शनिवार दिनांक 11 मे रोजी ठीक सकाळी अकरा वाजता सांगली निवारा भवन येते जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांचे तिसरे जिल्हा अधिवेशन
सध्या देशामध्ये दहा लाखापेक्षा जास्त आशा v गट प्रवर्तक महिला काम करीत आहेत. Kovid 19 भयानक महामारी काळामध्ये देशातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली आहे. त्यापासून अनेक रुग्णांना जीवदान देण्यामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटने कडून देशातील आशा व गटप्रवर्तक महिलांचा गौरव केलेला आहे. परंतु भारत सरकार मात्र या आशा व गटप्रवर्तक महिलांची केवळ कोरडे अभिनंदन करून प्रत्यक्षात त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे नाकारलेले आहे.
तसेच सध्या राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियान देशातील सर्वच शहरांमध्ये सुद्धा राबविली जात आहे. परंतु शहरातील अशाना ग्रामीण भागातील आशांच्या प्रमाणे लाभ सर्व मिळत नाहीत. शहरातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या बाबत स्थानिक स्वराज्य संस्था मनमानी प्रमाणे आशा व गट प्रवर्तक यांच्याकडून सक्तीने काम करून घेत आहेत त्याबाबत निश्चित धोरण शासनाने अजूनही नक्की केले नाही म्हणून त्यावरील विरुद्ध संघर्ष महिलांना करावा लागणार आहे
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा पंचवीस हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे ही ठोस मागणी आहे.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आठ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार वीस पासून महाराष्ट्र शासनाने नवीन वेतन श्रेणी देऊन त्यांच्या वेतनाचे सुसूत्रीकरण केलेले आहे. परंतु महाराष्ट्रातील चार हजार गटप्रवर्तक महिला कंत्राटी कर्मचारी असून सुद्धा त्यांना त्या लाभापासून महाराष्ट्र शासनाने वगळलेले आहे. हे अत्यंत अन्यायकारक असून महाराष्ट्रतील चार हजार गटप्रवर्तक महिलांच्यामध्ये महाराष्ट्र शासनाविरुद्ध असंतोष वाढत चाललेला आहे.
म्हणूनच महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महीलांच्या मागण्यांच्या संदर्भात विचारविनिमय करून पुढील आंदोलन निश्चित करण्यासाठी शनिवारी ठीक सकाळी 11 वाजता आशा व गटप्रवर्तक महिलांचे महत्वाचे तिसरे अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या अधिवेशनास सांगली जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान करणारे पत्रक महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.