‘अकलेचे कांदे ! ब्राम्हणाचे धंदे वाढवीले !’
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)
मो. ९७६२६३६६६२
‘मूहुर्त पाहुनिया हळजीला लाल ! करंटा कपाळ निघाला तो !
बोलतो बोबडे पाहतो वाकडे ! धरीतो खेकडे ओहळात !
सत्यनारायण केले त्याकारण ! ब्राम्हण भोजन भरवीले !
म्हणे विश्वंभर अकलेचे कांदे ! ब्राम्हणाचे धंदे वाढवीले !’
वरील शब्द हे विद्रोहकार विश्वंभर वराट यांच्या बिजेच अभंग या पुस्तकातील आहेत. ते आज तंतोतंत लागू पडतात कारण ब्राम्हणांच्या मेंदूतून उगम पावलेल्या गटारगंगेत अनेक काल्पनिक कथांची निर्मिती झाली. त्या काल्पनिक कथांना बहुजन समाज बळी पडला. ज्या काल्पनिक कथेला बहुजन समाज बळी पडतोय ती कथा पांदीला वाढणा-या गवताप्रमाणे असून तीचे स्तोम आज मोठ्या प्रमाणात माजत आहे. आपण ज्याला शिकला सवरलेला उच्च विद्या विभुषीत अशा असंख्या उपाद्या बहाला करतो तो खरेच उच्च विद्या विभूषीत आहे का ?असा प्रश्न पडतो. कारण तो सकाळी सकाळी काकड आरती माकड आरती ओवाळून वडा पिंपळाला फे-या मारतो तर कधी ब्राम्हणांच्या सांगण्यावरून बायकोसोबत जोडीने मुर्तीपुढे बसून सुपारीला हळद कुंकू लावत मम भार्या समर्पयामी म्हणून सर्व सुख भोगल्याचा आनंद उपभोग्याचा आव आणतो.
हिंदुत्व कशाशी खातात ?हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय ?हे ज्यांना कळत नाही त्या लोकांच्या हातून हिंदुत्वाचा ढोल बदडून लोकांना जाग केल्याचा आनंद आज महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहीला मिळाला. कारण एकीकडे हिंदुत्व म्हणत बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल हिंदुत्व माणायचे पण त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात जी हिंदुत्वाची मांडणी केली विसरायची का ?शिवसेना पक्षप्रमुख आपल्या आजोबांनी सांगितलेल शेंडी जाणव्या व्यतिरिक्तच हिंदुत्व मांडून आजोबांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत हे दिसताच मनुच्या पिलावळींचा मुळव्याध ठणका देऊ लागल्यामुळे त्यांनी शिवसेनतील सावरकरवाद्यांचा एक गट इडी बिडीची धास्ती दाखवून वेगळा केला. आणि त्यांच्या हाती हिंदुत्वाचा ढोल देऊन मनुच्या पिलावळींनी विधानसभेला विळखा घातला. मग काय हे मनुप्रेमी विधानसभेत जाऊन तिथे थोडेच गाडगेबाबांचे विचार सांगणार आहेत ?ज्या गाडगेबाबांनी सत्यनारायण नाकारला तोच असत्यनारायण विधानसभेत घेऊन जाण्याच पाप ह्या मनुवाद्यांनी केल. हे महापाप महाराष्ट्रातील तरुण कधीही विसरणार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत त्यांच्या कार्यालयात सत्यनारायणाची पुजा करून तिथे बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर (सावरकर प्रेमी ?) दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपला पदाचा कार्यभार स्विकारला. (मटा ७ जुलै २२) कोणी कुठे कशाची पुजा करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत थोतांडाची पुजा करावी ?हे मात्र सहन न होण्यासारख आहे. कारण ह्या सत्यनारायणाचा बाप कोण ?ह्याच उत्तर मुख्यमंत्री देतील का ?कारण सत्तेत नसताना आ. बच्चू कडू यांनी विधानसभेत मोठ्याने गळा काढत सत्यनारायणावर ताशेरे ओढताना म्हटले होते की, ‘सत्यनारायणाचा बाप कोण आहे ?त्यामुळे सत्यनारायणाच्या भंकस कथा बंद झाल्या पाहीजेत.’ अस म्हणाले होते. मग मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या सत्यनारायण पुजेला आ. बच्चू कडू हजर नव्हते का ?बच्चू भाऊंनी ह्या पुजेपुर्वीच क्लीन चिटरूपी पंच्यामृताचा घोट घेऊन टाळूवरती हात देखिल फिरवला आहे अस म्हटल तर काय चुकीच आहे. कारण सत्यनारायणाचे थोतांड शासकीय कार्यालयात चालणार नाही अस आ. बच्चू कडूंनी मुख्ममंत्री महोदयांना का सांगितले नाही ?म्हणून ह्या पुजेचे व महाप्रसादाचे खरे लाभार्थी म्हणजे हेच आ. बच्चू कडू आहेत अस म्हटल तर आमच चुकल कुठे ?.म्हणून तर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत आहे. फेसबुकवर संभाजी ब्रिगेड संघटक संतोष शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयात पूजा-अर्चा करणे हे अनाकलनीय आहे. सरकार हे धर्मनिरपेक्ष असावे, धर्मांध असणे दुर्दैवी आहे. तसेच अशोक पळवेकर म्हणाले की, हे कृत्य संविधानविरोधी आहे ! आम्ही या कृत्याचा निषेध करतो. सत्यनारायण तुम्ही तुमच्या घरी खुशाल करा. आमचे काहीही म्हणणे नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘कावळा विष्ठेत बुडवितो चोच ! पुन्हा ती तशीच दुधामध्ये !
ऐसे आज कोणी विज्ञानपाखंडी ! नारळ नी अंडी ओवाळती !
विज्ञानाचे ज्ञान यथ्येच सेवीती ! तोंडीही लावती कर्मकांड !
म्हणे विश्वंभर कैसे संकरीत ! खेचराचे गोत आहे यांचे !.’
हिंदुत्वाच्या नावाने देव्हारे माजवणारांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदूत्व समजून घेणे गरजेचे आहे, कारण ते म्हणतात की, आमच्या घराण्यात सत्यनारायणाची पुजा कधीच झालेली नव्हती आणि आजही होत नाही. (संपूर्ण वाड्मय खंड पहिला, पान १०९) प्रबोधकारांच्या या वरील वाक्याला हिंदुत्व म्हणतात ओ शिंदेसाहेब, तुम्ही जे संघाच्या इशा-यावर नर्तन करताय ते हिदूत्व नव्हे. सत्यनारायणाच्या पुजेतून फलप्राप्ती होते असे बहुजन समाजाला सांगून आजपर्यत भटांनी केवळ मलिदा चाखला पण ह्या कथेचा इतिहास नेमका काय आहे ?हे बहुजन समाजाने कधी वाचलच नाही. त्यामुळे तर सत्यनारायणाने बहूजनांचा सत्यानाश केला आहे. अरुण जावळे यांनी २२ मार्च २०१३ च्या लोकप्रभा साप्ताहिकात ‘सत्यनारायण कुठून आला ?’ यामध्ये लिहले की, सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत. नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य-नारायण’ अस्तित्त्वात आला. तर प्राख्यात इतिहास संशोधक दिवं. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पुराणकथा व वास्तवता या ग्रंथात पान नं. ४१ वर सत्यनारायणाच्या विषयी म्हटले की, ‘त्याचा पुराणात काहीच आधार नाही तसेच सत्यपारीचा सत्यनारायण झाला आहे.’
सत्यनारायण व्रताचे मूळ शोधण्याचा प्रयत्न कलकत्याच्या हरप्रसाद शास्त्र्यांनी त्यांच्या ‘खेकडे आणि खेकडी’ या लेखसंग्रहात ते सत्यनारायणाची कथा या शीर्षकाखाली म्हणतात की, दहापंधरा वर्षापूर्वी संतोषी माँ. (माता) ची पूजा जशी वणव्यासारखी देशभर पसरली तशीच हीही कथा सव्वाशे वर्षापूर्वी देशभर झंझावाताप्रमाणे पसरली. १८८६ मध्ये सनातनी पुढारी विश्वनाथ नारायण मंडलिकांना पहील्यांदा अशी पुजा करताना पाहुन चक्रावून गेलो होतो.’ तर सत्यनारायण कथेच्या उगमा संदर्भात भिमराव कुलकर्णी म्हणतात की, ‘या पोथीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ही कथा स्कंद पुराणातील रेवा खंडात असल्याचे सांगितले आहे. पण ही शुद्ध थाप आहे. स्कंद पुराणात ही कथा नाही.’ म्हणून सागावं वाटत की, ब्राम्हण पुर्वीपासूनच ध चा मा करून बहुजन समाजाला लुटत आहे. म्हणून तर खोटंच खोटं पण किती मोठं ?या पुस्तकात अशोक राणा म्हणतात की, ‘नारायण’ या देवतेचा उदय द्राविडी संस्कृती आणि बौध्दधर्म यांच्या संसर्गातून झाला. तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्याहीपेक्षा अव्वल म्हणून ‘सत्यनारायण’ हा शब्द तयार करण्यात आला. जसे शिर्डीच्या साईबाबाच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याकरिता ‘सत्य साईबाबा’ हे नाव एका ढोंगी बाबाने स्विकारले. (अधिक माहीतीसाठी वाचा अशोक राणा लिखित खोटंच खोटं पण किती मोठं ?).
आज नवीन व्यसायाला सुरूवात असो की, विवाह सोहळा झालेला असो त्यानंतर सत्यनायण पुजेचे देव्हारे मांडून भटांची तुबंडी भरण्याचे काम हे शिकलेले ?रेडे करताना दिसतात. तेव्हा यांना सागावं वाटत की, महादेवशास्ञी जोशी यांनी संपादीत केलेल्या ‘भारतीय संस्कृती कोष’ मध्ये म्हणतात की, शंभर वर्षापुर्वी सत्यनारायण हे व्रत कोणाला माहीत नव्हते. पेशवाईच्या कागदपत्रांत सत्यनारायणाच्या पूजेचा उल्लेख आढळत नाही. सत्यनारायण हे जोडनाव आहे. विष्णुसहस्त्रनामात ते नाही.” सत्यनारायण पूजेचा उगम मुसलमानी आहे. या पूजेचे प्रारंभीचे नाव ‘सत्यपीरेरपूजा’ असे आहे…..सत्यपीराला शिर्णी अर्पण करण्याची मुसलमानांची चाल बंगाली हिदूंनी सत्यनारायणाच्या पूजेत स्वीकारली. सत्यपीर हा वृध्द ब्राम्हणाच्या रुपाने लोकांना दर्शन देतो, अशा प्रकारच्या कथा ओरिसात प्रचलित आहेत.’ त्यामुळे ज्यांचा उल्लेख कुठेच नाही त्याची पुजा थाटून हात जोड्याण्यात कसले हिंदूत्व आहे ?असली पुजा पाहुन आपल्याच धडावर आपलच डोक असलेला माणूस अशा पुजेचे देव्हारे पाहून याला हिंदुत्व म्हणण्याऐवजी झंडुत्व म्हणाला तर त्याच काय चुकेल ?त्यामुळे आपल डोक जाग्यावर ठेवा. आपण कशाची पुजा करत आहोत, यातून कोण्याची पोट तृप्त होत आहेत याचा विचार करा. कारण बंगालमधील रामेश्वर भट्टाचार्य लिखित ‘सत्य पीरेर कथा’ (संपा. श्रीनागेन्द्रनाथ गुप्ता १९३०) म्हणतात की, ‘सत्यनारायण कथेद्वारे बहुजन समाजाचे मानसिक व आर्थिक शोषण चालू आहे. शेतकरी – कामकरी वर्ग घाम गाळून जे मिळवतो, ते कधीही कष्ट न करता भटजी घेऊन जातो. त्याला बदामाचा शिरा खायला मिळतो, खारिक, हळकूंड, सुपारी इ. गोष्टी फुकट मिळाव्यात म्हणून या पूजेत त्यांना नवग्रहाचे स्थान देण्यात आले. पूजा झाली की, सुपारीचा गणपती अडकित्यात जातो व बदाम खारकांचे राहू – केतू भटजींच्या पोटात. त्याचे ते काहीच वाकडे करीत नाहीत. शेतक-यांच्या पोरांना बदाम पहायला मिळत नाही तर इथे भटजींची रेलचेल. मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ते पदार्थ भटजीला विनासायास मिळतात तर शेतक-यांना मात्र त्याची वानवा. भटजींच्या अनेक पिढ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था लावणारी ‘सत्यनारायणाची पूजा’ म्हणजे त्यांची ‘रोजगार हमी योजना आहे’ म्हणून तीला पुरोगामी मंडळीही विरोध करीत आहेत. म्हणून तिचे डळमळीत होणारे स्थान हेरून आता ‘वझभवलक्ष्मी’ व्रतांचे खुळ माजविण्यात येत आहे. म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘काय करील तो सत्य नारायण ! नाही तुला ज्ञान प्रपंचाचे !
सत्यनारायण जर देतो पोट्टे ! गुडघ्याला घट्टे तुझ्या कैसे !
पुजेचा तो माला ब्राम्हण लुटितो ! कचरा राहतो धन्याहाती !
म्हणे विश्वंभर सत्यनारायण ! पोटाचे पुजन ब्राम्हणांच्या !.’
नवनाथ रेपे लिखित भट बोकड मोठा हे पुस्तक घरपोहोच मिळेल.
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६४४०८७९४