जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांना माहिती देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांना माहिती देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांना माहिती देण्याचे आवाहन

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक, साहित्यिकांना एकसुत्रीय संदर्भ कक्षेत आणून ‘संदर्भ कोश’ निर्माण करण्याची योजना आहे. आगामी काळात हा कोश डिजीटल आणि छापील स्वरूपात तो प्रसिद्ध करून सर्वांना सहज उपलब्ध करावा. सर्व कलाकारांची माहिती सर्वांना व्हावी. अशी योजना असून यासाठी जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांना माहिती देण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी केले आहे.

या प्रकल्पात लेखक, कवी, कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, गजलकार, समिक्षक, पत्रकार, चित्रकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, सादरकर्ते, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, निरुपणकार, लोककलावंत, जलसाकार, गायक, वादक, संगीतकार, गीतकार तसेच ग्रामीण रंगभूमीवरील हौशी कलाकार आदींनी आपली माहिती देणे अपेक्षित आहे. प्रत्येक कला आपल्याला अमूल्य उर्जा देत असते. कलाकाराला स्वतःच्या कलेखेरीज इतरही कलेप्रतीही आदरभाव असतो. यातून चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण होत असते. या ‘संदर्भ कोश’ मधील माहिती पुण्यातील ‘प्रकाशन विश्व’ या साहित्यिक कोशात नोंद होण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे विभागीय सहसचिव श्रीराम चव्हाण हे तयार करत असलेल्या ‘मराठी साहित्यिकांचा कोश’ या महाराष्ट्र राज्य संदर्भ ग्रंथाच्या संकलनात ही माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. चव्हाण हे त्यांच्या संदर्भ ग्रंथामध्ये जन्मतारखेच्या अनुषंगाने शालेय उपक्रमासाठी हे संकलन करत आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. हा फॉर्म https://forms.gle/17vc1Q98otn4qLL29 या गुगल लिंकवर उपलब्ध आहे. ही माहिती करून मराठी भाषेत माहिती संकलित करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांनी २५ जून २०२२ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) पर्यंत ही माहिती पाठवून सहकार्य करावे असे आवाहन प्रा. संतोष गोनबरे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *