संतोष आठवले शिवछत्रपती प्रेरणा पूरस्काराने सन्मानित
कोल्हापूर :वसुंधरा सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने मादळे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला जनसंघर्ष क्रांती मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष संतोषजी आठवले यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर साहेबांच्या शुभहस्ते शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
संतोष आठवले यांनी भूमिहिनांचा सत्याग्रह , अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त जाती जमाती व ओबीसी यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नाच्या संदर्भात शासनस्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचा प्रयत्न करत असतात .नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी सुद्धा त्यांनी अनुसूचित जाती व जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा मिळावा व अनुसूचित जाती जमाती उपयोजनेचा निधी अखर्चीत ठेवणे किंवा इतर खात्यामध्ये वळवणे याला कडाडून विरोध करून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण केले होते .अनुसूचित जाती जमाती चा पैसा अखर्चीत ठेवणे किंवा इतरत्र वळवूनये यासाठी कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश ,तेलंगणा या राज्य प्माणे महाराष्ट्रातही कायदा करावा कंपोनेंट प्लॅन अॅक्ट व्हावा यासाठी जनसंघर्ष लढा त्यांनी सुरू केला आहे या कार्याची दखल घेऊन वसुंधरा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने त्यांना यंदाचा शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वसुंधरा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज कडोलकर सौ माधुरी जाधव अमोल कुरणे आदीच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर . मादळे गावचे सरपंच ,पोलिस पाटील ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष . ग्रामपंचायत सद्स्य ,आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते