणि सौंदर्य या विषयी थोडेसे
सौंदर्यही संकल्पना नाही हे अशासाठी नमूद करता येते की ती रचनात्मकता जरी.असली तरी संकल्पनेच्या व्याख्येमध्ये ची मांडता येत नाही . कारण सौंदर्याचे आकलन ही स्वतंत्र व सापेक्ष संदर्भ निहाय बदलणारी अशी गोष्ट असते ही स्वतंत्रता हेच सौंदर्याचे श्रेष्ठत्व आहे. सौंदर्याला सार्वत्रिकता व निश्चितता नसणे हेच सौंदर्याचे सामर्थ्य ठरते सौंदर्य ही आंतरिक अभिरुचीची आकलन विकसनाची गोष्ट असते .यामध्ये संवेदना रचना रंग बुद्धी सरलता आसक्ती विवेक समर्पण या संख्या घटकांचा परिणाम साध्य झालेला असतो .त्यामुळे या एका संघात घटकातून निर्माण झालेले सौंदर्य प्रारूप अभिरुची कर्त्याची निर्णय गोष्ट असते .म्हणून अभिरुचीचे शोध अभिरुची ची निर्मिती समाज करीत असतो. प्रभुत्व वाद्यांचे या क्षेत्रावर प्राबल्य असते प्रभुत्व वादी हे अभिरुचीची ओजी वहात असतात. त्याचेच अनुकरण इतरजण समाज करत असतो त्यामुळेच जनसामान्यांच्या जगण्यातील सौंदर्य आणि आनंद हे नेहमी हेलकावे खात असतात .ते प्रभुत्व त्यांच्या अनुकरण व स्वीकार या दिशेने धावत असलेले दिसून येतात .
सर्व समाजच या प्रभुत्व जातींनी वर्गांच्या सांस्कृतिक वर्तनाच्या नेणिवेच्या प्रभावाचा गुलाम झालेला असतो. त्यामुळेच समाजामध्ये सौंदर्य आणि आनंद हा एका दिशेने धावून मिळत आहे .असे कृतक समाधान मानून गर्दीचा समाज पुढे चालला आहे अभिजन वाद्यांच्या सांस्कृतिक व प्रभुत्व जाणिवांना आता दृश्य स्वरा संगीताच्या अविष्काराचे गतीमान साधन प्राप्त झाले आहे .त्यामुळे सौंदर्य म्हणजे रंग आनंद म्हणजे प्राप्ती उपभोग या भावनांचे बळी बहुसंख्यांक वर्ग जात असलेले आढळून येत आहेत सौंदर्य हीसुद्धा एक त्या समय कालातील अभिरुची कर्त्यालाप्रतीत झालेली अपवादात्मक गोष्ट असते.
सौंदर्य हे अस्तित्व निरपेक्ष नसते .आणि आनंद हा व्यक्तिनिरपेक्ष नसतो ही दोन्ही विधाने सौंदर्य आणि आनंदाची सामर्थ्य आणि विस्तृत सुचित करतात. अस्तित्व असणे आणि दिसणे असे असते आणि आनंद हा व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्ती शून्य असाही असू शकतो.
म्हणून आनंद आणि सौंदर्य यांचे एकृप्ता निर्माण करता येते असेही नाही
सौंदर्याची स्वतंत्रता हे सौंदर्याचे सामर्थ्य आहे सौंदर्याची स्वायत्तता हे सौंदर्याचे श्रेष्ठत्व करण्यासारखे आहे सौंदर्य हे वस्तू व्यक्तिनिरपेक्ष असते सौंदर्याला सिमीत ता असत नाही. ही आकलनाला सीमित असते रच नेला सीमित ताअसते आणि स्वाभाविकपणे आकलनाच्या मर्यादा हा सौंदर्याचा अपमान ठरतो अभिरुचीची शून्यता हे सौंदर्याचे मरण असते. म्हणूनच सौंदर्य आणि आनंद जीवन साध्य प्राप्तीसाठी धावणार्या जनप्रवासाला अभिरुची आणि आकलन रचना आणि परिणाम स्वायत्तता आणि निरपेक्षता वस्तू आणि सापेक्षता या अनेक घटकांच्या अकल्पित कारणांनी किंवा पूर्व रचनेच्या मांडणीने सौंदर्य प्रतीत होते .हे निर्माण होते ते दृश्य रूपाला येते ते आस्वाद वादकाला हवे असते आस्वादक म्हणजेच त्या सौंदर्य अनुभूतीच्या मनस्थिती ती व्यक्ती होय मनस्थिती ती त्या भवतालच्या परिणामावर अवलंबून असते .
सौंदर्य आनंद ही त्यातून साध्य होणारी गोष्ट असते पण मनस्थिती वर अवलंबून असलेल्या सौंदर्याची ची मान्यता हीसुद्धा वर्ग आणि वर्ण जाणिवांच्या मुळे बाधित झालेले असते .किंबहुना भारतीय समाजात सौंदर्याची मान्यता ही वर्ण जाणीवा यांनीच निर्धारित केलेली गोष्ट आहे .

भारतीय सौंदर्य जाणिवा या स्पर्श जाणीव आहे भारतीय सौंदर्य जाणिवा या शोषण प्रेरणा आणि विकृती आहेत भारतीय सौंदर्य आकलन हे तुच्छता आणि द्वेष यामुळे नेहमी बाधित झालेल्या भारतीय सौंदर्य संकल्पना ही ज्ञानात्मक गोष्ट नाही .भारतीय सौंदर्य आकलन हे अनुभव कोशातून पुढे आलेले वर्णनाने सिद्ध झालेले भाषेने लागलेले दृश्याने सादर झालेले असे आहे .त्यामुळे भारतीय सौंदर्य आणि आनंद यांच्यातील साचेबंदपणा हा सौंदर्याचा बधीर बोध झाला आहे हे अशासाठी नमूद करावे लागते. की सौंदर्याची स्वतंत्रता रचनेतील आकस्मात अता हे प्रतीत होणारे ज्ञान अद्याप प्राप्त न झालेला समाज असाच सौंदर्य आणि आनंद या दिशेने मालकी आणि शोषण प्राप्तीसाठी धावतो आहे .

भारतातील सर्व क्षेत्रातील सौंदर्य आणि आनंद यांचा पदोपदी अपमृत्यू उपेक्षा आणि अवेल न होत असलेली दिसून येते हे होऊ द्यायचे नसेल तर ज्ञान आणि अभिरुची मनस्थिती आणि रचना भवताल आणि मांडणी सादरीकरण आणि आविष्कार यांची साक्षरता वाढवावी लागेल. सौंदर्याचे शास्त्र ही सूत्र रुपाची गोष्ट नाही .तो सिद्धांत नाही ती सार्वत्रिक समीकरणाची गोष्ट करता येत नाही हे आंतरिक निर्णय आणि कौल असतात. हे समजावून घेणारा स्थिर मनस्थितीचा जन प्रवास व्हायला हवा जन प्रवासाची सौंदर्य साक्षरता ही ज्ञान साक्षरता आहे हे अनुभव साक्षरता आहे .सौंदर्य साक्षरता ही संवेदन विकसनाची जी अवस्था आहे .संवेदन हे भिन्न प्रकारचे असते . ती त्या व्यक्तीची उस्फूर्तता असते इथेच संवेदनांचे आणि रचना संघात हे सौंदर्य निर्माण करतेच पण याला सीमित असते. त्या व्यक्तीच्या मर्यादा असतात पण हे स्थलकाल प्रदेश संस्कृती आणि इतिहासाच्या बोध परंपरा तून सौंदर्याचे अविष्कार जपणारा समाज पुढे चालत असतो मुळात थोर तत्वज्ञ कांट म्हणतो. त्याप्रमाणे संकल्पना आणि संवेदना यांचे नियम पूर्वक व्यवस्थापन केले तरच त्यातून ज्ञानाची निर्मिती होते. आणि या ज्ञान निर्मीतीचा अविष्कार ही एक सौंदर्याची दृश्य अनुभूती असते .ते संसलेशन रूप असते तो ज्ञान अनुभव असतो म्हणून सौंदर्याच्या साक्षरतेत नियम नसतात तो दृश्य ज्ञान अनुभव असतो .ती त्या व्यक्तीची ज्ञान अभिमुखता असते म्हणून सौंदर्य आणि आनंद हे परस्पर सहकार्यातून प्राप्तीतून एकमेकाला सशक्त करणारे स्वरचित व उस्फुर्त घटक असतात एवढे तरी समजून घेण्याची नितांत गरज आहे .

वर्ण जाणिवांनी बाधित झालेली सौंदर्य साक्षरता पुन्हा एकदा अस्तित्व स्वीकारा च्या शोषण विरहीत तेच्या आधारे मांडायला हवी. तरच धर्म जात वर्ण वंश यांनी बाधित झालेली सौंदर्य साक्षरता ही पुढे जाईल असे वाटते.

शिवाजी
राऊत प्रेस
सातारा 8 जून22 6.32

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *