बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहतांना गडबड करू नये व गोंधळून जाऊ नये.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहतांना गडबड करू नये व गोंधळून जाऊ नये.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकाल पाहतांना गडबड करू नये व गोंधळून जाऊ नये.

युपीएससीच्या निकालावर नाव, आडनाव व रोल नंबरच्या एक डिजीट मिस्टेकमुळे गोंधळ

राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता व उरी धाकधूक लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार दि. ८ जून रोजी दु्पारी १ वाजता लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवार दि.८ जून २०२२ रोजी दपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल.

बुधवार दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच ‘एबीपी माझा’च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मात्र यावर्षी बारावीची परीक्षाच १५ दिवस उशिराने झाल्यामुळे निकालही थोडाफार उशिरा लागत आहे.

यावर्षी तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com व mh12.abpmajha.com वर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना झटपट आपला निकाल पाहता येणार आहे.

या निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयामध्ये मिळालेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत शुक्रवार दिनांक १० जून ते सोमवार दिनांक २० जून अशी असेल.

फोटोकॉपी कधी मागवता येणार?या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी बोर्डाकडून मागवता येणार आहेत. त्यासाठीची मुदत ही शुक्रवार दिनांक १० जून ते बुधवार दिनांक २९ जून अशी असणार आहे. वरील दोन्ही अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. हा अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे क्रेडिट वा डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरावे लागणार आहे.

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी सर्वप्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत घेतल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे. त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधी संधी? तर फेरपरीक्षार्थींसाठी जुलै-ऑगस्ट मध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवार दिनांक १० जूनपासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्या बाबतचे परिपत्रक स्वतंत्र्यपणे काढल्या जाईल.

बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका या त्यांच्या महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक १६ जून दुपारी ३ वाजता देण्यात येतील.

  शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *