( वाचन समस्या शोध व उपाय)
मनोरंजन नव्हे विचारासाठीच वाचन हवे ___
शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या पैकी वाचन कमी होत चालल्याची मोठी समस्या आहे वाचन आणि विचार वाचन आणि स्मरण वाचन आणि आकलन वाचन आणि अविष्कार वाचन आणि अभिव्यक्ती याचा सूक्ष्म(परस्पर) संबंध शिक्षणामध्ये आहे .या दोन्ही घटकांच्या विकासामध्ये आकलन अभिव्यक्ती व विचार या दिशेने शिक्षणाचा विकास होणे महत्त्वाचे आहे. असे गृहितच सुरुवाती पासून धरलेले नाही त्यामुळे वाचन ही एक छंदाची आवडीची आणि अत्यावश्यक अशा अभ्यासाची गोष्ट ज्ञान बंदी घालणारा वर्ग याने बनविली आहे मुळात. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. वाचन हीसुद्धा एक निरंतर व्यक्ती विकासाची अत्यावश्यक गुण वैशिष्ट्ये ची बाब आहे
.शिक्षणामध्ये अक्षर वाचन यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. पायाभूत वाचन व लेखन कौशल्य गणिती क्रिया या मुलांना येत नाहीत. सध्या जगभर कोविड उत्तर काळात मुलांचे वाचन कमी झाले आहे असे संशोधन निष्कर्ष अहवाल पुढे आले आहेत त्यावर चर्चा होत आहे. सर्व स्तरावरील मुलांच वाचन कमी होत चालले आहे त्याची आवड निर्माण कशी करावयाची? सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना वाचता येत नाही ही समस्या तयार झाली आहे. यासाठी कोणते प्रयत्न करायचे यावर अधून मधून थोडा विचार होतो उपाय सुचविले जातात मुळात शिक्षणात वाचन नित्य वर्तन प्रक्रिया आहे पालक विद्यार्थी यांच्या मानसिकतेत रुजविलेलेच नाही त्यामुळे वाचन मुलांच्याअंगी बानवण्यासाठी शाळांनी कोणते प्रयत्न करायला हवेत ?यावर खूप अभिजन वाद्यांचे प्रयत्न सूचना शिक्षण क्षेत्रामध्ये सतत येत राहतात मुळातच विद्यार्थ्यांनी शिक्षक विद्यार्थ्यांनी पालक या तीन घटकांच्या मध्ये वाचन क्रियेला अनन्यसाधारण महत्त्व दिली जाते का ?याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
चित्रवाचन हे आवडणारे असते लहान मुले दृश्य चित्रांच्या द्वारे आशयाकडे जातात चित्रवाचन मुलांना रमविते चित्र वाचनामध्ये मुले गुंगून जातात प्राथमिक स्तरावर चित्र वाचनातून आशयपुर्ण गतिमान वाचनाकडे :/मुलांना नेता येते हे उद्यिष्ठ तरी प्राथमिक स्थरावर शाळानी ठेवली आहेत काय? समस्यांचा अवडंबर आणि कृती शून्यता ही शिक्षण क्षेत्रातील कायमची समस्या आहे. समस्यांच्या मुळाशी जाणे त्यावर सामुहिक विचार करणे आणि सामूहिक प्रयत्न करणे त्याची नितांत गरज असते हे होताना दिसत नाही
मुलांच्या वाचन क्षमता यांचा विकास ही एक समस्या आहे. या समस्येवर पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्न ची प्राधान्याने गरज किती प्रतीत जाहली आहे? याची खंत समस्या म्हणून ज्या समाजाला वाटत नाही तेथे हि समस्या नाहीशी करण्यासाठीचे प्रयत्न हि मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत याचे कारण शिक्षणामध्ये वाचन हे सर्वोच्च आहे. लेखन आणि श्रवण या दोन्ही क्रिया दुय्यम आहेत असा प्राधान्यक्रमही अद्याप शिक्षणक्षेत्रात ठरवण्यात आलेला नाही .मुळाक्षरे व त्यांच्या सयोग त्यातून तयार होणारा शब्द शब्दांचा अर्थ अशा अर्थपूर्ण शब्दांच्या रचनेतून तयार होणारी असंख्य निरंतर वाक्ये हि कशी होतात ? ती कशी स्वत तयार करायची याचा विचार शिकवला जात नाही त्या भाषा विषयाबाबत फकत व्याकरणा मध्ये अपवादात्मक रित्या हे शिकवला जातो मात्र हे अक्षर वाचन वाक्य वाचन व अर्थ वाचन या विकसित तेकडे पोहोचवीत नाही. याचे कारण भारतीय शिक्षणामध्ये अक्षर ते अर्थ या टप्प्याने वाचन प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांना नेहले जात नाही उदा दोन अक्षर पाणी वाचन आनंद देते तीन शब्दांचे वाक्य ही सुगमता महत्त्वाची आहेच पण विद्यार्थ्याला सुरुवातीपासून संयुक्ता व अन्वयार्थ व रचना कारण ही शिकवले जात नाही .आणि त्यामुळे वाचन ही विचार प्रक्रिया आहे हा मुळ हेतूच शिक्षणामध्ये हरवलेला आहे. वाचन ही अक्षरांची ओळख व शब्द उच्चार निव्वळ क्रिया आहे हेच जास्त रुजले आहे तेच महत्वाचे मानले जात आहे. इतका जुजबी विचार चालू आहे याचे स्व परीक्षण केले तर हे आढलून येते उपाय म्हणून
प्राथमिक स्तरावर मुलांचे वाचन ही शाळांच्या सर्वोच्च अध्यापनाची निर्धारित सर्व विषयांसाठी ची गोष्ट बनवण्याची गरज आहे शाळांच्या मधील बंद ग्रंथालय यावर उपाय केले जात नाहीत वाचन तास सर्वत्र ठेवले जात नाहीत पुस्तकांच्या कपाटाकडे मुलांना जाऊ दिले जात नाही
वाचन पेट्या तयार केले जातात पण त्या सातत्याने वर्षानुवर्षे चालू ठेवल्या जात नाहीत पुस्तके फाटतील पुस्तके हरवतील ग्रंथपाल नाही या समस्यात प्राथमिक स्तरावर चे वाचन हरवलेले आहे ग्रंथालय आणि शाळा यामध्ये प्राधान्य सर्वोच्च असे ग्रंथालयाला असायला हवे ग्रंथालयातील वाचन समाधी ते दृश्य विद्यार्थ्यांनी सतत अनु करण्यासाठी पाहायला हवे असे दृश्य पाहण्यास त्यांना मिळायला हवे शिक्षकांच्या हातात पाठ्यपुस्तकाच्या शिवाय विषयाची पुस्तके दिसायला हवीत . त्यांनी नित्य वाचन करायलाच हवे पाठ्य पुस्तकं फक्त उपयुक्त माननारा हा वर्ग चितन करू लागेल हि आनंदी गोष्ट ठरणार आहे समाजात आणि घरात वाचन ही सर्वोच्च गोष्ट आहे असा संस्कार घर समाज शाळा या तिन्ही पातळ्यांवर करायला हवा शाळांनी वाचन सवय लावावी मग मुलांनी नित्य वाचन करावे असा परावलंबन वाद हा भारती शिक्षणाच्या सर्व अपयशाचे कारण आहे हे नाहीसे करावयाचे असेल तर वाचन अक्षरातून आशयाकडे जाण्यासाठीच असते ते मनोरंजन ही एक पायरी असते .
भारतीय शिक्षणातील सर्व स्तरावरील वाचन समस्येचे संशोधन होण्याची खूप गरज आहे कोणत्या स्तरावर वाचन संस्कार करण्याची नितांत गरज आहे हा संस्कार रूजत का नाही? याला बाह्य कारणे कोणती आहेत? यावर मूलगामी उपाय कोणते करण्याची गरज आहे? सर्वोच्च महत्त्वाची तयार करण्यात आलेली मूल्यमापनाची परीक्षापद्धती यासच सर्वात जास्त महत्व आहे दुसरे म्हणजे लेखनाला महत्त्व आहे तिसरे म्हणजे अति सर्वोच्च स्मरणाला महत्त्व देण्यात आले आहे .यातून वाचनाच्या छंदाकडेअक्षम्य दुर्लक्ष केले तर चालते असा एक समज रुजला नाही का? याचाही विचार होण्याची गरज आहे.
भारतीय शिक्षणामध्ये वाचन हे स्मरणासाठी अभ्यासक्रमातील घटक आठवण्यासाठी करावयाचे असते .हा विद्यार्थ्यांचे मनामधील मोठ्या प्रमाणात पसरलेला वाचनाचा चुकीचा विचार हा प्रथम घालून टाकण्याची गरज आहे. वाचन केले तर लेखन करता येते वाचन केले तर स्मरण करता येते याला महत्त्व आहेच हे दोन्ही टप्पे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे पण त्याहून विचारही शिक्षणातील सर्वोच्च बुद्धी विकासासाठी ची अभिवृत्ती विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित करावयाची असते. हे उद्दिष्ट उच्च शिक्षणात फक्त निर्धारित करण्यात आले आहे पण प्राथमिक स्तरावर अक्षर ओळख शब्दार्थ शक्य झाल्यास वाक्य अर्थ इथेच भारतिय शिक्षण थांबले आहे.
त्यामुळे विचार आणि वाचन ही शिक्षणातील प्रधान कृती प्राथमिक स्तरापासून रुजविण्याची नितांत गरज आहे विचार म्हणजे काय? विचार कशाच्या साह्याने करता येतो. ?विचाराची साधने कोण कोणती आहेत ?विचार करण्यासाठी शब्द कसे उपयोगी पडतात? विचाराच्या पद्धती कोणकोणत्या आहेत? विचारातून अर्थाकडे विचारातून तर्का कडे विचारातून अवगामी उदगामी विचार प्रक्रिया कडे जाता येते .हे सर्व सातत्याने भारतीय शिक्षणामध्ये सदैव सांगितले जात नाही. यावर चर्चा होत नाही त्यामुळे शिक्षण म्हणजे विचार करणे. शिक्षण म्हणजे तर्क करणे. शिक्षण म्हणजे संसलेशन करणे शिक्षण म्हणजे अवगमी व अनुगामी पद्धतीने पुढे जाणे. शिक्षण म्हणजे बुद्धी घटकातील असंख्य चेता केंद्रांचा विकास करणे.
बुद्धी घटकाच्या विकासासाठी वाचन नावाची कृती व्यक्ती कौशल्याची गोष्ट अंगी बाणवण्या शिवाय पर्याय नाही. याबद्दल भारतीय शिक्षणात प्रचंड उदासीनता आहे. चित्रवाचन सोपे आहे ते आवडते हे स्वाभाविक आहे पण त्यातून हि चित्र साक्षरता पुढे गेलेली दिसत नाही चित्र मय कथांचे वाचन ज्यातून आनंद मिळतो या दोनच पातळ्यांवर वाचन क्रिया शिक्षण क्षेत्रात अडखळली आहे. थांबलेली आहे रंगीबेरंगी चित्र मय पुस्तके ही आहेत काही प्रमाणात का होइना चित्रमय वाचनातून प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाच्या सवय कायम रूजत असलेल्या दिसून येत नाही म्हणून. शिक्षण आणि वाचन याचा क्रम बदलण्याची गरज आहे
वाचन हेच शिक्षण आहे .विचार हेच शिक्षण आहे. स्मरण आणि लेखन पाठांतर आणि अभिव्यक्ती यांचे क्रम दूर ठेवले पाहिजेत तरच सामूहिक प्रयत्नातून पुन्हा विद्यार्थी अनुकरण महत्त्व हे समजावून घेऊन वाचनाच्या छंदाकडे आकर्षित होऊ शकतो त्यांना रुपांतरीत करता येते. ही आशा बाळगून पुढे जात राहायला हवे पालक आणि शिक्षक या वाचन छंदाच्या या वाचन कौशल्याच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे मुख्य घटक व्यक्ती व संस्था यांचे वर जबाबदारी देऊन ठरवण्याची गरज आहे. हेही केले जात नाही आणि दुसऱ्या पातळीवर मुले वाचत नाहीत हि निव्वळ कायम तकार करून पुढे जाता येईल हा आपोआप वाद घातक ठरणार आहे विशिष्ट वयात त्यांना वाचनाची सवय लावली गेली नाही अशा सामान्य तक्रारी करून ज्ञान क्षेत्राला आपण उपेक्षित ठेवत आहोत. यास सर्व घटक जबाबदार आहेत.
ज्ञान सर्वोच्च आहे विचार ही त्यासाठीची महत्त्वाची कृती आहे वाचनातून भाषा विकास वाचनातून विचार विकास वाचनातून ज्ञान निर्माण करणे या सगळ्या क्रिया भारतीय शिक्षणामध्ये सतत दुर्लक्षित केल्या जात आहेत परीक्षा मूल्यमापन क्रमांक आणि प्रवेश या दिशेने पुढे निघालेले भारतीय शिक्षण ज्ञान निर्माण होण्याच्या दिशेने कधीच जाणार नाही का?
ज्ञानाचा एक इतिहास असतो. विचाराचा इतिहास असतो. व्याकरणाचा इतिहास असतो मिमांसेचीपरंपरा असते अंतिमतः भौतिक विकास हा श्रेष्ठ आहे असे जागतिक सत्य जेव्हा रुजू लागते तेव्हा विचार तर्क ज्ञान अभिव्यक्ती हे शिक्षणातील अविष्काराचे घटक सशक्त होणे असंभव असते भारतासारख्या समस्याग्रस्त देशात या अंगाने विचार करण्याची नितांत गरज आहे हे केले गेले नाही तर वाचन आणि शिक्षण हे परस्पर विरुद्ध दिशांनी असेच अडखळत जात राहील आणि अभिजन वादी ज्ञान व्यवहार असे व्यापार कर्त्येहे वाचनाचे महत्त्व इतर जनांना सांगत राहतील आणि त्याच्या दबाव दडपणाखाली भारतीय शिक्षण पिचलेले चालत राहीलआहे असे होऊ द्यायचे नसेल तर सामूहिक कल्पक प्रयत्नांची गरज आहे श्रद्धांचे शिकवण देणारे शिक्षण विचाराचे शिक्षण कधी देणार ?ज्ञान अभिव्यक्तीचे शिक्षण कधी देणार?
भक्ती शिकवणारे शिक्षण नको आहे. श्रद्धाचा संघर्ष करायला शिकवणारे शिक्षण नको आहे खोट्या स्मिता चा अर्थ सांगणारे शिक्षण हवे आहे द्वेष आणि नफरत शिकवणारे शिक्षण नको आहे धर्म द्वेषाचे शिक्षण नको आहे. प्रत्येक जनसमूहाच्या जगण्याला आव्हान देणारे शिक्षण नको आहे रूढी परंपरा याच श्रेष्ठ आहेत. असे श्रद्धा पातळीवर बिंबवून तेच राष्ट्र आहे अशी दिमागी गुलामी तयारी करणारे शिक्षण नको आहे प्राचीन आणि आधुनिकता याकडे अभिमान व नकार या दृष्टिकोनाने न पाहता त्यातील उपयुक्तता व कालसुसंगत तथा असा दृष्टिकोन विकसित करणारे शिक्षण हवे आहे समाज सह अस्तित्व हे महत्त्वाचे असते त्यात शान्ति सद्भाव हेच ज्ञान वर्तन असते .हाच विचार असतो या प्रकारच्या दुःख निर्मूलनाचे भान देणारे भारतीय शिक्षण अत्यावश्यक आहे संपत्ती निर्माण करणारे शिक्षण हवेच आहे .पण शोषण करणारी शिक्षण नको आहे ती निर्मम मानसिकता या शिक्षणातून तयार होते चे शिक्षण हे माणूस घडवत नाही तर स्वार्थांध भौतिकतेच्या लालसेची आधुनिक मशीन्स बनवत नाही का ?असा विचार करण्याची वेळ आली आहे.
सा रूपाने विचार करण्यासाठी वाचन विचार शिकण्यासाठी वाचन करणे विचार विकास करण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे .ज्ञान निर्माणासाठी वाचन आम्ही करतो हे आत्मभान भारतीय शिक्षणात रुजवण्यात यश आलेले नाही असेही त्या दिशेने प्रयत्नही सर्वंकश होत असलेले दिसून येत नाहीत म्हणून विचार आणि वाचन या ज्ञान संबंधाचा नव दृष्टिकोन पाया वाचनाच्या क्षेत्राशी जोडला गेला पाहिजे .तो घातला गेला पाहिजे तरच भारतीय शिक्षणातील वाचन समस्या ची उत्तरे मिळू शकतात अन्यथा ऑनलाइनचे शिक्षणात झूम च्या जगतात दृष्य प्रतिमांच्या गतिमान त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मज्जा विकासात येणाऱ्या नव्या समस्या ह्या खूप भयंकर असणार आहेत त्यातील एकात्मता संपुष्टात येणार आहे. समग्रता हरवणार आहे अस्थिरता व विखंडन हि बुद्धी वर्तनाची दुष्परिणामाची प्रक्रिया वाढत जाणार आहे .आणि त्यामुळे भावनात्मक दृश्य हाच विचार बनण्याची शक्यता आहे घटनांच्या पलीकडे दृश्यांच्या पलीकडे वास्तव असते त्याच्आकलन करता येते हा विचार आत्मविश्वास नजीकच्या काळात शिक्षणातून कमी होऊ द्यायचा नसेल तर विचारासाठी वाचन विचार करणे शिकणे म्हणजे वाचन होय ही वाचनाची नवी व्याख्या करायला हवी रंजना चे वाचन थांबवायला हवे एवढेच.
शिवाजी
राऊत. प्रेस
सातारा दिनाक 20 वेळजून 22 7.30