पूजावा विठ्ठल
सांगावा विठ्ठल
संमोहन विठ्ठल
((स्वयम् विवेक))
कोणत्याही व्यक्तीची श्रद्धा ही व्यक्तिगत असते श्रद्धा हा त्या व्यक्तीचा मूल्य विवेक असतो तो असायला हवा हा मूल्य विवेक वाढत रहावा हे हि संस्कार व श्रद्धेचे माध्यमातून सतत करण्यात येतात असा दावा केला जातो पुढे त्याचे उदिष्ठ साध्य रूपांतर होत असते असे पहावयास मिळते त्यासाठी तर समाजात सद वर्तन वाढायला. हवे असते हि वाढ जेव्हा आढळून येते तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीने धारण केलेली श्रद्धा संस्कार हा महत्वाचा असतो असे हि मानले जाते
मुळात श्रद्धा ही एकप्रकारचे अनुकरण असते श्रद्धा ही पारंपारिकता असते आणि पूर्व सुरींच्या कर्मकांडाचे पुढील पिढ्यांनी चालवलेले ते वारसा अनुकरण असते श्रद्धेला अनामिक महत्त्व का प्राप्त होते? त्याचे कारण गूढ बरे व वाईट होईल भीती दाखविली जाते घातली जाते हि भीती दैनदिन घटनाशी सारखी जोडली जाते त्यातून श्रद्धा खोल रूजत राहते आहे दुसऱ्या बाजूलाश्रद्धेला श्रेष्ठ मानण्याचे परम कर्तव्य असंख्य लोक हे काम करीत असतात
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात बहुजनांचा आध्यात्मिक उत्सव हा वारीच्या रूपाने सतत भरत असतो आणि शतकान शतके तो चालत आला आहे. वारीचे अर्थकारण वारीचे अध्यात्म वारीतील बहुजन एकात्मता वारीतील भागवत संप्रदायातील विचार प्रबोधनाचे रूपांतरण भागवत संप्रदायातील नव अध्यात्म वादाचा विकसित प्रवास वारीतील कला साहित्य संगीत वारीतील जनप्रबोधनाचे अविष्कार प्रतीत होणारे आहेत तेआनंद भुवन जरी असले तरी ते वारीतील मानवी कु विचार वारीतील अनारोग्य
वारीतील निष्क्रिय वादातून व्यर्थ ठरणारा श्रमनिष्ठेचा विचार वारीतील जनजातींचा बंधुभाव वारीतील सामाजिक अभिसरणाचे गावगाड्यातील आजचे वास्तव वारीतील अभिजन वाद्यांचा प्रभुत्ववाद वारीतील स्थान महात्म्यातून निर्माण होणारे असंख्य प्रकारचे लूट सुरक्षा अत्याचार रोगराई चोरी यासारखे असंख्य प्रश्न नाहीसे करते का? हे वारीच्या पोटातील दुःखाचे घटक आहेत . याचे भान कधी येणार हा प्रश्नच आहे? याची चिकित्सा करण्याचे भान महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाला अधून मधून कधीतरी प्राप्त होते परंतु ते कायम टिकत नाही सहजयोगे नामसंकीर्तन करणे त्यातून आत्मभान विसरणे आत्मभान विसरून एक मुक्तीचा क्षणिक आनंद घेणे याला वारीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे टाळ आणि मृदुंग काळा बुक्का आणि तुळस गंध आणि हरिनाम यासारख्या असंख्य भक्ती जागृतीमध्ये लाखो भाविकांचे स्वतःला व्यस्त करून घेणे हा एक समूह संस्कार आहे समूहाचे भारलेपण आहे समूहाचे बेभान पण आहे समूहाचे भक्ती तल्लीन रूप आहे समूहाचे दुःख वेदना निराशा विसरण्यासारखे आहे समूहाचे वारीच्या कालखंडात तरी समतेचे वर्तन आहे माऊलीचे एकमेकांनी रूप विनम्रपणे पाया पडताना गळाभेट घेताना ते अनुभवणे आहे त्यासाठी माऊलीच्या हृदय हाकेचा उच्चार जेव्हा ऐकायला मिळतो तेव्हा क्षणिक समानता क्षणिक आत्मभान विसरणे याची अनुभूती लक्षावधी वारकरी संप्रदायातील बंधू भगिनींना येते हे वारीचे भारले पण वारीचे हे संमोहन आहे का? या अंगाने विचार केला जातो परंतु यातील निष्कर्ष आणि निरीक्षणे स्वीकारली जात नाहीत.
समाजाला आत्मविश्वास बाळगून जगायला शिकवणे संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे प्राप्त जीवनातील संकटे दुःख हालापेष्ठा या नाहीशा करता येतात हा विश्वास बाळगण्यासाठी भाग पाडणे दुःख हा ज्ञान अभाव आहे दुःख हा स्वार्थ परिणाम आहे.
विचार आणि बुद्धीच्या आधारे प्रयत्न आणि कष्टाच्या आधारे कौशल्य आणि निर्णयाच्या आधारे आपले जीवनातील प्रश्न सुटू शकतात असे जगण्याचे दृढनिश्चयी भान हे समाजाच्या अंगी साक्षरतेतून रुजते हे सर्व प्रकारचे जीवनमान समाजाच्या प्रबोधनाच्या उद्दिष्टाचाच एक भाग आहे. पण हे साध्य होत नाही म्हणून समाज हा अध्यात्माच्या छंदी कायम लागला पाहिजे असे राजकीय उद्दिष्ट ठेवणे हे समाजाला अध्यात्माच्या नशेत ढकलण्यासारखे आहे समाज हा प्रयत्नवादी ज्ञानवादी कष्टवादी तयार करणे हे समाज धोरणांचे उद्दिष्ट असायला हवे समाज दैवशरण ठेवणे यातून जीवनातील वर्तमानाचे सगळे प्रश्न सुटतात असे कधीच घडत नाही वारी ही सामूहिक संमोहनाच् अनेक प्रकारचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वर्तन आहे महाराष्ट्राचा तो अध्यात्मिक प्रवास आहे भागवत संप्रदायाच्या प्रभुत्व वाद्यांची ती इतिहास काळापासून चालत आलेली ती वर्तमानातील खेळी आहे. नुकतीच देशभर गाजलेली तुकोबाची वेश् भूषा करून लोक प्रतिनिधी आपण संतांचेच अवतार कार्य करीत आहोत असे छद्मी इतिहासाचे कथन नाट्य रचून निघून जातात तेव्हा हेच सिध्द होते की ते तश्या कृती करतात त्यातून पुढे असा कलपित इतिहास रचतात म्हणूनच वारी तील असंख्य प्रकारच्या संमोहन घटकांचा अनेक प्रकारे विचार करण्याची गरज आहे. ती साक्षरता रुजविणे अत्यावश्यक आहे म्हणून लेखन प्रयास केला आहे
भक्तीच्या प्रांगणात विठ्ठलाचे नाम घेणे ही एक क्षणिक समाधी आहे तो स्वर आर्त आक्रोश हि आहे तो आनंद हि आहे हेभक्ती नाम संकीर्तन जेव्हा श्रेष्ठ श्रेष्ठ ठरते तेव्हा भाविकाला त्या वारकऱ्याला मुखी विठ्ठलाचे नाम या नाम गजराने अमूर्त ईश्वर भेटतो? एवढेच नव्हे तर सावळा विठ्ठल हा मन वेडावून घेतो. हा सावळा विठ्ठल त्याच्या मूर्तीची मनमोहकता त्याचे शांत दर्शन त्याचा पोशाख त्याच्या भक्तांचा गोतावळा त्याच्या लक्षावधी भाविकांनी तो चालवलेला नामसंकीर्तनाचा टाहो फोडून केलेला नाम गजर हे नेमके काय आहे? हे स्वर समाधीचे रूप आहे ती भक्ती वर्तमानाची बेभान कृती आहे हीच कृती नेहमी भूतकाळाला व सर्व यातना दुःख विवंचना याना भावनिक पातळीवर दूर ठेवत असते . विठ्ठलाचे नाम गजर करणे. हे व्यक्ती आणि समाज जीवनातील असंख्य प्रकारचे प्रश्न असेच साचलेले असतात पण या सर्व वेदना हे क्षणभर स्वतः पासून दूर ठेवण्यासारखेच असते इथेच मन व भावनाच संमोहन यशस्वी होते ते मन मुळात इतर बाबीत गुतविलेले असते ते येकातून काढून दुसऱ्यात कार्यप्रवण केलेले असते त्यामुळे विठ्ठल भक्ती च काय कोणत्याही भक्ती तील वर्तनातील साधर्म्य ये एक सारखेच असते म्हणून हे भिन्न भिन्न व्यक्तीचे भिन्न प्रकारचे दुःख मुक्ती क्षणिक पातळीवर काही वेळा पर्यंत तयार होते हेभक्ती तल्लीन कारणाचे शोध असतात.
