कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे शाहू समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर,दि.२ (प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून परिवर्तन फौंडेशनच्या वतीने शाहू समाजरत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. परिवर्तन फाउंडेशन मार्फत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्थांची दखल घेतली जाते. डॉ.योगेश साळे यांनी कोरोना कालावधीत रात्रंदिवस जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनंसाठी औषध पुरवठा करुन देखरेख ठेवल्याने कोरोना मोठ्याप्रमाणात नियंत्रणात आला,तसेच मृत्यूचा आकडा बराच घटला याचे श्रेय त्यांच्या कुशल व्यवस्थापनाला जाते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील भीषण महापूर परिस्थितीत तत्पर्तने जीव धोक्यात असतानाही स्वतः यंञणेसह महापुरात उतरून औषधांचा पुरवठा केला व महापूर परिस्थीतीतील रोगराईवर नियंञण ठेवले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात जिवितहानी टळली. या कार्याची दखल घेऊन, त्यांना शाहू जयंतीचे औचित्य साधून शाहू समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक ढोंगे,माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,जिल्हा कृषी विकास अधिक्षक भिमाशंकर पाटील, परिवर्तन चे अध्यक्ष अमोल कुरणे आदी उपस्थित होते.
डॉ.योगेश साळे यांना शाहू समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.