माझ्या मराठीचे भाषा भ्रम कौतुके

माझ्या मराठीचे भाषा भ्रम कौतुके

माझ्या मराठीचे भाषा भ्रम कौतुके

भाषा म्हणजे माणूस होय माणूस हा भाषेचा निर्माता आहे माणूस विचार करतो माणूस भावना व्यक्त करतो माणूस भावनांच्या मध्ये प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आजमावत तो आणि वर्तमान चालू ठेवतो थोडक्यात वर्तन करतो भाषा ही माणसावर राज्य करते माणसाला संस्कृती ते चा वाहक बनवते भाषा नकली असते भाषा कठीण असते भाषा बोजड क्लिष्ट असते
भाषा सोपी असते भाषा अर्थपूर्ण असते भाषा विचार परी लुप्त असते भाषा ही विचार आणि अर्थ प्रतीत करून मानवी जीवनाला पुढे नेते पण भाषा ही अनेक प्रकारचे प्रभुत्व गाजवते आणि वर्तमानातील व भूतकाळातील सांस्कृतिक प्रभुत्वाचे अवशेष वाहण्यासाठी मानवी जीवनाचा ती नेहमी वापर करते वर्तमानातील जाणिवा विचार संकल्पना रूढीआणि संकेत वहनासाठी माणसाचा वापर करते
भाषा ही राजकारण करते हे राजकारण किती प्रकारचे असते हे त्या भाशिकाला प्रतीत होत नाही म्हणून तर भाषा हा भ्रम तयार होतो व भाषा ही नकली स्वरूपामध्ये पुढे जात राहते साहित्याच्या सर्व व्यवहारात भाषेचे भरम खूप पसरलेले असतात साहित्याच्या व्यवहारात भाषेचा नकलीपणा हाच जास्त शैली आणि रचना या स्वरूपामध्ये ती सतत वाढत असते शैली आणि रचनेच्या आधारे भाषेचा वापर करणारे लेखन कर्ते हे विचार आणि अर्थ यांचे भ्रम बेमालूमपणे तयार करतात आणि अतर्क्य आणि अ बोध भाषा व्यवहाराचा पट उभा करतात
त्यामुळे भाषेचे राजकारण पुढे जाते भाषा ही विचार आणि अर्थ प्रतीत ही कार्ये करायच्या ऐवजी भाषा भरम् जंजाळ करण्यामध्ये जास्त रममाण होते असा भाषेचा प्रवास का होतो ?याला कोणती कारणे असतात? मानवी संस्कृतीच्या प्रवासात हे बदल होत राहतात या बदलांमध्ये मानवी प्रतिभेतील जाणीवा आणि नेणिवेचा गुंता भाषा भ्रम वाढवतो यांचे कारण सभोवती ची सांस्कृतिक ता म्हणजे भाषिक पूर्व संस्कार होय .सांस्कृतिक ता ही संमिश्र जटील अमूर्त नेणीव चल घटना असते. भाषेच्या व्यवहारातील पूर्व कालीन व वर्तमाना तील अशा सर्व आग्रहाच्या व नाकारलेल्या भाषिक संवेदना असतात सांस्कृतिक नेनीवा या अकारण अ चिकित्सक पने असून सुद्धा व्यक्तीवर प्रभाव पाडत असतात त्या व्यक्तीचा समाजाचा स्थित विचार अस्थिर करतात नकळतपणे होते प्रभुत्व नेणीव हे काम करतात नेनिवाचे राजकारण हे सांस्कृतिक प्रभुत्व असते त्यात स्त्री जीवन सह अस्तित्व यासह दैव पुनर्जन्म मोक्ष व पाप या भय कल्पना जास्त असतात हे सर्व भाषेच्या अदृश्य परिणामाचे घटक असतात भाषा ही वास्तवाचे निव्वळ ज्ञान असते तर त्या भाषिका च्या वास्तवाचे संवेदना बोध तर्क ज्ञान असते त्यामुळे वस्तुजात ज्ञान व तर्क ज्ञान तसेच वस्तू व्यक्ती संबंध व्यक्ती आणि व्यक्ती संबंध यांच्या सापेक्ष आकलनाचा तो परिणाम असतो इथेच भाषा भर्माचे राजकारण सुरू होते

भाषेच्या रचनेचे भ्रम भाषेच्या शैलीचे भ्रम भाषेच्या संवेदनेचे भ्रम भाषेतील सांस्कृतिक शब्दांच्या रुढ अर्थांचे
भ्रम हे सर्व भाषेच्या विचार व अर्थाचे अडसर असतात म्हणून सम कालातील विचारांचे तसेच अर्थाचे भाषेचे राजकारण पुढे नेण्यासाठी या सर्व भर्माना नकार देणे हे खूप महत्वाचे असते यासाठी भाषिक विद्रोहाची नितांत गरज असते भाषेचा विद्रोह हा सांस्कृतिक विद्रोही असतो शैली आणि रचनांच्या साहित्य व्यवहाराला उध्वस्त करतो हे हे साहित्य प्रभुत्व वाद असे वर्तन मोडून काढणे आवश्यक असते हे जेव्हा होऊ लागते तेव्हा भाषिक प्रभुत्व वादी हे संस्कृतिक राजकारणाचे गहिवर व्यक्त करतात संस्कृती धर्म अस्मिता राष्ट्रभक्ती गौरवशाली इतिहास पूर्वसुरींचा वारसा हे सर्व धोक्यात आले आहे ते उध्वस्त होणार आहे याचे त्यांना अतीव दुःख होते हे सांस्कृतिक दुःख हे कुटील राजकारणाचे डाव असतात सांस्कृतिक दुःखाची भाषा ही नेहमी देशीवादी वंशवादी अभिजनवादी बोलत असतात मांडत असतात तिचे प्रमाण साहित्य कृती आहे असा गौरवही स्वतः करीत असतात आणि त्यातूनच भाषेचे पुन्हा आधी मान्यतेचे भ्रम राजकारण भाषिकांना ग्रासते म्हणून समकाल हा जसा व्यक्तीच्या विद्रोहाचा मौलिक काळ खंड म्हणून स्वीकारण्याचे धाडस दाखविले नाही तर भाषेच्या राजकारणाचा बळी प्रत्येक पिढी जात राहते

भाषा परंपरेचे गीत गाते भाषा संस्कृतीच्या अंगणात नृत्य करते भाषा काळांच्या बरोबर भांडण करते भाषा नव्या पिढ्यांना सांस्कृतिक नेणीव ची ओजी भेट देते भाषा नकली गौरवाच्या अभिजन वाद्यांच्या स्पर्धा भरवते भाषा मानवमुक्तीच्या गहिवराचे गीत कधीतरी गाते आणि पुन्हा नकली भ्रम हा तिचा वर्तन वाद हा असली साहित्य व्यवहार आहे तो देशी वाद आहे ती सशक्त भाषा संस्कृतीची प्राचीन सनातन परंपरा आहे अशी तीच . अर्धं निरक्षर भाशिकांसाठी अचंबा कृती सर्व कालाखंडात केलेली असते केली जाते ती ठरवून करतात उदा गीत रामा यन रचना किंवा ने मजसी ने सागरा प्राण तळमळl ला यासारखे अनेक साहित्य राजकारण.कृती हे असेच भाषा भ्रमाचा आदर्श नमुना ठरविलांजातो आणि
भाषा ही अर्थ व विचार आकलन तर्क वास्तव अनुभूती संवेदना प्रती त हि कार्य न करता नकली भाषेचा व्यवहार हाच सांस्कृतिक प्रभुत्व साठी चालू ठेवला जातो
जसे सध्या राष्ट्रभक्ती देश प्रेम राष्ट्रनिष्ठा सांस्कृतिक अभिमान परंपरा चा गौरव सुवर्णभूमी विश्वगुरू जागतिक योग महात्मे यासारख्या असंख्य नकली भाषिक कल्पना वापरून संस्कृती गुलामीचे भाषिक राजकारण वंशवादी हे प्रभुत्व पुनरपी स्थापित करण्यासाठी करीत असतात सर्व साहित्य व्यवहारांमध्ये अंतरंगात हे पुरेपूर भरलेले असते त्यांना आधुनिक उत्तर वसाहत उत्तर जागतिक साम्राज्य वादी काळातील व्यक्तीं व वंश वादाच्या अदभुत प्रतिभेच्या साहित्य कृती म्हणून पुढे आणले जाते हृदय हा रक्त पंप आहे भावनेचा गुलाम बळी घटक नाही अशी विधाने जेव्हा साहित्यात येतात तेव्हा धृत पावलाचा मूलतत्व वाद हा सोबत फोबिया घेवून पुढे आणला जातो आणि मानव जातीच्या मुक्ती दायी ज्ञान राजकारणाला विरोध करण्यासाठी भाषा भ्रम वापरले जातात हि सावधानता आम्हा भाषिक. नव शिक्या ना कधी येणार हाच खरा प्रश्न आहे

शिवाजी
राऊत प्रेस
सातारा
21 जून 22 वेळ 9 .49

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *