महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना पेट्या मिळणार!
संघटनेस मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी 30 जून 2022 पर्यंत झालेलि असेल अशा उर्वरित सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पेटी देण्याचा बांधकाम कल्याणकारी मंडळाचा निर्णय झालेला आहे. तरी याबाबत अधिक माहितीसाठी संघटनेकडे संपर्क करावा.
सांगली जिल्ह्यात मिरज येथील भीमपलास घरकुल योजनेमध्ये 90 बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर करून सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिल गुरव यांनी मंजुरीचा प्रस्ताव नुकतेच बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे सुपूर्द केलेला आहे.
याशिवाय सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान मिळण्यासाठीच्या १८०अर्जांची सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फत योजनेप्रमाणे तपासणी सुरू आहे.
परंतू बांधकाम कामगारांच्या घरांची योजनाच मंजूर होत नाही. म्हणून कामगारांना फोन करून दमदाटी करणाऱ्या आणि बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या तसेच बांधकाम कामगारांची लूट करणाऱ्या भामट्यापासून कामगारांनी सावध राहावे
म्हणूनच महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांनी प्रत्येक सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन घर मागणीचे अर्ज सादर करावेत. याबाबतच्या शासकीय निर्णयाची जीआर प्रति आवश्यक असल्यास आयटक संघटनेबरोबर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक 9960499366 /7767877006/9146046088/8087122839.
कॉ शंकर पुजारी सरचिटणीस
महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना फेडरेशन Aituc
सांगलीत बांधकाम कामगारांच्या मुला मुलींचे संगणक प्रशिक्षण शिबिर संपन्न
शनिवार दिनांक 2 जुलै रोजी ठीक सकाळी 11 वाजता नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुला मुलींचे प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला. सुरुवातीस बांधकाम कामगारांच्या मुला मुलींच्या साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती व इतर सुविधा बाबतची माहिती ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा. शरयू बडवे यांनी शिबिरामध्ये घेण्यात येणाऱ्या विषयासंबंधी माहिती दिली. यामध्ये कमवा व शिका योजनेनुसार संगणकांमधील अनेक कोर्सेस करता येतात. त्यापैकी एक बीबीए आणि बीएससी कोर्स तसेच एम एस सी आय टी बाबत विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे कोर्स पूर्ण करावेत व स्वतःचे भवितव्य घडवीण्यासाठी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले.
यानंतर सांगली एमकेसील संस्थेचे प्रतिनिधी श्री अभिजीत पाटील यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विविध संगणकीय कोर्सेस बाबतची माहिती दिली. यामध्ये विविध संगणकीय कोर्सेस पूर्ण करीत असताना काही नामवंत कंपन्यांच्या मार्फत त्यांना काम देऊन विद्यार्थ्यांना स्टायपेंड सुद्धा मिळेल व त्यांना विद्यापीठाच्या डिग्रीसह प्रशिक्षण पूर्ण करता येईल. यामधून त्यांना सर्विस सेंटर मध्ये चांगल्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेचे संयोजन करण्यामध्ये कॉ विशाल बडवे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.