प्रा.शहाजी कांबळे यांना राज्यमंञीमंडळात संधी द्यावी
- रिपाई चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे
रिपाई आठवले गटास मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी
कोल्हापूर,दि.९ (प्रतिनिधी) भाजप व रिपाई आठवले यांची युती महाराष्ट्रासह देशामध्ये दहा वर्षे झाली असून केंद्रीय स्तरावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा स्थान देऊन भाजपाने रिपब्लिकन पक्षाचा सन्मान केला आहे. महाराष्ट्रामधील सत्तांतरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे यांना मंत्रिमंडळात सहभागी करून कोल्हापूर जिल्हा व शाहू भूमीचा सन्मान करावा असा ठराव रिपाईच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.कोल्हापूरातील कसबा बावडा येथील सर्किट हाऊस येथे रिपब्लिकन पक्ष (आठवले) जिल्हा कार्यकारणी व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. हा ठराव रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना पाठवण्यात आला आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते.
यावेळी प. महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी सरचिटणीस गुणवंत नागटिळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, हातकलंगले तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर,गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, कागल तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के,अतुल सडोलीकर,काशिनाथ एडके,बैजू कांबळे, रिक्षा युनियन अध्यक्ष शरद फडतरे, कागल तालुका कार्याध्यक्ष बी आर कांबळे, जयसिंग पाडळीकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.