महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शक्य असेल त्या शासकीय कार्यालयावर आशा व गटप्रवर्तक महिलांनी 9 ऑगस्ट रोजी जोरदार आंदोलन करण्याचे आवाहन.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शक्य असेल त्या शासकीय कार्यालयावर आशा व गटप्रवर्तक महिलांनी 9 ऑगस्ट रोजी जोरदार आंदोलन करण्याचे आवाहन.

.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शक्य असेल त्या शासकीय कार्यालयावर आशा व गटप्रवर्तक महिलांनी 9 ऑगस्ट रोजी जोरदार आंदोलन करण्याचे आवाहन.
एक जुलै 2021 पासून आशा महिलांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढ व पाचशे रुपये कॉविड भत्ता आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा बाराशे रुपये मानधन वाढ व पाचशे रुपये कोविड भत्ता देण्यासंदर्भात शासनाचा आदेश आहे. परंतु या आदेशाची अजूनही अंमलबजावणी झालेली नसून ही थकित एक वर्षाची मानधन वाढ ताबडतोब मिळाली पाहिजे अशी मागणी आहे.
त्याचबरोबर मागील चार महिन्यापासून महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना कामावर आधारित केलेला कामाचा मोबदला सुद्धा अद्यापि मिळालेल्या नाही. त्याबाबतचे निवेदन प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार दिवसांमध्ये पाठवण्यात येईल. ते निवेदन नऊ ऑगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची सुरुवात म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये देऊन सुरुवात करावी असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिला संघटना कृती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. नऊ ऑगस्ट 1942 क्रांती दिन या दिवशी भारतातील स्वातंत्र्यवीरानी इंग्रज साम्राज्यवाद्यांना भारतातून चालते व्हा म्हणून आंदोलन सुरू झाले. आजही 75 वर्षानंतर दुसरी गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न सध्या सत्ताधाऱ्यांच्या मार्फत सुरू आहे. म्हणूनच आशा व गटप्रवर्तक महिलांचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये नऊ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या अशाही मागन्या आहेत की. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालकांनी ज्या आशा निष्क्रिय आहेत त्यांना कामावरून काढण्यात येईल असे अन्यायकारक व धमकी देणारा आदेश काढलेला आहे. या आदेशामधील तपशील आशा महिलांचा अवमान करणार आहे. तसेच
ग्रामीण भागामध्ये गावातील राजकारण आणि काही अधिकाऱ्यांची दादागिरी त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या आशांच्यावर अन्याय होण्याचा धोका आहे. आठ दिवसापूर्वी आयटक कामगार संघटनेच्या पुढाकाराने Nhm कडे कॉ शंकर पुजारी यांनी हर घर दस्तक व ज्या कामाचा मोबदला दिला जाणार नाही ते काम करून घेऊ नये असे निवेदन दिले होते. याबाबत असे काम आशा महिलांच्या कडून करून घेऊ नये असा स्पष्ट आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियाना मार्फत दिलेला आहे. त्यामुळे फुकट काम कोणी सांगितले तर त्याबद्दलची तक्रार संघटनेस कळवावी.
तसेच संपूर्ण देशामध्ये Aituc कामगार संघटनेच्या वतीने अशी मागणी करण्यात येत आहे की, देशातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भविष्य निर्वाह निधी (PF), ई एस आय, पेन्शन व बोनस इत्यादी योजना लागू झाल्या पाहिजेत. तरी याबाबत जोरदारपणे तयारी करून नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आशा व गटप्रवर्तक महिलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन जोरदारपणे यशस्वी करावे असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र आशा, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी यांनी सांगलीत आशा प्रमुख महिलांची बैठक घेऊन प्रसिध्दीस दिलेले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *