सोयाबीन बियाणे बोगस
सुर्दापूरवाशी शेतक-यांची ओरड व कृषी अधिका-याकडे तक्रारीतून मदतीची मागणी
सुनील शिरपुरे/झरीजामणी
झरीजामणी तालुक्यातील सुर्दापूर येथील ब-याच शेतक-यांनी आपल्या शेतात वसंत ॲग्रोटेक कंपनीच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली. परंतु पेरणीनंतर या बियाणाची उगवणक्षमता खूपच कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. साहजिकच यामुळे या शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तसेच इतर बियाणाची पेरणी केली असता त्याची उगवणक्षमता चांगली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतक-यांची खात्री झाली की, सदर बियाणे बोगस आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून आम्हाला मदत द्यावी अशी समस्त शेतक-यांची मागणी आहे. या तक्रारकर्त्या शेतक-यांमध्ये नरेंद्र मल्लारेड्डी गुर्लावार, संजय विठ्ठल मोठ्यमवार, मुर्लीधर विनायक वैद्य, दत्तात्रय विठ्ठल मोठ्यमवार, नागेश्वर बापुराव गुर्लावार, केशव लसमन्ना गुंडावार, आकाश लिंगारेड्डी गड्डमवार, कृष्णराव शिवराम वैद्य, रविंद्र प्रभाकर बद्दमवार, रविंद्र आशन्ना संकसनवार, राजु भुमारेड्डी निम्मलवार, अशोक आशन्ना बद्दमवार, शेख राजमियॉं शेख मेहबुब, शेख मुन्ना, शेख महमद शेख मेहबुब, शेख इस्माईल शेख मेहबुब, अविनाश भुमारेड्डी बोदकुरवार, संजय भुमारेड्डी संकसनवार, गजानन सुदर्शन संकसनवार, व्यंकन्ना सुदर्शन संकसनवार, रामरेड्डी ईस्तारी कामनवार, लिंगारेड्डी किष्टारेड्डी गुम्मडवार, विठ्ठलरेड्डी हनमंतु येल्टीवार, शेख गफूर शेख फरिदसाहब, शंकर काशिनाथ काळे, गंगाधर मादस्तवार आणि सुरेखा अन्नसर्तावार यांचा सहभाग आहे.