निरोगी सदृढ शरीर हेच मंदिर हाच मंत्र घेवून कार्यरत असलेले प्रशिक्षक : दिलीप कदम

निरोगी सदृढ शरीर हेच मंदिर हाच मंत्र घेवून कार्यरत असलेले प्रशिक्षक : दिलीप कदम

निरोगी सदृढ शरीर हेच मंदिर हाच मंत्र घेवून कार्यरत असलेले प्रशिक्षक दिलीप कदम महानगर पालिका प्रशासकीय नोकरीत करत असताना त्यामध्येच आपला सर्वतोपरी ध्यास ठेवत निरोगी आणि सुदृढ मंदिर हेच शरीर हा मंत्र जपत आयुष्यभर कार्यरत राहिलेले आणि शेकडो नव्हे तर हजारो युवकांना व्यायामातून करिअरची संधीही निर्माण करून देण्याची पाऊल वाट रुजवलेले कोल्हापूर महानगरपालिका व्यायाम शाळेचे प्रशिक्षक दिलीप कदमयांचा जीवनपट सर्वांनाच आदर्शवत आणि अनुकरणीय असाच आहे . सध्या ते सेवानिवृत्त झाले असले तरीही भल्या पहाटे उठून पोलिस – फौजदार सह विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांची फिजिकल चाचणी साठी मार्गदर्शन करणे आणि विविध सामाजिक उपक्रमात ते आजही सक्रिय आहेत . वडिलां या व्यायाम साधनेचा वसा आणि वारसा चालवत चालवण्याचे बाळकडू त्यांना बालपणीच मिळाले सदृढ शरीर असलेले दिलीप कदम यांचा लहानपणीच त्यांचा झालेला बाल शरीर सौष्ठव पटू म्हणून झालेला गौरव त्यांच्या भावी कार्यकर्तीचा एक महत्त्वाचा क्षण ठरला . कोल्हापुरात च महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर दुधाळी व्यायाम शाळेत ते प्रशिक्षक म्हणून दाखल झाले आणि तिथे ३४ वर्षं सुट्टी न घेता व्यायाम शाळा प्रशिक्षक म्हणून काम करताना शब्दश: त्यांनी स्वतःला झोकून दिले .अगदी खाजगी कॉपरेट वातानुकुलित व्यायाम शाळा च्या तोडीचे प्रशिक्षण व्यक्तीगत लक्ष घालत भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील युवकांना मार्गदर्शन करण्यात त्यांची ख्याती होती . महापौर कुस्ती स्पर्धा फुटबॉल स्पर्धा प्रमाणेच शरीरसौष्ठव स्पर्धा
नाही पश्चिम महाराष्ट्र व कोकणात एक मोठी प्रतिष्ठा होती . या या स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यात आपल्या सहकार्या बरोबर दिलीप कदम हे नेहमीच ‘जिथे कमी तिथे आम्ही या सेवाभावी वृत्तीने नेहमीच सक्रीय राहिले होते . त्यांच्या आजवरच्या वाटचालीत विद्यमान आयुक्त – प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्यापासून कायदा अभ्यासक अँड . धनंजय पठाडे यांचे लाख मोलाचे सहकार्य नेहमीच त्यांना लाभले आहे . त्यांच्या एकमेव सु पुत्राने कोल्हापुरात फुटबॉलपटू म्हणून नाव मिळत असतानाच रेल्वे पोलीस कडून तो वरिष्ठ पातळीवर खेळत आहे तसेच संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे . बुधवार पेठेतील मोठी परंपरा असलेल्या वाघाची तालमीचे अध्यक्ष पद भूषण या बरोबरच या तालमीस विविध सामाजिक पैलूंनी अधिकाधिक सक्रिय ठेवण्यात प्रशिक्षक दिलीप कदम यांचे मोलाचे योगदान राहिले आहे .आगामी काळाची च्या माध्यमातून आणि विविध प्रकारे सर्वांना व्यायामाचे महत्त्व पटवून देत व्यायाम आसन योगा पर्यंतच्या प्रसारासाठी सक्रिय राहण्याचा त्यांचा निर्धार हा एका एका तरुणाला लाजवेल असाच आहे त्यासाठी त्यांच्या उर्वरित कार्यास मनस्वी शुभेच्छा आपल्या लाखमोलाच्या शरीराची जखम जपणूक करणे आणि सुदृढ आणि निरोगी मन आणि शरीर यामधूनच सामाजिकता व्यक्त करता येते सामाजिक क्षेत्रात सक्रीय कार्य करता येते हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र असून तो आजच्या काळात ठरलेला आहे त्यामुळेच दीपक कदम यांचे यातून अधोरेखित झालेली आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *