“शिवसेनेचा ” मुख्यमंत्री
भाजपाचा उपमुख्यमंत्री
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्राच्या राजकारणातील एतिहासिक दिवस! शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील नवे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील अशी अटकळ सर्वच राजकीय नेते, प्रसारमाध्यमे आणि जनतेनी व्यक्त केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करुन भारतीय जनता पक्षाने एक जोरदार झटका दिला. प्रसार माध्यमे व समाज माध्यमातून एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून राजभवनातील दरबार हॉल मध्ये शपथ घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले व एक सर्व सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसला व सर्वसामान्य शिवसैनिकांचे स्वप्न साकार झाले. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी राज्यात एकच जल्लोष केला. आज दुपारीच राजभवन परीसराला पोलीस छावणीचे स्वरुप आहे होते. राजभवनातील परीसरात लगबग सुरू झाली होती. सुरक्षा यंत्रणा अत्यंत कडक करण्यात आली होती.विरोधी पक्ष नेते व एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटायला येणार व सत्ता स्थापनेचा दावा करणार या व्यतिरिक्त कोणतीच खबर प्रसार माध्यमे व अधिकारी वर्गाला नव्हती. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आणि गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीवर पडदा पडला व नव्या “राजवटीला” सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी शुभेच्छा देऊन सावध रहा व विचार करून पावले उचला असा मोलाचा सल्ला दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत.