सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा शनिवार दिनांक 2 जुलै रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली निवारा भवन येथे महत्त्वपूर्ण मेळावा!
महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये महापूर आल्यानंतर त्यामध्ये ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे बुडाली अथवा पडली त्यांना प्राधान्याने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दोन लाख रुपये अनुदान मंजूर योजनेनुसार मिळावे अशी मागणी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली होती. त्यावेळेस महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्रीरंगम यांनी तीन वर्षांपूर्वी निवारा बांधकाम कामगार संघटनेस लेखी आश्वासन दिलेले होते की, ज्या नोंदीत बांधकाम कामगारांची घरे पडलेले असतील त्यांना प्राधान्याने घरकुले देण्यात येतील. परंतु त्याबाबत अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. म्हणूनच या संदर्भात या वर्षीचा पावसाळा आता सुरू झालेला आहे. नवीन वर्षाच्या महापूराची भीती जनतेच्या मनात आहे त्यासाठीच याबाबत पुढील आंदोलनाची तयारी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने 23 जुलै 2020 पासून बांधकाम कामगारांचे सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू केलेले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या अर्जाबाबतचा निर्णय काय झाला हे समजणे अवघड झालेले आहे. कारण प्रत्येक बांधकाम कामगारास कोणतीही माहिती पाहिजे असल्यास त्यांना आलेला ओटीपी कॉम्प्युटरवर बसलेल्या संघटनेच्या माणसाला सांगावा लागतो. त्याशिवाय माहिती मिळत नाही.
म्हणूनच बांधकाम कामगारांचे कोणतेही काम थकीत असल्यास त्याबाबतची सर्व माहिती शनिवार दिनांक 2 जुलै रोजी ठीक सकाळी 11 पासून निवारा भवन सांगली सभागृहामध्ये सांगण्यात येईल.
त्याच वेळेस स्वतंत्रपणे नोंदीत बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना आवश्यक विविध संगणक प्रशिक्षण देण्यात येईल. या शिबिरामध्ये विविध संगणकीय कोर्सेस आणि बांधकाम कामगार विषयक ऑनलाईन पद्धती याबाबत एमकेसीएलचे तज्ञ प्रतिनिधी श्री परिमल व प्राध्यापिका शरयू पुजारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.तरी या महत्त्वपूर्ण शिबिराचा सर्व बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करणारे पत्रक कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे.
Posted inसांगली
सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा शनिवार दिनांक 2 जुलै रोजी ठीक सकाळी 11 वाजता सांगली निवारा भवन येथे महत्त्वपूर्ण मेळावा!
