म्यानमार देशाचे भंते डॉ. संदामुनी महाथेरो यांनी करबुडे येथील अनोख्या क्रांति स्तंभाला दिली भेट
रत्नागिरी / जिल्हा प्रतिनिधी
म्यानमार देशातून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात आलेले भंते डॉ.संदामुणी महाथेरो यांनी करबुडे येथे उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक अशोक स्तंभाला भेट दिली. गेल्याच महिन्यात स्तंभाचा लोकार्पण सोहळा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर या ऐतिहासिक स्तंभाला पहिली भेट म्यानमारचे भंते डॉ. संदामुनी महाथेरो यांनी दिली. यावेळी उपस्थितीत धम्म बांधवानी म्यानमारच्या भंतें संघाचे दिमाखात स्वागत केले.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच म्यानमार देशातून भंते डॉ.संदामुनी महाथेरो त्यांच्या भंते संघासोबत आलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध स्थळांना ते भेट देत आहेत. शहरातील थिबा राजवाडा याठिकाणी भेट दिल्यानंतर करबुडे येथील देशातील अनोख्या अशोक क्रांतिकारी स्तंभाला भेट दिली. भंते डॉ.संदामुनी महाथेरो यांना नऊ गाव दिक्षा भूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक स्तंभाबद्दल सविस्तर माहिती दिली. स्तंभाची रूप-रचना पाहून भंतेंनी स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दुपारच्या सत्रात या स्तंभाला अशोक धम्म चक्रांकीत मुद्रा धम्मदान देणाऱ्या पुष्पलता गंगाराम जाधव यांच्या कुटुंबीयांकडून भंते संघाला भोजनदान देण्यात आले. तसेच नऊगांव बौध्द दिक्षा भूमी विकास समितीच्या वतीने भिख्खू संघाला चिवरदान दिले. दिक्षा भूमी अशोक स्तंभाचे सन्मानचिन्ह देऊन भंतेना गौरविण्यात आले. त्यानंतर संबोधी बुद्ध विहार येथे भंते डॉ संदामुनी महाथेरो यांनी उपस्थित उपासक ,उपासिका यांना धम्मदेसना दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नवंगांव बौध्द दिक्षा भूमी विकास समिती करबुडे केळ्यें महाल आणि मौजे कपिलवास्तू नगर करबुडे बौध्दजन कमीटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. नवंगांव संघटनेचे सहा. सेक्रेटरी विश्वजीत जाधव यांनी सुसंगत सुत्रसंचलन केले.
यावेळी युवा समाजसेवक रोहित तांबे, पत्रकार प्रशांत जाधव, प्रमोद जाधव ,रविंद्र पवार, गौतम जाधव, दयानंद जाधव, प्रकाश जाधव ,वासनिक सर, आनंद कांबळे, भास्कर मोहिते, चाद्रकांत जाधव ,संतोष जाधव, संतोष सावंत, संजय सावंत,अशोक जाधव,सुमीत कांबळे, आकाश कांबळे ,भरत सकपाळ , महेंद्र जाधव , अनंत जाधव ,अनंत केरू कांबळे , अनंत कांबळे , सुशांत जाधव ,हेमंत जाधव ,संजय जाधव , मिथुन जाधव आदी उपस्थित होते.