निष्ठेचं नशा नाटक
((प्रामाण्य आणि निष्ठा शोध))
माणसाचं जगणं समजून घेणं ही तशी अवघड गोष्ट आहे तरीहीजगणं समजून घेणं हे विचाराकडे जाणं आहे म्हणून ते अत्यावश्यक ठरतं माणूस निष्ठा कश्यावर ठेवतो ? माणूस निष्ठा कष्यावर ठेवत नाही ? निष्ठेची नशा करतो निष्ठेला नकार देतो आणि निष्ठा म्हणजे काय असते ?निष्ठा हा पूर्वसंस्कार असतो का? निष्ठा हे संस्कृतीचे ओझे असते का? निष्ठेला नकार दिल्यामुळे काय साध्य होते ? निष्ठेची नशा केल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात ?या अनेक प्रश्नांना प्रत्येक व्यक्ती ने भिडायला हवे
निष्ठा निर्माण कशी होते? जीवनाच्या हरेक टप्प्यावर निष्ठेचे प्रकार किती असतात ?अनुभूती आणि विचार यांच्यामुळे निष्ठा बदलतात का?
अनुभव घेतला नाही आणि विचार केला नाही तर निश्चित नशा चढते का? या प्रश्नांची उत्तरे मिळवणे हे निष्ठा समजावून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे
एका निश्चित विचारावर स्थिर राहणे त्यानुसार कृती करणे त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच सामान्य स्वरूप होय जो विचार ठरवलेला असतो तो मात्र सुरुवातीस अनुभवलेला नसतो त्याचा विचारही केलेला नसतो परंतु त्या वर्तमानामध्ये असलेल्या पूर्वसुरांच्या चालत आलेल्या वारशाचा विचार स्वीकारला जातो आणि ती विचार सरणी ही विचार निष्ठा बनते मुळामध्ये विचार आणि विचारनिष्ठा या पुन्हा भिन्न असतात यामध्ये खूप फरक करायला हवा
ज्या विचारातून विचारनिष्ठा बनते तो विचार नेहमी बदलत असतो तो समजावून घेणे खूप महत्त्वाचे असते विचार असे गतिमान बदलते स्वरूप हे जर प्रतीत व्हायला लागले तर विचारनिष्ठा सुद्धा बदलता येतात किंबहुना बदलल्या त्या आवश्यक असते अशी एक विचाराची बदलती काल व संदर्भसापेक्ष अवस्था जी प्राप्त होते ती स्वीकारण्याची लवचिकता मनाची उदारता खूप महत्त्वाची असते अशीच व्यक्तिमत्त्वे नवा विचार स्वीकारण्याला अनुकूल असतात यातूनच नवा प्रगतीक विचार पुढे जात असतो भारतामध्ये प्रगतीक विचार हा पराभूत होतो आहे आणि सनातन विचार यांच्या निष्ठांचे कडवे गट तयार होत आहेत सनातन विचाराचे नशा चढते आहे
सनातन विचारनिष्ठा वरिष्ठ होत आहेत या कारणांचा शोध घेण्याची नितांत गरज आहे मुळात माणूस हा अनुकरण आज्ञाधारकता यांच्या आधारेच बहुतांश जगण्याचा प्रयत्न करतो त्याचे वर्तन त्या स्वरूपाचे असते विचाराने कृती करणे जीवनाची वाटचाल करणे ही स्वतंत्रता भारतीय नागरिकांच्या व्यक्तिमत्वात सर्वांकष पातळीवर अद्याप रुजली नाही ती स्वीकारली जात नाही त्याप्रमाणे जगण्याचे सर्व दूर प्रयत्न होत नाहीत असे आढळून येते इतरांचा विचार इतरांचे वर्तन इतरांच्या आज्ञा इतरांचे आदेश हे शिरसावंदे मानून बहुतांश समाज वाटचाल करीत असलेला सभोवताली आढळून येतो आणि त्यातूनच निष्ठेची प्रक्रिया दृढ होत राहते माणुसकीनेवार्तन करावे सदाचार बाळगावा बंधूभाव सर्वांच्या प्रति ठेवावा सर्व जाती धर्म हे सारखे आहेत स्त्रीच्या अंगी सेवावृत्ती असते यासारखे मूल्यांचे वर्तन भाव माणूस मनामध्ये गृहीत धरतो आणि या मूल्यांच्या प्रति आपली वर्तन श्रद्धा निश्चित करतो तसा वागू लागतो त्यातूनच त्याची विचारनिष्ठा तयार होते
निष्ठा आणि विचारनिष्ठा या या वेगवेगळ्या असतात विचारातून निष्ठा तयार होते ही प्रक्रिया बरोबर आहे पण निष्ठेतून विचार नष्ट होतो याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते याची कारणे तपासणी खूप महत्त्वाचे आहे
चालत आलेली रुढी परंपरा आणि संकेत मान्य करणे त्यानुसार जीवन व्यतीत करणे ही जीवन राहटी बनते यामध्ये पारंपारिक निष्ठा आपसूकपणे पुढे जात राहतात स्वीकारल्या जातात या पारंपारिक वर्तनाच्या परिशिलनाचा प्रयत्न केला जात नाही त्यामुळे सनातन विचाराच्या प्रभावी निष्ठा समाजात सर्वत्र जोपासत असल्याचे आढळून येते भेदाभेद विषमता अस्पृश्यता शोषण दुराचार यासारख्या सामाजिक जीवनाच्या वेदना हे समाज जीवनाचे साचले पण असूनही त्या समाज मनावर प्रभाव गाजवत असतात आणि अंध पणे या पारंपारिक रूढ्याने परंपरांच्या वर्तनाचा प्रयत्न बहुतांश समाज करीत असतो आणि आपली जात निष्ठा आपली धर्मनिष्ठा आपली वंशनिष्ठा आपली पक्षनिष्ठा आपले राष्ट्रनिष्ठा या दिशेने निष्ठांची वर्तुळे विकसित होत राहतात पण सामान्य पातळीवर वंश जात धर्म भाषा हे आपसूक निष्ठांचे योगायोग असतात त्या निष्ठा म्हणून गौरवने महत्त्वाचे नसते हेही बहुतांश समाजाला कळत नाही आणि त्यामुळे अपघाती अभिमानाच्या घटना याच मानवी जीवनामध्ये जीवन निष्ठा बनतात जात पालन धर्म पालन वंश पालन देव देवतांचे पूजा अर्जा पालन या सर्व पुढे चालत आलेल्या जीवन कृती आहेत या तपासणी आवश्यक आहे याचा विचार करायला शिकले पाहिजे
हे प्रत्येक माणसाकडून होत नाही पारंपारिक कृती याच जीवन निष्ठा बनतात तेव्हा पारंपारिकता वरिष्ठ होते त्यातूनच धर्म जात भाषा या निष्ठांची नशा चढते मी हिंदू आहे मी क्षेत्रीय आहे मी थेट टिंब टिंब आहे अशी भाषा असा अभिमान जेव्हा व्यक्त होतो तेव्हा वंश जात धर्म आणि भाषा निष्ठा यांच्या नशांचे समूह सभोवताले कळपाच्या स्वरूपामध्ये वावरत असलेले आढळून येतात आणि ती एकमेकांच्या विरुद्ध निष्ठा सिद्ध करण्यासाठी उभे राहतात आणि एकमेकांच्या अस्तित्व संपवू पाहतात तेव्हा निष्ठांची नशा ही सर्वच मानव जातीला घातक असून विचार सापेक्ष तेनुसार निष्ठा बदलायला हव्यात आधुनिकता ही सर्वांकष श्रेष्ठ असते असेही नाही पारंपारिकता सर्वांकष त्याज्य असतेअसे हि नाही तरीही विचारशील समाज तयार करणे
कडवट श्रद्धा आणि निष्ठांचे आग्रह विचार परिशिलनाने बदलायला हवेत या प्रकारची लवचिकता ही प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या विकास साठी आवश्यक असते आज विचारनिष्ठांची नशा याची चिकित्सा व्हायला हवी. कोणतेही विचार हे सर्वकालिक सत्य असत नाहीत विचाराला हितसंबंध घटना आणि संदर्भ आणि काळ हे बदल होतात विचारही या संदर्भीय परिणामाची फलसृती असते विचार हे जीवन उद्दिष्ट अनुसरून व्याप्त असे नव्हे संकल्पनांचे रचना स्वरूप असते ते अमूर्त असते म्हणून अमूर्त विचारांच्या विचार प्रक्रिया समाजाला करता आल्या पाहिजेत
विचाराचा विचार करता आला पाहिजे विचाराची निष्ठा म्हणजे काय हे ठरवता आले पाहिजे त धर्मनिष्ठा जातनिष्ठा व वंशनिष्ठा यांच्यासाठी मानवी जीवन आहे का? याहून मानवी जीवन श्रेष्ठ आहे यामध्ये स्वतंत्र फरक करण्याची बौद्धिक कुवत समाजातील प्रत्येक घटकाच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रा ची आहे
प्रामाण्य आणि निष्ठा हे खूप जवळ असते प्रामाण्य म्हणजे जे बुद्धीला प्रतीत होते ते होय जे समाजाच्या अनुभवातून पुढे आले आहे ते सर्वांना मान्य आहे आता त्यामध्ये बदल करण्याची गरज नाही अशी जी वर्तन रूप बाब असते त्यास प्रामाण्य मानण्याचा संकेत असतो
प्रामाण्याचे निकष ठरवणारे लोक हे इथल्या धर्म जात व्यवस्थेचे ताबेदार असतात त्यामुळे प्रामाण्याच्या पुढे जाऊन वर्तनाच्या निष्ठेचे नवे निमित्त व्यक्ती जीवनात कायम स्वीकारले पाहिजे अशी बंधनकारकता असे रूढीचे जाच अर्थातच अशी कर्मकांडे लादली जातात आणि निष्ठेची नशा त्या त्या जनसमुहाला चढते
धर्मश्रेष्ठ जात श्रेष्ठ ईश्वर श्रेष्ठ हे श्रेष्ठत्वाचे गीत हे निष्ठांच कळप तयार करत असते निष्ठांचे कळप हे सुद्धा एक प्रभुत्व राजकारण आहे निष्ठांच्यासाठी प्रतीकांची निर्मिती केली जाते प्रतीकांच्या निर्मितीमध्ये इतिहास आणि संस्कृतीची मोडतोड केली जाते पराभूत जनजाती धर्मगट संस्कृतीतील प्रगत समूह वंश यांचा सर्व इतिहास बदलून सोयीचा इतिहास निष्ठांच्या पुनर्स्थापनेसाठी सतत लिहिला जातो राजेशाही घराणेशाही मंदिरे मठ आश्रम संप्रदाय संप्रदायाचे वारसदार हे निष्ठांचे महामार्ग तयार करीत असतातयातूनच निष्ठां ची नशा भक्त नावाचा समूह हे वर्तन करीत असतो
निष्ठा ही जीवनाची अंतिम गोष्ट जेव्हा केली जाते तेव्हा त्या व्यक्तीला त्या समूहाला श्रेष्ठत्व बहाल करून निष्ठांचे राजकारण करणारे बाह्यताभेदार घटक गौरवाचे गीत गात असतात आणि निष्ठांच्या नशेत त्या अनुयायांचे त्या कार्यकर्त्यांचे अनमोल आयुष्य संपुष्टात येत असते निष्ठांच्या इतिहासाला जीवन आचरण असे नाव दिले जाते त्यातून चरित्र तयार होते त्यातून आदर्श तयार केले जातात आदर्शाच्या कथनाच्या गहिवरच्या प्रथा सुरू होतात आणि पुन्हा समाज निष्ठांची नशा करायला नव्या पिढ्यांना शिकवत असतो पण पिढ्या मात्र निष्ठा आणि प्रामाण्य हे जपण्यात संपून जातात आणि त्यांच्या यहवादी जीवनाला अविष्काराचे स्वरूप येत नाही ते फक्त निष्ठांचे आग्रह मूल्यांची श्रद्धा यांच्या जंजाळात फसत राहतात आणि अदृश्य नियंत्रक व व्यवस्था दावेदार हे मात्र नव्यानिष्ठा नवी प्रतीके तयार करीत राहतात उदाहरणार्थ नवा नेता नवा पक्ष नवी हिंदुत्व विचारसरणी नवे दलितत्व नवी ख्रिश्चनिटी नवा प्रबुद्ध बुद्धिझम नवे मुक्तिदायी जीवनाचे स्त्रीमुक्तीचे अवकाश आधुनिक उत्तर काळातील तंत्रज्ञानाची शरणता अदृश्य शोषणाचा मालक भांडवलाची स्थलांतरता भ्रष्टाचाराची सार्वत्रिकता या नवनिष्ठा तयार होत आहेत यांची नशा चढते आहे यामध्ये मानव्य ही निष्ठा कम अस्सल होत आहे आणि उपभोग आणि वस्तूंचा अपरिमित हव्यास साधनसंपत्तीचा संचय या नव्या भोगवादी निष्ठा आता तयार होऊन रूढ झाल्या आहेत
या नव्या निष्ठांची नशा हे आधुनिक मानवी समाजाचे आधुनिक उत्तर काळातील नवे स्वरूप आहे येथेसब झूट महत्त्वाचे आहे सर्व काही फिजूल आहे सत्ता हेच सर्वोच्च निष्ठेचे खरे स्वरूप आहे तेच मुक्तीचे अंतिम हत्यार आहे अशी नवी मानव्य नाकारणारी नृशंस सत्ता अभिलाषा गाव ते गल्ली गल्ली ते दिल्ली अशी तयार होते आहे त्यामुळे नव्या निष्ठेच्या नशेचा उन्मादी समाज हे भारताचे सर्वंकष नीती मूल्यांच्या उध्वस्त कालखंडाचे वेगवान प्रवास रूप आहे असे दिसून येत आहे यामध्ये निष्ठेच्या नशेला हिंसेचा आधार आहे आज सर्व प्रकारच्या असत्याचे समर्थन हे निष्ठेचे दृढीकरण करण्यात येत आहे म्हणून निष्ठेची नशा विचाराची नशा ही पुढे पुढे हिंसेची नशा या दिशेने जाऊ द्यायची नसेल तर या देशाला इथल्या प्रत्येक जनसमूहाला विचार परीशीलन व मानव्याचा सर्वोच्च आदर करीत राहणे हे विचारनिष्ठेपेक्षा खूप महत्त्वाचे आहे सापेक्ष सर्वांकष वर्तन असे असायला हवे ही विचारशीलता हेच मानव्याचे बदलते स्वरूप असते म्हणून विचारनिष्ठा हीसुद्धा निष्ठेची नशा होता कामा नये याचे आत्मपरीक्षण करण्याची चांगली सवय प्रत्येक व्यक्तीचे समूहाला लावून घ्यावी लागेल असे म्हणून वाटते तरच निष्ठेच्या नशेतून ऐकमेकाच्या नृशंस हिंसे कडे निघालेला भारत वाचवता येऊ शकतो असे वाटते.
शिवाजी सो नु बाई प्रेस
सातारा 10 जुलै 22 वेळ 9.12