“विधवा महिला “अमानुष रुढी प्रथा
बंद करण्याचा निर्धार
चांदिवली म्हाडा कॉलनी, मुंबई येथील साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्था म.’ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी पार पडली. सदर सभेत सौ. रुचिरा रविंद्र नेवरेकर यांनी सोसायटी मध्ये ‘पतीच्या निधना नंतर त्याच्या पत्नीला विधवा करण्याच्या क्रूर रुढीला बंदी’ घालण्याचा प्रस्ताव वार्षिक सर्व साधारण सभेत ठेवला होता.
सदर प्रस्थावावर श्री. निलकंठ सावंत, डॉ. संदीप पाटील, श्री. प्रमोद सावंत, श्री सुग्रीम विश्वकर्मा, सौ. विजयालक्ष्मी मायनाक, सौ.संगीता ईवलेकर आणि सौ. सुनैना धुरे यांनी सदर प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले व सदर प्रस्ताव 120 कुटुंबियाच्या साक्षीने मंजूर करण्यात आला.
सदर प्रस्तावावर संस्थेचे सचिव श्री संतोष नागेकर, मारुती साळुंखे, संजय आपिष्टे व श्री राजेंद्र क्षिरसागर यांनी आपले मत मांडले.
सोसायटीचे अध्यक्ष श्री रविंद्र नेवरेकर यांनी ‘साफल्य सोसायटी’ ही नेहमीच समाजाला दिशा देणारे अनेक विषय हाती घेत असते व त्याची अमलबजावणी सुद्धा यशस्वीपणे करीत असते याचे दाखले दिले. जी स्त्री आपल्या पतीचा संसार फुलवते, त्याच्या खांद्याला खांदा लावून आपला परिवार वाढवते, त्याच परिवारात तिला वैद्यवव्या नंतर मानहानी सहन करावी लागते, एवढेच नव्हे तर तिला सार्वजनिक ठिकाणी विधवा करण्याचे अघोरी कृत्य केले जाते. तिला समाजात व कुटुंबात सणा-सुदीला म्हणा किंवा कोणत्याही सत्कार्यात तिला अवहेलना सहन करावी लागते. या प्रथा व रूढी फक्त आपल्या सोसायटी मध्ये नव्हेच तर आपल्या प्रत्येक कुटुंबीयामध्ये त्यावर बंदी केली पाहिजे व प्रत्येकांनी आपल्या नातेवाईकांना सुद्धा या प्रस्तावाची माहिती देवून ‘विधवा प्रथा बंद’ ची चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले. महोदय, सोसायटीमध्ये वरील प्रस्ताव मंजूर करण्याची मुंबईतील हीपहिलीच घटना असून आज अशा अघोरी प्रथे विरूद्ध आवाज उठवण्याचे आवाहन समाजसेवक राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.