वास्तूशास्त्र नव्हे तर वास्तुशकुन शास्त्र !
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)
मो. ९७६२६३६६६२
एखाद्याने दुस-या व्यक्तीची हत्या करण हे मुळीच मानवतेच लक्षण नाही, कारण कुत्र्याची कळवंड लागली तर माणूस ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण माणूस आज त्याच्या मनात असलेली मानवता घरातील खुंटीला टांगून घराबाहेर प्रवेश करतोय म्हणून तर सारा सत्यानाश होत आहे. काल परवा कर्नाटकातील हुबळी येथे जी घटना घडली ती कँमेरात कैद झाली, त्यातील चित्रीकरण पाहून माणूस हा माणसात नसून कसायात जमा झाला आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
सविस्तर बातमी अशी की,‘सरल वास्तू’वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर (गुरुजी ?) यांची कर्नाकमधील हुबळी जिल्ह्यात एका हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हे वास्तुशास्त्रज्ञ मूळचे कर्नाटकमधील बालगकोट येथील रहिवाशी असून ते कामानिमित्त त्या हॉटेलमध्ये आले होते. असा पोलिसांचा अंदाज आहे. चंद्रशेखर यांना ‘सरल वास्तू’ या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाल्यामुळे ते घराघरात पोहोचले होते. (लोकसत्ता ५ जूलै २२) याठीकाणी हत्या किंवा हत्या करणारांचे समर्थन करण्याचा मुळीच प्रश्न येत नाही. कारण हत्या कोणी व कोणत्या करणामुळे झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांचा असून ते त्याचं काम करतील त्याच्याशी काही देणघेण नाही. पण ज्यांची हत्या झाली त्यांच्या संदर्भात काही प्रश्न मनात घर करून राहु नयेत म्हणून हा लेखप्रपंच आहे. इतरांच्या निर्जिव जागेची किंवा घराची कुडंली काढून त्यातील दोष दूर करणा-या चंद्रशेखर गुरुजींना आपल्या नशीबाची कुंडली का काढता आली नाही ?प्रसारमाध्यमं ज्या चंद्रशेखर मास्तरांना वास्तुशास्ञाचे तज्ज्ञ मनुन दाखवतात ते खरेच तज्ज्ञ होते का ?कारण जो व्यक्ती निर्जिव वास्तूचे दोष ओळखून ते दुर करण्याचा मुलमंत्र देत होता त्या व्यक्तीची नजर त्या हाँटेलवर पडताच या हाँटेलच्या रिसेप्शन मध्ये मोजक्या वेळात काही क्षणात हत्याकांड होणार आहे हे का समजले नाही ?त्यामुळे वास्तुशास्त्र व वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे लोकांना लुटीच साधन आहे अस म्हटल तरी वावग ठरणार नाही. कारण डाँ. जयंत नारळीकर म्हणतात की, मूळ वास्तुविद्या, वास्तुशास्त्र (आर्किटेक्चर) हा अभियांत्रिकी ज्ञानशाखेचा विषय आहे; पण सध्या ‘वास्तुशास्त्र’ या नावाखाली एक भयानक अंधश्रध्दा वेगाने फोफावत आहे. या तथाकथित शास्त्राला ‘वास्तुशास्ञ’ न म्हणता ‘वास्तुश्रद्धाशास्ञ’ म्हणावे.’
सरल वास्तू या कार्यक्रमातून इतरांना वास्तूशास्त्राविषयी आभाळ हेपलणा-या चद्रशेखर यांना आपण हुबळी येथिल ज्या हाँटेलमध्ये कामानिमित्त जात आहेत, तिथेच आपल्या सरल वास्तू चा शेवटचा गेम होणार हे का आणि कस समजल नसेल ?त्यामुळे अशा दिशाभूल शास्त्रतज्ज्ञांना लुटारू का म्हणू नये ? कारण प्रा. य.ना. वालावलकर म्हणतात की, या दिशाभूलशास्त्राची झपाट्याने पसरणारी साथ एखाद्या गंभीर संसर्गजन्य रोगासारखी भयावह आहे, हे खरेच.’ तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक अँड. पुरुषोत्तम खेडेकर ज्या समाजाला बीबीसी म्हणजे बहुजन भैताड कम्युनिटी म्हणून संबोधतात तोच बीबीसी समाज अशा वास्तूशास्त्राच्या आहारी गेला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. मग या आहारी गेलेल्या बीबीसी ची लुट केली जाते म्हणून तर डाँ. शरद अभ्यंकर म्हणतात की, वास्तूशास्त्र नसून हे ‘वास्तुशकुन’ शास्त्र आहे.’ यात आठ दिशांचे संदर्भ येत असतात. तसेच हे वास्तुशकुनी अगदीच काहीतरी खोटेनाटे सांगून श्रद्धाळूंची दिशाभूल करीत असतात.
वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवून वास्तूतज्ज्ञांची तुंबडी भरणा-या सुशिक्षित बाडगुळांना सागावं वाटत की, ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३:५६ मिनटाला भुंकपाचा तिव्र धक्का बसला होता त्यात लातुर जिल्ह्यातील किल्लारी तसेच जवळील ५२ गावातील ३० घरे पुर्णपुणे जमिनदोस्त झाली होती तर १३ जिल्ह्यातील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते ही माहीती आजही इंटरनेट वर उपलब्ध आहे. ह्या ५२ गावातील ३० हजार घरामधील एकही घर वास्तूशास्त्राप्रमाणे बांधलेल नसेल का ?जर बांधले असेल तर ते जमिनदोस्त का झाले. बर जाऊद्या लातूर जिह्यातील ५२ गावामध्ये वास्तूशास्त्राप्रमाणे एकही घर बांधले नसेल पण ज्या १३ जिल्ह्यातील २ लाख ११ हजार घरांना भुकंपाच्या धक्याने तडे गेले त्यात तरी वास्तुशास्त्राचा आधार घेऊन घर बांधलेल नसेल अस म्हणण चुकीच आहे. त्यामुळे इथेही वास्तूशास्त्र सफसेल फोल आणि फेल ठरत त्यामुळेच तर अधुनिक संत विश्वंभर वराट म्हणतात की,
वास्तुशास्त्रान्वये बांधीला बंगला ! का रे ढासळला भुकंपात !
होमहवनाने केली गृहशांती ! यजमान अंती आश्रमात !
कर्ज फेडूनिया घरधनी मरे ! वास्तुशास्त्री फिरे आनंदात !
म्हणे विश्वंभर खरे वास्तु शास्त्र ! जगण्याचे शास्त्र कळे त्याला !
यापुर्वी म्हणजे आँगस्ट २०१९ मध्ये सलग १२ दिवस झालेल्या प्रचंड पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. तेव्हा नद्या, नाले आणि तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने या दोन्ही जिल्ह्यातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे घराघरात पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हा एनडीआरएफ आणि आपत्ती निवारण पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन कोल्हापुरातील २,१७७ कुटुंबातील सुमारे ६ हजार ग्रामस्थांचे तर सांगलीतील जवळपास ४ हजार कुटंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.(मटा. ६ आँगस्ट २०१९) तेव्हा प्रश्न पडतो की, सलग बारा दिवस प्रचंड पाऊस होणार हे कोणत्याही भविष्यकारांने सांगितले का नव्हते ?पुराच्या पाण्याखाली गावाच्या गाव गेली लोकांना वाचवण्यासाठी आपत्ती निवारण पथकाने प्रयत्न करून जवळपास १० हजार लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आल होत. त्या दहा हाजार लोकांपैकी एकाने तरी वास्तूशास्त्रानूसार घर बांधले नसेल का ?त्यामुळे इथेही वास्तूशास्त्र व पाचांग ज्योतिषशास्त्र फोल ठरते. त्यामुळे आता तरी या शिकलेल्या रेड्यांनी ज्योतिषशास्त्र किंवा भंकस दिशाभूल शास्त्र म्हणजे वास्तूशास्त्रावर विश्वास ठेवू नये नाहीतर नवसाने पोरगा मागितला आणि रेडा हाती आला अशी अवस्था होऊ नये म्हणून तर अधुनिक संत विश्वंभर वराट म्हणतात की,
मूहुर्त पाहुनिया हळजीला लाल ! करंटा कपाळ निघाला तो !
बोलतो बोबडे पाहतो वाकडे ! धरीतो खेकडे ओहळात !
सत्यनारायण केले त्याकारण ! ब्राम्हण भोजन भरवीले !
म्हणे विश्वंभर अकलेचे कांदे ! ब्राम्हणाचे धंदे वाढवीले !.
वास्तुशकूनी तज्ज्ञ लोकांच्या डोक्यात कशी माती घालतात याच उत्तम उदाहरण म्हणजे, इस्लामपूर येथिल भाषणात (दि.१९ एप्रिल २०११) स्त्रियांना उद्देशून म्हणाले की, ‘तुमच्या पतिराजांना दारूचे व्यसन असेल तर त्यांच्या बाटल्या घरात नैर्ऋत्य दिशेकडे ठेवा, म्हणजे त्यांना दारू पाण्याची इघ्छा होणार नाही!.’ (प्रा. य.ना. वालावलकर लिखित अध्यात्मवाद : श्रद्धा की अंधश्रद्धा ?) असे सांगतात त्यामुळे आपण आपले मन मेंदू केवळ विज्ञानवादाने सशक्त करू शकतो. एकदा का मन मेंदू सशक्त झाला की, तो ज्योतिषापूढे असो की, वास्तुशास्त्र तज्ज्ञापुढे नतमस्तक होणार नाही, मस्तक नतमस्तक झालेच नाही तर तुमची लुट होणार नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा. पतीची दारू सोडण्यासाठी घरात दारूच्या बाटल्या ठेवा म्हणणा-या वास्तु तज्ज्ञाला महीलांनी तिथेच भरसभेत चोप का दिला नसेल याच आश्चर्य वाटत.
वास्तूशास्त्र तज्ज्ञ चंद्रशेखर यांची हत्या झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी फेसबुकवर प्रकाशित करताच त्यावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर अनेकांनी वास्तुशास्ञावर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यात अमर गरड म्हणतात की, हॉटेलचे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार नव्हते हे ह्यांच्या लक्षात आल नाही का ?तिथे स्वःताची हत्या होऊ शकते….!, चंद्रमणी मेश्राम हे लिहतात की, हे स्वतःचे जीवन वास्तूशास्त्र तज्ज्ञ सांभाळू शकले नाही ह्यावरून हे लुटारू चोर होते हेच सिद्ध होते. येणारे दिवस पाखंड्यांसाठी चांगले नाहीत, चला कुठेतरी लोकं हुशार झाली…पण हत्या करणे हा चुकीचा मार्ग आहे असेही त्यांनी म्हटले. तर विक्रम जोशी म्हणतात की, हा माणूस एकदम बोगस होता मला अनुभव आला आहे. माझ्या समस्यासाठी फोन केला तर त्यांनी मला आधी हे विचारलं की, तुम्ही स्वतःच्या घरात राहता की भाड्याने, मग स्वतःच्या घरात राहता तर घरं किती स्केअर फुट आहे, मग घरात किती लोक कमावते आहेत. अशी माहिती काढून लुटायचे धंदे केल्यावर अजून दुसरं काय होणार असे म्हटले. म्हणून तर बहुजन समाजाला सांगावं वाटत की, पिसाळलेल्या श्वानापासून आणि भट पुरोहीतांपासून कमीत कमी कोसभर तरी लांब रहा कारण हे विषारी सर्प ?एकदा का ढसले की तुम्ही संपणार म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर वराट यांच्या शब्दातच सांगाव वाटत की,
आम्हाशी ढसला मनुचा तो किडा ! अजूनही पिडा होत आहे !
आता याचेवरी एक आहे लस ! विज्ञानाची कास धरा वेगे !
आज जीत्ती आहे त्याची पीलावळ ! जरी वळवळ करू पाहे !
म्हणे विश्वंभर भिमाचे हे अस्त्र ! संविधान अस्त्र सोडा वेगे !.
नवनाथ रेपे लिखित भट बोकड मोठा हे पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६४४०८७९४