आम्ही हारी
मनूच्या दारी

आम्ही हारी<br>मनूच्या दारी

आम्ही हारी
मनूच्या दारी

व्यक्ती आणि समाज यांच्या मनात सतत असंतोष धगधगत असतो. समाजाचा असंतोष हा व्यक्ती च्याच असंतोषाची परिणीती असते. समाजाचा असंतोष हे त्या वर्तमानाचे राजकारण असते. पण व्यक्तीचा असंतोष हा समाजाच्या असंतोषाचे प्रेरक चेतक रूप असते .त्यामुळे असंतोष आणि व्यक्ती असंतोष आणि समाज यांचा कारण शोध घेत राहणे हे व्यक्ती आणि समाजाला समजून घेणे असते .व्यक्तीही वर्तमानाच्या सर्व परिणामाचे आघात सहन करीत जीवन व्यतीत करणारी संघर्ष प्रेरणा रूप असते थोडक्यात व्यक्तीही स्वयम् स्वार्थ आणि.आघात सहन करीत कधी कर्तुत्व कधी संधी ला धन्यवाद देत पुढे जाते असते अशा संघर्षाची ओझी घेऊन पुढे जावे लागणार आहे हा समग्र समाज असाच असतो समाजाचे अंतरंग हे गुंतागुंतीचे असतात त्यात इतिहासाचे धूर्त राजकारण असते प्रभुत्व जातीच आर्थिक राजकारण असते सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचा अहंकारी तोरा असतो तर शैक्षणिक संस्था क्षेत्रातील सम्राटांचा शिक्षण देतो भाकरी देतो असा अहंकार असतो राजकारण क्षेत्रात तर ते सप्त स्वर्गातील देव असतात अशा थाटात त्यांचे भूलो का वरील वर्तन असते

त्यामुळे प्रत्येक व्यक्ती अंतरिक पातळीवर किती दुभंगलेला असू शकतो याची कल्पना करता येत नाही व्यक्ती म्हणजे अंतर्गत संघर्ष व्यक्ती म्हणजे वर्तमानाशी उघड आव्हान देता येत नाही म्हणून समाजाच्या बरोबर वाटचाल करीत स्वीकारलेली शरणांगत असते तरीही अशा व्यक्ती या सामाजिक शांतता सद्भाव हा बाळगलेला आहे तो वाढत आहे असे दाखवून सांगून समाज हा दैनंदिन जन व्यवहार करीत असतो अशा या समाजामध्ये अंतर्गत संघर्षाचे स्वरूप किती खोल असते किती भिन्न भिन्न असते ते उघड कधी होते अंतर्गत संघर्षाचे मूल्यमापन करण्याची गरज असते का? अंतर्गत मूल्यमापन समजून घेतले तर समाजातील वर्तमानाचे व्यवस्थापन आणि पुनर्मांडणी करता येते का? त्याची गरज असते का ?या अनेक प्रश्नांच्या बद्दल सभोवतालचा सर्व समाज आणि व्यक्ती या उदासीन असतात त्या ज्ञानाच्या अवस्थेत जगतात असे म्हटले तर ते वावगे होणार नाही अंतर्गत संघर्ष ही व्यक्ती द्वेषाची गोष्ट असते पण व्यक्ती द्वेष हे इथल्या सामाजिक जीवनाची एक मेकाला मिळालेली परिणाम भेटत असते द्वेष करणे हेच स्वतःचे श्रेष्ठत्व आहे असा येथे सामाजिक जीवनाचा पाया घातला गेला आहे त्यामुळे निरपेक्ष नाती समतेची नाती बंधुभावाची नाती विश्वासाची नाती या समाज जीवनात अभावानेच आढळून येतात त्यांच्या अनुभूती येते असे हे आश्वासक आधाराचे पर्यावरणाचे नसल्यामुळे संशय आणि भय बाळगून प्रत्येक व्यक्ती सभोवताली आधार शोधत वाटचाल करीत असतात आपले आधार हे आपले सद्गुण आहेत आपल्या निष्ठा आहेत असे स्वतः गृहीत धरतात आणि सामाजिक आधाराच्या बळावर जीवनभर मार्गक्रमण करीत असतात

प्रत्येक व्यक्तीचे अंतर्गत मानसिक पातळीवर दुभंगली असणे हे समाजाच्या व्यापक स्वरूपातील विघटनाचे लक्षण आहे अंतर्गत मानसिक पातळीवरील संघर्ष याची सर्व कारणे समाजाच्या जन व्यवहारात आहेत भेदभाव विषमता दारिद्र्य अत्याचार फसवणूक स्त्री-पुरुष भेद वांशिक तुच्छता वाद श्रम आणि शोषण हक्क आणि अधिकार या सर्वांच्या पासून सतत माणूसपण हिरावून घेणे आणि शोषित घटक म्हणून त्याचे अस्तित्व फक्त जिवंत ठेवणे ही या व्यवस्थेची खुबी आहे मरू न देणे आणि सशक्त जगू न देणे तो या व्यवस्थेतला प्रभुत्ववादी घटक तयार होता कामा नये
ही काळजी घेणारा कपट व्यवस्थेचा नायक अदृश्य नेणिवेचा मनू हा अंतर्गत मानसिक संघर्ष निर्माता आहे अंतर्गत संघर्ष हे संस्कार शिक्षण आर्थिक परिस्थिती सामाजिक स्थान रोजगार संधी आणि कौटुंबिक जीवनातली भिन्न-भिन्न आकलन पातळी यामधून मानसिक संघर्ष हा टिकून राहतो चालत असतो मानसिक संघर्ष हि स्वतःबरोबर चाललेली छोटी युद्ध कृती असते मानसिक संघर्ष याचे दोन प्रकार असतात एक त्या व्यक्तीने धारण केलेल्या मूल्यांच्या आग्रहाचा चाललेला संघर्ष हा एक असतो तर दुसऱ्या पातळीवर कुटुंब आणि समाज व्यवहारात स्वतःच्या अस्तित्वासाठी स्थान निर्माण करणे व रोजगार प्राप्त करणे यासाठी करावा लागणाऱ्या असंख्य प्रकारच्या रास्त चुकीच्या गोष्टी असतात एक प्रकारचा जगण्याचा संघर्ष असतो हा संघर्ष जीवघेणा असतो इथे टिकून राहणे खूप महत्त्वाचे असते आंतरिक संघर्ष दाखवावयाचा नसतो इथे संस्कृतिक मतभेदाला वाव नसतो इथे शैक्षणिक नकाराला कोणी स्वीकारत नाही अभिजन वाद्यांच्या दैनंदिन चाललेल्या प्रतिष्ठा गौरवाच्या सोहळ्यात मुख एक साक्षीदार होण्यापलीकडे जनसामान्यांना मनूच्या पर्यावरणात काहीएक स्थान असते मनूचे पर्यावरण ही भारतीय समाजाची खूप व्यापक गुंतागुंतीची अदृश्य अशी निरंतर गोष्ट आहे व्यक्तीच्या अपरोक्ष पणे कार्यरत असते परिणाम घडवते पण वर्तमानात दिसत नाही समता प्रस्थापित करते पण समतेचा गहिवर व्यक्त करते इतर जणांच्या जीवनाचे निर्मन शोषण करते मात्र कल्याणकारी असल्याचा दावा करते तुच्छता आणि द्वेष गुप्तता आणि कपट याच्या आधारे मनूचे पर्यावरण सतत तयार होत असते या तयार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था या बहू प्रतिष्ठित असतात तेच समाजाला करून आणि दया बांधिलकी आणि कळवळा त्याचे तुकडे वाटप करत असतात तेच इतर जणांना आधी मान्यता देतात ही आधी मान्यता देताना व्यवस्थेच्या विरोधातील असंतोषाचा उद्रेक होणार नाही ना म्हणून गौरव बक्षिसे पुरस्कार प्रतिष्ठान चे बहु उपयुक्त कार्य हे चालू ठेवतात आणि इतर जणांच्या त्यांचे श्रम शोषण करीत असतात जमीन अधिकार काढून घेत असतात इतर जनांना राजकीय व्यवस्थेतील समर्थक तयार करतात आहे स्वतः कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे गादीचे मालक तयार होतात मनूचे पर्यावरणवादी अंतर्गत कलहाचे व्यवस्थापक असतात समाजात केव्हा कधी प्रतिक्रिया याव्यात त्या कशा दाबल्या जाव्यात याचे व्यवस्थापन मनू पर्यावरणवादी करीत असतात या व्यापक परिणामामुळे व्यक्तीच्या अंतर्गत चाललेला संस्कृतिक जातिव्यवस्थेचा राजकीय असा जो संघर्ष चालू असतो तो प्रत्येक वेळेला व्यक्त होतोच असे नाही मुळात व्यक्तीच्या अंतरंगात चाललेल्या त्याच्या जाणीव नेणीव यांचा व क्रिया प्रतिक्रियांचा संघर्ष हा आधी व्यक्त होणे हे जिवंत समाजाचे लक्षण आहे परंतु संशय भीती आणि कपट यामुळे भ्रमित झालेला हा विभाजित समाज सतत शतखंडित होत राहतो आणि त्यांची आंतरिक अभिव्यक्ती ही शरण वादात रूपांतरित होते व्यवस्था थोडी कळते व्यवस्था गुड राहते व्यक्तीचे अंतर्गत कलहाचे वर्तन समाज आपल्या पोटात