एनईपी 20 उच्च शिक्षणातील संशोधन दशा आणि दिशा
भारतीय शिक्षण हे नेहमी संकटात सापडलेले आहे या क्षेत्राची जाणीवपूर्वक उपेक्षा करणे आणि पुरेसा निधी न देणे हे भारताच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात सतत केली गेलेली राजकीय दुष्कृती आहे 19 17 मध्ये मुंबई मद्रास पंजाब आणि कलकत्ता या विद्यापीठांच्या मध्ये सहा साडेसहा हजार ते 28 हजार एवढे विद्यार्थी शिकत होते शंभर वर्षानंतरही आज विद्यापीठीय शिक्षणाच्या मध्ये क्रांतीकारक बदल होत आहेत जगातील सगळ्या ज्ञानशाखांची उच्च गुणवत्तेची विद्यापीठे भारतीय शिक्षणाच्या बाजारपेठेत दुकाने मांडून थाटून उभे राहिले आहेत त्यामुळे विद्यापीठीय शिक्षण हे जणू भारताच्या महासत्तेच्या अर्थ कारण पायाच रचत आहे असे भासून राहत आहे
प्राथमिक मोफत सक्तीचे शिक्षण आणि विद्यापीठे शिक्षण या दोन्हीही आरंभ ते शिखर यांना न्याय न देणारा भारतीय शिक्षणाचा प्रवास असा खडतर चालू आहे नवे शैक्षणिक धोरण 2020 मध्ये उच्च शिक्षणातील संशोधनाची उद्दिष्टे खूप व्यापक ठेवण्यात आली आहेत पण वास्तवात अंतरंगात दृष्टिक्षेप टाकला तर निराशा पदरी आल्या वाचून राहणार नाही
देशाच्या जीडीपीच्या एक टक्का ही निधी हा विद्यापीठ शिक्षणाच्या क्षेत्रातील संशोधनाच्या कार्यासाठी उपलब्ध करून दिला जात नाही ही स्वातंत्र्यानंतरची आजची अवस्था आहे ज्या देशात मुलगा मी संशोधन तसेच अकादमीक संशोधन याबाबत भूमिका नाही तिथे संशोधनाचे व्यापक क्षेत्र देशाच्या अर्थकारणाला गतिमान करणारे ठरेल काय असा प्रश्न उपस्थित होतो
एन ए पी 2020 मध्ये उद्दिष्टांचा पाऊस पाडण्यात आला आहे नवे शैक्षणिक धोरण हे नव् ज्ञान निर्माण करणारे आहे नवा समाज निर्माण करेल ज्ञानपूर्ण समाजातील प्रत्येक घटक या प्रकारे तयार होईल असे गृहीत धरून प्रारूपात अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत संशोधन आणि शैक्षणिक संस्था यांच्यामधील भेदाच्या रेषा आता भविष्याचा काळामध्ये कमी करण्याची गरज एनईपी मध्ये व्यक्त करण्यात आली आहे
उच्च शिक्षणातील सर्व शाखा या सातत्याने अकादमीक संकल्पनात्मक संशोधनाचे काम सतत निरंतर करत राहतील हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यातूनच ज्ञानपूर्ण समाज संशोधकीय अभिवृत्ती व निर्माण केलेले संशोधन पर्यावरण याबद्दलची जागरूकता ही एन ए पी 2020 मध्ये अपेक्षित ठेवण्यात आली आहे समाजाला संशोधनातून आर्थिक सक्षम करणे नव्या ज्ञानाच्या नव्या वाटा उपलब्ध करून देणे वर्तमानातील समस्या सोडवण्यासाठी संशोधकीय दृष्टिकोनाचा व मार्गाचा वापर करणे आणि नवनवीन समाज उपयुक्त अशी संशोधित साधने उपकरणे बियाणे तयार करणे हे उच्च शिक्षणातील संशोधनातून साध्य गृहीत धरण्यात आले आहे
भारतीय उच्च शिक्षणामध्ये पुरेसा संशोधन कार्यासाठीचा निधी उपलब्ध करून न देणे ही संशोधन पर्यावरण नष्ट करणे अभिवृत्ति नाहीसी करणे आणि भारतीय संशोधन क्षेत्र हे खाजगी कंपन्या यांच्या संशोधनावर अवलंबून राहणे असा एक कुटील हेतू यामध्ये नाही असे म्हणता येणार नाही
उच्च शिक्षणामध्ये भाषा संस्कृती समाज अर्थकारण पर्यावरण या सर्व क्षेत्रात काम करण्याची नितांत गरज आहे अशा भिन्न व्यापक क्षेत्रातील कामाची दुरावस्था हे भारतीय उच्च शिक्षणाचे निराशी जनक स्वरूप आहे अकादमीक मांडणी आणि मूलभूत संशोधन यांचा समन्वय अर्थकारणाशी जोडला जात नाही औद्योगिक क्षेत्राशी व उत्पादनाशी या संशोधनाचा वापर केला जात नाही हेही मोठ्या प्रमाणात दिशांतर चालू आहे त्यामुळे एन ए पी 2020 आणि भारतीय उच्च शिक्षणातील संशोधन पर्यावरण ही एक चिंतेची गोष्ट कायम राहणार आहे संशोधनाच्या साठी केवळ विद्यापीठे अभ्यासक्रम तयार केला आणि त्या अभ्यासक्रमाला अनुरूप साधन सुविधांचे अनुदानाचे सहाय्य केले नाहीत तर उद्दिष्टांचा अभ्यासक्रम हा साकारला जाणे असंभव आहे उच्च शिक्षणातील संशोधनाच्या नव्या वाटा आकर्षित आहेत पण लोकवर्गणीतून संशोधन दानशूर व्यक्तींच्या कृपेतून संशोधन सी एस आर मधून संशोधन हे परावलंबनाचे दीर्घकाळाचे प्रतीक्षा संशोधन ठरणार आहे
या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे जे अनेक मार्ग आहेत ते कमी जास्त स्वरूपात नागरिकांना कळू लागले आहेत पण विद्यापीठ क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संशोधनासाठी देण्यात येणारे अनुदान निधी यामधील भ्रष्टाचार ही एक फार मोठी विश्व दर्शनाची गोष्ट आहे विद्यापीठीय आस्थापनेचा खर्च भौतिक साधन सुविधांचा खर्च आणि प्रत्यक्ष संशोधनाचा खर्च याच्या अंदाजपत्रकामध्ये कधीच ताळमेळ व समतोल न साधणारे व्यवस्थापन ही संशोधनाची दुरावस्था करण्यासाठी कारणीभूत असलेली बाब आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे भारतीय संशोधन क्षेत्रातील विकसित असे दोन विभाग आहेत तंत्रज्ञान खूप पुढे निघाले आहे मूलभूत विज्ञानाच्या संशोधनाची व्यापक क्षेत्रावर ती उभारणी करण्यामध्ये भारतीय शिक्षण क्षेत्राला विद्यापीठांना अद्याप यश आलेले नाही इच्छाशक्ती ही त्यांनी तशी दाखवलेली नाही व्यक्तिगत पातळीवरील संशोधन व औद्योगिक क्षेत्राशी संलग्न अर्थकारणाला गती देणारे संशोधन हे दोन संशोधनाचे विभाजन वर्ग तयार झाले आहेत
एन ए पी 2020 च्या उच्च शिक्षणातील संशोधनाची रचना पदवी पूर्व तीन वर्षे ही अकादमीक बॅचलर म्हणून मानली जातील व पदवी उत्तर एक वर्ष हे मूलभूत संशोधनासाठी निर्धारित करावे असे गृहीत धरले जावे असे धोरणामध्ये निर्धारित करण्यात आले आहे एकूणच काय भारतीय उच्च शिक्षणातील संशोधनासाठीचा चार वर्षाचा कालावधी निश्चित करणे हे खरेच मूलगामी नवनिर्माणाचे समाजाला आर्थिक सक्षम करणारे संशोधन ठरेल काय याचा खूप या क्षेत्रातील घटकांनी विचार करायला हवा चार वर्षात प्राप्त होणारी पदवी ही संशोधन कार्य केलेली पदवी असणार आहे त्यामुळे संशोधनाच्या कार्याचे मामुलीकरण एन ए पी 2020 च्या उच्च शिक्षणाच्या या उद्दिष्ट मध्ये केले नाही काय असे म्हणावे लागते
लोकांच्या सहभागातून चालवण्यात येणाऱ्या संस्था आणि विद्यापीठाच्या विविध ज्ञान शाखा यांचा समन्वय सुसंवाद अत्यावश्यक आहे पी एचडी आधारित संशोधन
करू पाहणाऱ्या कोणत्याही ज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला प्रथमता चार वर्षाच्या संशोधन पदवीधर शाखेची पदवी प्राप्त करणे आवश्यक असणार आहे त्यानंतरच त्यास मूलभूत संशोधनाच्या शाखेत प्रवेश मिळू शकणार आहे
एन ए पी मध्ये राष्ट्रीय संशोधन संस्था एन आर एफ बद्दल खूप केला आहे पण विकासाबाबत निश्चित प्रारूप ठरवण्यात आलेले नाही एन आर एफ हे संशोधन क्षेत्रातील निधी पासून सर्व समस्या सोडवण्यासाठी काम करेल असे नमूद केले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान आण्विक ऊर्जा जैवतंत्रज्ञान कृषी संशोधन परिषद वैद्यकीय संशोधन इतिहास संशोधन विभागांना विद्यापीठ अनुदान आयोग यांनी निधी पुरवावा असेही नव्या शैक्षणिक धोरणात निश्चित करण्यात आले आहे
भारताचे गमावलेले संशोधन पर्यावरण संशोधन अभिवृत्ति साक्षरता वाढवणे यातूनच संशोधन ही ज्ञान संस्कृती आहे यातूनच समाजातील सर्व क्षेत्रातील ज्ञान केंद्रांचा विकास होऊ शकतो असा आत्मविश्वास उच्च शिक्षणाने या क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वात रुजवणे अभिप्रेत आहे
एन ए पी 2020 मध्ये जाणीवपूर्वक समाज विज्ञान शाखा मानव रे शाखा सांस्कृतिक अभ्यास शाखा यांच्यासाठी मूलगामी संशोधन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही याचे मूळ कारण मानव्य शाखा इतिहास संशोधन शाखा व सांस्कृतिक शाखा यांच्या मधून प्रभूसत्तावादी वर्गाच्या स्थानाला आव्हान देणारे निष्कर्ष हाती येतात ते तयार होऊ नये याची काळजी घेऊनच या विभागांना संशोधन क्षेत्रापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव एन ए पी 2020 मध्ये आखण्यात आला आहे
लोकांच्या कृपेवरती संशोधन क्षेत्रालंबून ठेवणारा देश हा भारत एकमेव देश आहे जो संशोधनाच्या क्षेत्रात सुद्धा कुटील राजकारण करून निधी पुरेसा न देता महासत्ता होण्याची स्वप्ने लोकांना दाखवून छद्मी विज्ञान लोकांच्या गळी उतरवण्याचा कुटिल डाव एन ए पी 2020 च्या उच्च शिक्षणाच्या संशोधन क्षेत्रात गृहीत धरण्यात आला आहे हे नाकारता येणार नाही ज्ञान निर्माण करणाऱ्या समाज हा संशोधनाशिवाय कसा तयार होऊ शकतो हा ही एक प्रश्नच आहे ज्या समाजाला वर्तमानातले प्रश्न सोडवण्यासाठी संशोधनाच्या अभिवृत्तीचे महत्त्व वाटत नाही तसे प्रयत्न होत नाही तशा संस्था उभ्या केल्या जात नाही त्या देशाचे आर्थिक दुबळे पण होत राहणार हे निश्चित आहे एन ए पी च्या उच्च शिक्षणाच्या अंतरंगात
हे सर्व घटक आढळून येतात एवढेच विश्वविद्यालय राज्य विद्यापीठे व संशोधन संस्था आणि सर्व शाखांच्या मधील मुलगा मी आणि संशोधन करणारे संशोधक एन ए पी 2020 मधील हे निष्कर्ष समजून घे निश्चित घेतील
शिवजी रावत प्रेस
सातारा17 जुलै 22