भक्तीच्या साधनात भक्ताने योजलेली सर्व संगीत साधने हे भक्तीचे माधुर्य वाढवतात असंख्य प्रकारची संगीत साधने त्यांचे संयोजन त्यातून सादर केलेले गीत गायन अभंग गायन प्रवचन प्रवचनांना दिलेला सामूहिक रचनेचा थाट आणि त्यातून सादरीकरण करणे हे सर्व काही भक्तीरसाचे विकसित रूपच असते ते क्षणभर तसे वाटते आज तर समाज माध्यमांमधून भक्तीचा केंद्र विठ्ठल त्याच्या नयन रम्य कडेवर हात ठेवलेल्या मूर्ती त्याची सजावट हे सारे काही थक्क करणाऱ्या आहे त्याच्या नावाचा टाहो फोडून केलेला आक्रोश त्यासाठी सामूहिक गरजेचे वेड सर्वकाही सामान्य माणसांना खेचून घेते गर्दी ही भक्ती असते का? गर्दी ही कला असते का? गर्दी ही समांतर असते का गर्दी ही विशुद्ध भावनांची विठ्ठल केंद्री यात्रा असते का गर्दीमध्ये गर्दीचाच जल्लोष असतो गर्दीमध्ये गर्दीचीच चर्चा असते गर्दीचे महात्म्य म्हणजे समाज जीवनाचे सुखदुःखांचे ते प्रवचन असते का गर्दीच्या ठिकाणी दुःखाच्या विवेचनाच्या आधारे प्रयत्नां च्या शपथ असतात का गर्दीच्या ठिकाणी आपल्या शोषण अत्याचार कर्जबाजारीपणा आजारपण यासारख्या आ संख्य प्रश्न सोडवण्यासाठी विचार मंथन होते का? गर्दीच्या ठिकाणी वर्तमानाचे प्रश्न यासाठीचा प्रयत्नवाद याची जोड देण्याची निर्धारता सिद्ध होते का? गर्दीच्या वारीच्या ठिकाणी एक दाता अनेक याचक असंख्यभक्त असंख्य दानशूर सर्व भक्तांचा मेळा असे एक संमिश्र अपरिचित तरीही माऊली असे बेभानपण वारी देते का? वारी ही वारकऱ्यांना स्वयं आत्ममग्न करते का? वारी वर्तमानाच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करा असेच अनास्थेचे समूहाचे मन तयार करते का? आपले जगणे हे आपल्या हाती नाही आपले प्रश्न सोडवणे हे आपल्या हाती नाहीत असा नपुसक निष्क्रियवाद हा वारीतून वाढतो का ? जीवन जगण्यातील निष्क्रियता अर्थातच निवृत्तीवाद हे वारीचे जनप्रबोधनाचे उद्दिष्ट नाही परंतु जीवनातील निवृत्तीवाद आणि जैसे थे वाद हा वारीतून वाढतो का? याचा विचार करण्याची नितांत गरज असते प्रत्येक व्यक्तीच्याजीवनात विधायक संघर्ष आवश्यक असतो. सार्वजनिक. जीवनात सामाजिक ऐक्य आणि सहमती ही विकासासाठी सर्वांना आवश्यक असते हे गावगाड्यातील परस्पर परावलबन असल्याने त्या सर्वांच्या मधील एकोपा व त्यातील बंधुभाव हा भक्ती पेक्षाही श्रेष्ठ आहे प्रत्येक व्यक्तीचे सार्वजनिक व राजकीय जीवनातील विशुद्ध वर्तन हे भक्ती मय जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ही साक्षरता वारीतून प्राप्त होते का ? पूजेचे कर्मकांड ही स्वतःची व श्रद्धामय ईश्वराची फसवणूक नाही का? हे प्रश्न वारीतील लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये कधीतरी उभे राहतील?
वारी हे कला राजकारण आहे यामध्ये जादूमैसंगीत आहे टाळ मृदुंग आहे चिपळ्या आहेत विना आहे भारुड आहेत कीर्तन आहे प्रवचन आहे पावले आहेत माऊलीचे रिंगण आहे विठ्ठलाचे दर्शन आहे असंख्य अनोळखी माऊलींची गळाभेट आहे हे सर्व भक्तीच्या प्रांगणातील कलेचे साज शृंगाराचे असंख्य प्रकार आहेत वारीही कलेच्या आधारे खूप मन वेडावून घेणारी ठरते नादमाधुरीय करून रसाचे गायन रसाळ प्रवचने भारुडे यासारखे वारीतील असंख्य प्रकार हा एक कलेचा चल प्रवास आहे वारीही पाहण्याची अनुभवण्याची वारीत चालण्याची गोष्ट आहे सगळे काही विठ्ठल मय आहे वारीतील असंख्य दिंड्या त्यांचे मानकरी त्यांच्या रूढी प्रथा शिस्त सगळे वेगळे आहे वारीला चित्रमयता जेव्हा प्राप्त झाली तेव्हापासून ज्ञानोबा तुकोबांच्या वारकऱ्यांचा हा भक्तीचाच सागर सतत वाढू लागला आहे तो भरून वाहू लागला आहे हीच ती गर्दी आहे हेच ते गर्दीचे इतरांना खेचणे आहे हीच ती गर्दी गाते नाचते विठ्ठल विठ्ठल अक्रोश करते याचाच इतरजनांच्यावर संमोहन शास्त्रानुसार वर्तन स्वीकाराचा आज्ञापालनाचा प्रभाव पडतो आणि लोक भावनेच्या आधारे सहजता व स्वाभाविकता हे जे भक्तीचे गुण आहेत त्यामध्ये स्वतःला रूपांतरित करतात आणि वारीच्या कला राजकारणाचा एक आस्वाद घटक म्हणून समर्पित होतात आणि वारी हे गर्दीचे गतिमान महाराष्ट्राचे सांस्कृतिक चक्र दरवर्षी देहू ते आळंदी ते पंढरी असे फिरत राहते आहे महाराष्ट्र देशी बहुजनांच्या पूजा पटन अधिकाऱ्याला पुरुष सु क्तातमहत्त्व आहे का? वारी हे विषमतेचे शोषणाचे निष्क्रिय वादाचे निवृत्त वादाचे सांस्कृतिक अज्ञानाचे वर्ण आणि वर्ग व्यवस्था आबादीत सुरक्षित ठेवणारे भक्तीचे कुटील राजकारण कित्येक शतके धूर्तपणे पुढे चालवले नाही असे कसे म्हणता येईल विषमतेचे समर्थक हे शोषणाचे ता बे दार असतात भक्तीच्या उन्मादात वारी च्या कला राजकारणात जर्जर समाजाला कायम ठेवावयाचे असते त्यामुळे
पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुंनिया वाट
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
हा आर्त करुण स्वर आलवून किती दशके निष्क्रिय वाद जोपासत महाराष्ट्र समाज चालत राहणार आहे
पावूले चालती विद्यापीठाची वाट
समृद्ध संसाराची सोडूनिया वाट
पाऊले चालती संशोधन कार्याची वाट.
हा नवा बदल हेच वर्तमान आहे हेच मुक्तीचे नवे दर्शन आहे हेच गर्दीचे कला राजकारण रोखणे आहे.
शिवाजी सोणूबा ई प्रेस
सातारा दिनाक11 जुलै 22