घेऊन पुढे चालत असतो त्यामुळे अशा समाजात नवनिर्माण सामाजिक शहाणपणाचा व्यापक पट नवसमाज निर्माण नवे निकोप अनुबंध निर्माण होत नाहीत आणि हा समाज मनूच्या कराल काळाच्या जबड्यात स्वतःहून जात राहतो आणि अंतर्गत संघर्षाचे विद्रोहाचे पाणी पेटणार अशा कवितांच्या मध्ये विझून जाते अंतर्गत संघर्ष हा भय कपटाच्या कारस्थानाला बळी पडतो आणि इथला हिंसा वाद हा नेहमी पुन्हा पुन्हा अंतर्गत कलहाला पराभूत करतो अंतर्गत खरे स्वरूप आहे अंतर्गत कलह ही व्यवस्था निर्माणाची अस्वस्थता आहे परंतु मनु पर्यावरण हे अमान्य करते म्हणून अंतर्गत कलह ही सशक्त आकलनाची प्रेरणा प्राप्तीची स्वयम् गोष्ट असते सामर्थ्य प्राप्त करीत करीत व्यवस्थेचे बुरुज ढासळत पुढे जाणे हा चा अंतर्गत कलहाचा निर्भय मार्ग असतो हा स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो म्हणून मनूच्या पर्यावरणात अंतर्गत कलहाची साक्षरता ही सतत प्राप्त करण्याशिवाय पर्याय नाही एहवां दाच्या जीवनाचे अनमोल महत्व समजावून घेणे तसेच जीवन जगणे आणि ज्ञान प्रेरणांच्या प्रभुत्वा चे राजकारण ही क्षमता प्राप्त करणे हा चा अंतर्गत कल हा वरील व्यक्ती पातळीवरील मानसिक संघर्षातील समस्या निरीक्षणाचा तो स्वतः शोधलेला उपाय असू शकतो
अंतर्गत संघर्ष ही व्यक्ती अस्तित्वाची सामर्थ्य पूर्ण ज्ञान गोष्ट असते ते व्यक्तित्वाचे घडणे असते ते मनूच्या पर्यावरणाला दिलेले आव्हान असते नव्या मानव्याच्या व्यवस्थेच्या निर्माणासाठी चे ते ज्ञान भान असते अंतर्गत संघर्ष ही दुःख शोधाची साधन असते स्वयम् आकलन वाढवले असते इतिहासाच्या असत्य जंजाळात स्वतः जाऊन कारण व शोधांचा घेतलेला तो शोधत असतो व्यक्तीचा आणि समाजाचा हा अंतर्गत संघर्ष ही नित्य गोष्ट असते त्याचे भय बाळगण्याची गरज नसते हा संघर्ष चालू असताना आपण कोणत्या बाजूला उभे आहोत याचा विवेक प्रत्येक व्यक्ति ला प्राप्त होणे हेच खरे अंतर्गत कलहाच्या साक्षरतेचे फलित असते साध्य असते असायला हवे अंतर्गत कलह हितसंबंधांची शोषणाच्या अबाधित व्यवस्थांची धूर्त कधी हिंसक तर कधी अ हिंसक लढाई असते यासच सामाजिक असंतोष म्हटले जाते या सामाजिक असंतोषाचे सर्व काळातील नायक हे मनूचे पर्यावरणवादी भक्त असतात हेच अंतर्गत संघर्षातून समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे अंतर्गत संघर्ष ही समाज विघटनाची भयकारी गोष्ट वाटते पण जो समाजच शोषण आणि संघर्ष यांच्या आधारे उभा आहे ते वर्तन येथे सातत्याने होत राहणार त्याचे भय वाढविण्याची गरज नाही फक्त शोषित आणि बळी जाणाऱ्या बहुसंख्यांक समाजाला या अंतर्गत कलहाच्या संघर्ष कारणाची ज्ञान साक्षरता धैर्य साक्षरता प्राप्त कोण आणि कशी करून देणार हे प्रत्येकाने आपल्या श्रम कृतीच्या पातळीवर आत्म परीक्षण करीत पुढे चालत राहणे हेच मनु पर्यावरणाचे नकाराचे विधायक राजकारण असू शकते हे समजून घेण्याची नितांत गरज आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात चाललेल्या मनो कलहाचा व्यापक अर्थ समाज व्यक्ती अस्वस्थपणा आहे संघर्ष अंतर्गत कलह ही मानवी अस्तित्वाला नित्य सोबत असते यातूनच स्वयम् नवनिर्माणाचे कमीत कमी शोषण व कमीत कमी मानव्याचा अव्हेर अशा व्यवस्थेच्या निर्माणासाठी सामूहिक प्रयत्नांच्या आधारे पुढे जाणे ह्या नव्या व्यवस्थांच्या निर्माणाचे हे मानवी जाते आहेत तिथे मुक्तिदायी मानवी अस्तित्व हे अंतिम निकष असतील त्यासाठी अंतर्गत कलहाला ज्ञान सामर्थ्याचा स्वयम् प्रयत्नातून पैलू पाडणे हाच प्रत्येक व्यक्तीच्या हाती असलेला एकमेव मार्ग असू शकतो

शिवाजी
रॉय त
सातारा 13 जून सातारा वेळ 9.15

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *