रविवार दिनांक 26 जून रोजी सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगार व बेघरांच्या विजयी मेळावा!
सांगलीमध्ये पंचवीस वर्षापूर्वी बेघरांना घरे मिळण्यासाठीचे आंदोलन झाले होते. त्यातील तेराशे एक बेघरांना घरकुले द्यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केला. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती. 357 मंजुर यादीतील बेघर नागरिकांनी महानगरपालिकेकडे मुंबई उच्च न्यायालय निकालानुसार घरकुले मिळावित अशी मागणी केली होती. या सर्वांचे अर्ज सांगली महानगरपालिकेने तारीख 21 जून 2022 च्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केलेले आहेत. याबद्दल सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने स्वागत करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानित आहेत. असे सांगलीतील बेघरंच्या बैठकीमध्ये कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले. तसेच मिरज येथील भिंमपलास प्रकल्प (बिल्डर श्री विनायक गोखले) मध्ये 90 फ्लॅट्स नोंदीत बांधकाम कामगारांना देण्याचा निर्णय झाला असून 90 कामगारांनी या प्रकल्पामध्ये फ्लॅट्स बुकिंग केलेले आहेत. त्यांना शासनाकडून अडीच लाख रुपये अनुदान व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून दोन लाख अनुदान मिळणार असून फ्लॅटची किंमत साडेदहा लाख असून सहा लाख रुपयाचे कर्ज घेऊन त्याबद्दलची प्रक्रिया सध्या जोराने सुरू आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आलेला आहे.
तसेच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांनी घरकुलासाठी दोन लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी एकूण 150 अर्ज सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे केलेले असून त्यातील 41 अर्ज सहाय्यक कामगार आयुक्तांनी सध्या मंजूर केले असून त्याची प्रक्रिया पुढे सुरू आहे. या सर्वाबाबत संपूर्ण माहिती 26 जून च्या मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे असे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू विशाल बडवे यांनी प्रसिद्धीस दिले असून या मेळाव्यास मोठ्या संख्येने बेघर व बांधकाम कामगारानी हजर राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.